Saturday, 28 November 2015

प्रत्येक मूल अधिक गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे - राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर



नांदेड, दिनांक 28, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा राज्याचा संकल्प असून विद्यार्थ्याचा शैक्षणिकस्तर अधिकाधिक वाढविण्यासाठी सर्वांनी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी हदगाव येथे 26 नोव्‍हेंबर रोजी आयोजित शिक्षण विभागाच्या सभेत व्यक्त केले.
     डॉ.भापकर हे मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांनी औरंगाबाद,जालनापरभणीहिंगोली व नांदेड जिल्ह्यास भेट देऊन हदगाव येथे शिक्षण विभागातील अधिकारीमुख्याध्यापक पत्रकार, शिक्षणप्रेमींशी संवाद साधला. हदगाव येथीस नगरपरिषद सभागृहात झालेल्‍या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिक्षण विभागातल्या प्रत्येक घटकाने तळमळीने काम करण्याची गरज आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी करण्यात येणारे प्रयत्न विशद करून काही यशोगाथा त्‍यांनी सांगीतल्या.
  शाळाबाह्य मुलांचा शोधस्थलांतरित पालकांच्या मुलांसाठी हंगामी वसतीगृहेअप्रगत विद्यार्थी न राहू शकणाऱ्या शाळा तयार करणेशैक्षणिक गुणवत्तेसाठीचे प्रयत्न आदींची माहिती दिली. ओघवत्या व प्रवाही शैलीत त्यांनी उपस्थितांच्या आत जाऊन संवाद केला.
प्रगत शैक्षणिक  महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत दुसरी ते आठवीच्या मुलांची पायाभूत चाचणी घेतल्यामुळे मूल कोणत्या टप्प्यावर आहे, ते कळणार असून त्याच्यात गुणवत्ता वाढीसाठी काय करणे बाकी आहे ते स्पष्ट होईल. सर्व अधिकारी व मुख्याध्यापक शिक्षकांनी आता गुणवत्तापूर्ण विद्यार्थी होईल याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
     प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. डॉ.भापकर यांचे स्वागत वाचनीय पुस्तके देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले. सभेस जि.प.नांदेडचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब राठोड, पंचायत समिती हदगावचे सभापती बालासाहेब कदम, डायटचे प्राचार्य डॉ.बी.बी.पुटवाड, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्केशिवाजी पवारसविता बिरगेउपशिक्षणाधिकारी अशोक देवकरेएस.एस.वाघमारे,डायटचे अधिव्‍याख्‍याते ए. के. निळेकर, ए. ए. गौतम, जे. पी. कांबळे, ज्‍यात्‍स्‍ना धुतमल, के.ए. काझी, डॉ. दादाराव सिरसाठ, सर्व गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्‍तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्‍याध्‍यापक व शिक्षणप्रेमी यांची उपस्थिती होती.

No comments: