Thursday, 19 November 2015

नमस्कार लाईव्ह दि. १९-११-२०१५चे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह दि. १९-११-२०१५चे बातमीपत्र

~~~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- पॅरिसमध्ये गोळीबार:7 दहशतवाद्यांना अटक, तर 3 जणांना कंठस्नान
२- फ्रान्स आणि रशियाने एकत्र येऊन केले सीरियावर हवाई हल्ले
३- भारतातील तब्बल दीडशे तरुण आयसिसच्या संपर्कात असल्याचा गुप्तचर यंत्रणांना संशय, सोशल साईटवरुन माथी भ़डकवण्यास आयसिस कार्यरत, संशयितांवर बारीक नजर
४- रशियाचं विमान कसं उडवलं 'आयसिस'नं केलं प्रसिद्ध
५- २६/११ : हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी शिकागो न्यायालयाला पाठवणार समन्स
६- बॉम्बच्या धमकीनंतर पोलंडहून इजिप्तच्या दिशेने निघालेल्या विमानाने इमर्जन्सी लँडिंग केल्याचे वृत्त
७- श्रीलंकेच्या नौदलाने तीन बोटींसह १४ भारतीय मच्छिमारांना गुरूवारी सकाळी ताब्यात घेतले
~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय}
८- चीन व भारत जलद गतीने विकास करणाऱ्या विकसनशील अर्थव्यवस्था आहेत - चीनचे राजदूत ले युचेंग यांचे मुंबईत
९- आज सातवा वेतन आयोगाचा अहवाल, मोदी सरकार देणार 'गुड न्यूज
१०- पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ नोव्हेंबरपासून सिंगापूर, मलेशियाच्या दौ-यावर जाणार
११- मुस्लिम तरुणासोबत हिंदू तरुणी पळाली, दादरीमध्ये पुन्हा तणाव
१२- मुसळधार पावसामुळे तामिळनाडूत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा १११ वर
१३- छत्तीसगडमधील सुकमा येथे सीपीआरएफचे जवान व नक्षलवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत २ नक्षलवादी ठार
१४- नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या सरकारने प्रोटोकॉल तोडला, भाजपचा आरोप
१५- दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शक्तीस्थळावर जाऊन इंदिरा गांधी यांना वाहिली आदरांजली
~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१६- बाळासाहेबांच्या स्मारकाचा वाद पालिकेच्या आखाड्यात, काँग्रेस, मनसेचा महापौर बंगल्यावर स्मारक उभारण्यास विरोध, राजकारण तापण्याची चिन्हं
१७- ऐन दुष्काळात महागाईचं ग्रहण, डाळ-भातानंतर भाज्यांचीही शंभरीकडे वाटचाल, टोमॅटो 60 रुपये किलो तर वाटाणा 180 रुपयांच्या घरात
१८- शहीद संतोष महाडिक अनंतात विलीन, वीर सुपुत्राला निरोप देताना आरेदरेच्या ग्रामस्थांच्या अश्रूंचा महापूर, जन्मगावी अंत्यदर्शनासाठी रीघ, संरक्षणमंत्र्यांचीही हजेरी
१९- राज्यात ५ हजार जागांसाठी पोलीस भरती, मुख्यमंत्री लवकरच करणार घोषणा
~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- कोलकाता: एचआयव्ही पॉझिटिव्ह निघाल्यामुळे पहिलीत शिकणा-या विद्यार्थ्याला शाळा सोडण्यास भाग पाडले
२१- नागपूरमध्ये 24 तासांत 5 हत्या! कोयत्याने तिघांचा तर दगडांनी ठेचून दोघांचा खून
२२- छेडछाडीला कंटाळून औरंगाबादेत दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
२३- मुंबईत बुरखाधारी महिला चोरांची टोळी सक्रीय
२४- नालासोपारा इथं 28 वर्षीय चुलतीने 24 वर्षीय पुतण्याच्या गुप्तांगावर वार, अनैतिक संबंधातून हल्ला
२५- अहमदाबादमध्ये सुब्रमण्यम स्वामी यांच्या हॉटेलबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने
२६- वडाळा येथे आज सकाळी भरधाव ट्रेलरने ९ टॅक्सींना दिली धडक, एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त
२७- बिहार: भागलपूर येथे छट पूजेचा प्रसाद खाल्यामुळे ८० मुलं पडली आजारी
~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२८- डब्लूडब्लूई स्टार डेव्ह बटिस्टाने दिलेलं आव्हान बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने स्वीकारलं
२९- दिल्ली क्रिकेट असोसिएशनने राज्य सरकारला कर म्हणून १ कोटी रुपये द्यावेत - दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश
~~~~~~~~~~~~~~~~~
आज 19 नोव्‍हेंबर जागतिक शौचालय दिनानिमित्‍त मिलिंद व्‍यवहारे यांचा विशेष लेख
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
सोमेन बेरा, अधिराज चिंचवणकर, डॉ. अजित गोपछडे, श्वेता जोशी, सागर वाघ, राजेश सावंत, सुभाम कोलगने, नरसिंग दरक, साम्रीन खान, योगेश राठोड, मेघना बिरादार
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
ज्या माणसामध्ये दुसऱ्याला मोठे होताना बघायचे सामर्थ्य आणि दुसऱ्याला मोठे करायची उर्मी असते तीच माणसे खऱ्या अर्थाने खुप मोठ्या उंचीवर जाऊन यशाचे शिखर सर करतात
(संपत बाळासाहेब कड, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: