Tuesday, 24 November 2015

जिल्‍हयातील पाणी टंचाईचा आढावा घेऊन पिण्‍याच्‍या पाण्‍याचे नियोजन करण्‍याच्‍या सूचना जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगलाताई गुंडले यांनी दिल्या




नांदेड,24- जिल्‍हयातील पाणी टंचाईचा आढावा घेऊन पिण्‍याच्‍या पाण्‍याचे नियोजन करण्‍याच्‍या सूचना जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगलाताई आनंदराव गुंडले यांनी दिल्‍या आहे. तसेच जानेवारी 2016 मध्‍ये होणा-या माळेगाव यात्रेसंदर्भात नियोजनाचाही आढावा आज स्‍थायी समितीच्‍या बैठकीत घेण्‍यात आला.
      नांदेड जिल्‍हा परिषदेची जलव्‍यवस्‍थापन समिती व स्‍थायी समितीची बैठक आज जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगलाताई आनंदराव गुंडले यांच्‍या कक्षात घेण्‍यात आली. 
      नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या जलव्‍यवस्‍थापन समितीमध्‍ये जिल्‍हयातील टंचाईचा आढावा घेण्‍यात आला. जिल्‍हयात दुष्‍काळाचे संकट लक्षात घेता ग्रामीण भागातील पिण्‍याचा प्रश्‍न बिकट होण्‍याची शक्यता आहे. त्‍यामुळे लवकरच तालुकानिहाय बैठका घेऊन पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍याकरीता संबंधित विभागाला नियोजन करण्‍याची सूचना अध्‍यक्षा सौ. मंगलाताई आनंदराव गुंडले यांनी दिल्‍या आहे.
      नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या स्‍थायी समितीच्‍या बैठकीत पाणी टंचाईचा आराखडा सर्वसमावेशक व्‍यापक विचार करुन त्‍या दृष्‍टीने गावात पिण्‍याच्‍या पाण्‍याची नियोजन करण्‍याच्‍या सूचना पाणी पुरवठा विभागाला अध्‍यक्षा सौ. मंगलाताई आनंदराव गुंडले यांनी दिल्‍या आहे.
      जिल्‍हा परिषदेला दलितवस्‍तीसाठी 22 कोटी रुपये प्राप्‍त झाले असून या निधीच्‍या 50 टक्‍के रक्‍कम पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यासाठी खर्च करण्‍यात येणार असल्‍याची माहिती उपाध्‍यक्ष दिलीप धोंडगे यांनी दिली आहे.
      स्‍थायी समितीमध्‍ये विविध विभागाचा आढावा घेण्‍यात आला. यावेळी कृषी विभागाच्‍या वतीने चाक जोडी, बैलजोडी लाभार्थी शेतक-यांना पुरवठा करण्‍यात येत असल्‍याची माहिती, जिल्‍हा कृषी विकास अधिकारी पी.एस.मोरे यांनी दिली. पशुसंवर्धन विभागाच्‍या वतीने माळेगाव यात्रेच्‍या नियोजनाबाबत या बैठकीत चर्चा करण्‍यात आली. आरोग्‍य विभागाने जिल्‍हयात 56 हजार पेंटावॅलंट लस उपलब्‍ध असून ती जिल्‍हयातील सर्व आरोग्‍य उपकेंद्रावर बालकांना मोफत देण्‍यात येत असल्‍याची माहिती दिली. या बैठकीला आरोग्‍य व शिक्षण सभापती संजय माधवराव बेळगे, बांधकाम व अर्थ सभापती दिनकर ओमप्रकाश दहिफळे, समाजकल्‍याण सभापती स्‍वप्‍नील शेषराव चव्‍हाण, महिला व बाल विकास सभापती वंदनाताई संजयराव लहानकर, लक्ष्‍मण गंगाराम ठक्‍करवाड, श्रीनिवास जनकराव मोरे, बंडूसिंग गोमाजी नाईक, वच्‍छलाताई मारोतराव पुयड व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी पदमाकरराव केंद्रे, यू.ए.कोमवाड, दिपक चाटे,मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी राऊत आदी उपस्थित होते.
      पशुसंवर्धन विभागाची विशेष सभा आज जिल्‍हा परिषदेचे उपाध्‍यक्ष तथा कृषि व पशूसंवर्धन सभापती दिलीप धोंडगे यांच्या निजी कक्षात घेण्‍यात आली. या बैठकीत माळेगाव यात्रेसंबंधी लावण्‍यात येणा-या प्रदर्शनावर चर्चा करण्‍यात आली. पशूसंवर्धन विभागाच्‍या वतीने अपंगांसाठी शेष निधीतून पशूधनासाठी पूरक व्‍यवसाय करण्‍याकरीता कडबा कटर देण्‍याचा निर्णय या बैठकीत घेण्‍यात आला. या बैठकीला जिल्‍हा पशूसंवर्धन अधिकारी एम. यू. गोहोत्रे, तांत्रिक अधिकारी संतोष देशमुख व तालुकास्‍तरावरील पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते. 

No comments: