Thursday, 26 November 2015

नांदेड : जिल्‍हा परिषदेत संविधान दिवस साजरा



नांदेड, 26- भारतीय संविधानाबाबत जनजागृती व सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्‍हावी या करीता 26 नोव्‍हेंबर हा दिवस संविधान दिवस म्‍हणून साजरा करण्‍यात येतो. यानिमित्‍त जिल्‍हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.
      यावेळी भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेला जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगलाताई आनंदराव गुंडले यांच्‍याहस्‍ते पुष्‍पहार अर्पण करुन अभिवादन करण्‍यात आले. याप्रसंगी शिक्षण व आरोग्‍य सभापती संजय बेळगे, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी गुलाबसिंग राठोड, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, जी.एल. रामोड, वित्‍त व लेखाधिकारी राऊत, समाजकल्‍याण अधिकारी सुनिल खमितकर यांच्‍यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी भारतीय संवविधानाच्‍या प्रास्‍ताविकाचे सामुहिक वाचन करण्‍यात आले. त्‍यानंतर 26/11 रोजी शहिद झालेल्‍या जवानांना श्रध्‍दांजली वाहण्‍यात आली. 

No comments: