Friday, 27 November 2015

विरभद्र स्वामींच्या यात्रेस मुखेडात प्रारंभ, मंगळवारी अग्निकुंड व पालखी सोहळा



[नामदेव यलकटवार, तालुका प्रतिनिधी]

विरभद्र स्वामींच्या यात्रेस मुखेडात प्रारंभ, मंगळवारी अग्निकुंड व पालखी सोहळा 

                        मुखेड येथील अराध्य दैवत विरभद्र स्वामी यांच्या यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला असून भक्तांना पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ मिळतो. ही यात्रा सर्वदुर परिचित असल्याकारणाने मुखेड वासियांचे आराध्य दैवत विरभद्र स्वामी यांची पौराणिक माहिती.
मुखेड षहराचे पौराणिक नाव मोहनावती नगरी असे आहे. असे म्हटले जाते की, मोहनावती नगरीत अनेक देवांनी हजारो वर्शे वास्तव्य केले होते. या नगरीत दषरथ राजाच्या काळातील पौराणिक महादेव मंदीर असून आजतागायत हजारो भक्तगण दर्षनासाठी येतात. श्रावण चलमा आजतागायत चांगल्या अवस्थेत आहे. चलम्याच्या आजूबाजूच्या गवतास श्रावण महिन्यात गाठी पडतात हे पाहण्यासाठी अनेकजण गर्दी करतात. तसेच या नगरीत प्रसिध्द सासा-सुनाची विहिर आहे. विहीर एक जरी असली तरी त्या विहीरीतील पाण्याचे दोन भाग पाहणा-यास स्पश्ट दिसतात. पाण्याची संथ अवस्था विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला तरीही पाण्यातील अर्धा भाग स्पश्ट वेगळा जाणवतो. सासा-सूनाची विहीर ही जरी अख्यायिका असली तरी विहीरीतील पाणी मात्र वास्तव आहे.
येथील षनीमंदीर प्रसिध्द आहे. षनिदेवाची यात्रा षनि अमावस्येला भरत असते. येथील बालाजी मंदीर सुध्दा पौराणिक आहे. मोहनावती वासियांचे ग्राम आराध्य दैवत विरभद्र स्वामी यात्रेसाठी महाराश्ट्ातील अनेक जिल्हयातून भाविक यात्रेनिमीत्य मोहनावती नगरीत दाखल होतात. यंदा दिनांक 30 नोव्हेंबर सोमवारी सायंकाळी प्रसाद षिरणी वाटण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केलेली असते. तर अनेकजण बोललेल्या नवसाची परतफेड करीत असतात. अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे 01 डिसेंबर रोज मंगळवार पहाटे 4 ची वेळ यावेळी विरभद्र स्वामींच्या मंदीरातील मोकळया जागेत अग्निकुंड तयार करून त्याला अग्नि दिली जाते. त्या धगधगत्या अग्नितुन हजारो भाविक जात असतात. हे एक नवलच. त्या अग्निपासून आजपर्यंत एकाही भक्तांस इजा पोहोचलेली नाही हे मात्र विषेश त्यानंतर गावभरातून टाळ मृदंगाच्या निनादात पालखीची मिरवणूक काढली जाते. मोहनावती नगरीमध्ये वासूदेव समाजाचे उगम असल्याचे मानले जाते. पालखीच्या लाकडी दांडया वासूदेव समाजातील सदस्याने पकडल्यानंतर एक गीत म्हणतात तेंव्हाच ही पालखी फिरण्यास प्रारंभ होते. दांडी पकडणारे दंडीगाण म्हणूुन  वासूदेवास आजतागायत दंडिगाण म्हणून ओळखल्या जाते. कै. इरवंत स्वामीच्या वंषावळीतील पुजारी ट्स्टी राजकुमार स्वामी यांची आराध्य दैवत विरभद्र स्वामी यांची यावर्शीची पुजा आहे. विरभद्र स्वामी बद्दल त्यांनी खालील माहिती पुरविली. सदरील यात्रा कार्तिक पौर्णिमेपासुन पाच दिवसाची असते. जर एखादया वर्शी दोन दिवसाची पौर्णिमा असल्यास दुस-या दिवसाची पौर्णिमा धरून पाचव्या दिवषी यात्रा भरते. दरम्यानच्या काळात वेगवेगळया धार्मिक कार्यक्रमाचीे आयोजन करण्यात येते. पौराणिक महत्व असलेल्या मंदिराची एक अख्यायिका प्रचलित आहे. प्रारंभी मोहनावती नगरीत आजच्या इतकी लोकसंख्या नव्हती. श्रावण चलम्याच्या आसपास वसाहत होती. जर बाहेरगावाची व्यक्ती कायम वास्तव्यास आल्यास मृत्यु पावायची म्हणून कायम वास्तव्य करण्यासाठी बाहेरगावचे कुणीही येत नसत. प्रारंभी मोहनावती नगरीत सुर्याचे दर्षन होत नसे. कारण आजुबाजुला भयंकर जंगल होते. एके दिवषी स्वामी कुटुंबातील सदस्याला आकाषवाणी ऐकु आली मी आपल्या लगतच्या पाहाडात आहे. आपण मला वर काढल्यास आपणावर कोणतीही आपत्ती कोसळणार नाही. सर्व स्वामी सदस्यांनी एकजुटीने माळाचे खोदकाम करण्यास सुरूवात केली. त्यात सुंदर देखणी अषी मुर्ती प्रकट झाली ती जाज्वल्य मुर्ती म्हणजे मुखेड वासियांचे कुलदैवत स्वामी विरभद्र होय. थोडक्यात मुर्तीची स्थापना होण्याचा इतिहास असा आहे की, दक्ष प्रजापती राजाला अनेक मुली होत्या त्यातील पार्वती ही महादेवाची पत्नी. दक्ष प्रजापती पार्वतीचा विवाह महादेवासोबत करण्यास तयार नव्हता त्याचे कारण असे की स्मषानभूमीत महादेव नरमुंडयाला भस्म करीत असे. तरीही पार्वतीने जबरदस्तीने महादेवाषी लग्न केले होते. नंतर प्रजापती राजाने महायज्ञ केला. त्यावेळी सर्व मुलीनंा निमंत्रण दिले. महादेवाकडे नारदमुनी येवून पार्वतीला प्रजापतीकडील सर्व वृतांत सांगितला. महादेवाचा विरोध असतांनाही पार्वती आपल्या वडिलंाकडे गेली. वडिलांने पार्वतीचा अपमान केलास. अपमान सहन न झाल्याने त्याच यज्ञकुंडात पार्वतीने उडी घेतली. ही घटना सर्वत्र पसरली. महादेवाचे वाहन नंदीने कैलासात जावून ध्यानस्थ असलेल्या महादेवाला सांगितले. ही घटना समजताच महादेव आक्रोष करून आपल्या डोक्यावरील जटा दगडावर आपटण्यास सुरूवात केली. व त्यातुनच विरभद्र स्वामीचा जन्म झाला. विरभद्र स्वामीला आपल्या आजोबाचे कटकारस्थान समजले. म्हणुनच दक्ष प्रजापती राजाचा विरभद्राने नायनाट केला व प्रतिज्ञा करून अनिश्ट रूढी व अंधश्रध्देचा नायनाट केला. म्हणून दरवर्शी मोहनावती नगरीत यज्ञ केला जातो. व अनिश्ट रूढी व परंपराचा नायनाट करून सलोखा निर्माण केला जातो. या आर्यवैष्य समाजासह सर्व जाती-धर्माचा सिंहाचा वाटा असतो. अनेक गावातील भजनी-मंडळी येथे दाखल होातात. त्यात मांजरमच्या भजनी मंडळाचा आवार्जुन उल्लेख करावा लागतो. यात्रेसाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून नगरपलिकेने अनेक सुविधा करून दिल्याची माहिती मुखेड न.प.चे मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे व उपनगराध्यक्ष सौ. मनिशा चंद्रकांत गरूडकर यांनी दिली. दिनांक 30 नोव्हेबर रोज सोमवार षिरणी वाटपाच्या कार्यक्रमानंतर श्री गुरू विरूपाक्ष षिवाचार्य महाराज गणाचार्य मठसंस्थान यांच्या कृपाषिर्वादाने व तसेच ईष्वरअप्पा नागायप्पा स्वामी यांच्या स्मरनार्थ अष्वरथ पालखी समोर राहणार आहे. यावेळी विरषैव वैश्णव भजनी मंडळ मुखेड व इतर भजनी मंडळी पालखी मिरवणूकीसोबत सहभागी होणार आहेत. जगन्नाथ कामजे, डाॅ. अतूल देबडवार यांच्याकडून विदयुत रोषनाई आणि आतिशबाजी होणार आहे. दररोज दुपारी पाच पर्यंत महिला भजनी मंडळ यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम आहे. भजनासाठी स्थानिक कलाकार विरभद्र मठपती, गणेष  पोतदार, रामकृश्ण बदने, प्रा. सिध्देष्वर कोळे, षिवाजी अंबुलगेकर, मालोजी तळणे, यासह अनेक कलाकार सहकार्य करणार आहेत. 01 डिसेंबर रोज मंगळवार हुतात्मा माधव विदयालयाचे क्रिडांगण, श्री षनिदेव मंदिराच्या पाठिमागे जंगी कुस्त्यांचा फड नगर परिशदेच्या वतीने प्रांगणात होणार असून अखेरची कुस्ती 11001 अकरा हजार एक रूपयाची कै. आ. गोविंदराव राठोड यांच्या स्मरनार्थ ठेवण्यात आली आहे. उर्वरित कुस्त्या आ. सुभाश साबणे, स्व. इरन्ना गुरूजी संबूुटवाड, कै. मधूकरराव घाटे, स्व. ओंकारलाल बियाणी, संतोश माधवराव भालके, सुधांषु प्रमोद पाटील, स्व. षेख चांदसाब होनवडजकर, स्व. गोविंदमामा पत्तेवार, षंकर दिगंबर चैधरी, एन.बी.मुगावे गुरूजी, विठ्ठलरावजी कामजे, नागनाथ सदाषिव कोडगिरे, इरन्ना साहेब गंदपवाड, बाबुराजे दुर्गासिंह चैहान, रूक्मिनी गेडेवाड, अषोक नारायण वाघमारे, सुर्यकांत नारायण कोंडावार, जगदीष षिवराज मठपती कोंडेकर, व न.प. मुखेडच्या वतीने ठेवण्यात आले आहेत. पंचकमिटीचा निर्णय अंतिम राहणार आहे. यात्रेचा लाभ घेण्याचे आव्हान उपनगराध्यक्ष मनिशा चंद्रकांत गरूडकर माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड, बाबुसावकार देबडवार, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस माधवअण्णा साठे, माजी उपनगराध्यक्ष संजय बेळीकर, सौ. लक्ष्मीबाई कामजे, षहाजहान बेगम, न.प.चे मुख्याधिकारी आमिकुमार सोंडगे व यात्रा महोत्सव समितीने केला आहे. (नामदेव यलकटवार
तालुका प्रतिनिधी, मुखेड जि. नांदेड 
मो. नं. 8087106666, 8149636006
फैक्स : 02461-223666)

No comments: