Thursday, 26 November 2015

नमस्कार लाईव्ह २६-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २६-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानमधील तालिबान या दहशतवादी संघटनेचा प्रमुख खान सय्यद साज्ना याच्यासह १३ जण ठार
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- बिहारमध्ये 1 एप्रिल 2016 पासून दारुबंदी लागू करणार, मुख्यमंत्री नितीश कुमार यांची घोषणा
३- ज्यांचं राज्यघटनेबद्दल आस्था नाही ते आज चर्चा करताय, हेच हास्यास्पद -सोनिया गांधी
४- शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जींच्या सीबीआय कोठडीत ४ दिवसांची वाढ
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
५- कोर्टाच्या निर्णयाचा आदर, पण डान्सबारला विरोध : मुख्यमंत्री
६- डान्सबार परवान्याबाबत 2 आठवड्यात निर्णय घ्या, सर्वोच्च न्यायलयाचे फडणवीस सरकारला आदेश
७- ८९ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १५ ते १८ जानेवारी दरम्यान पिंपरी-चिंचवडमध्ये
८- सांडपाणी प्रक्रिया करून उद्योगांना देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
९- पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकाचा जाळून घेण्याचा प्रयत्न
१०- औरंगाबादमधील सिडको वसाहतीत एका ३३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या
११- आम आदमी पार्टीचे आमदार अखिलेश त्रिपाठी यांना २०१३च्या दंगलप्रकरणी अटक
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१२- भारत आणि पाकिस्तान संघांमधली नियोजित क्रिकेट मालिका श्रीलंकेत खेळवण्यास  शिक्कामोर्तब
१३- अभिनेते सचिन पिळगावकरांना महिलेने 35 लाखांना गंडवलं
१४- सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची मुंबईच्या अंडर - १६ संघात निवड
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
१५- नांदेड : जिल्‍हा परिषदेत संविधान दिवस साजरा
~~~~~~~~~~~~~~~
१६- कुसुम सभाग्रहात चालू असलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या सहाव्या दिवशी ‘अस्तित्व अॅट अंश डॉट कॉम’ हे नाटक सादर
~~~~~~~~~~~~~~~
१७- धर्माबाद तालुक्यातील देल्लूर गोदापात्रात पोलीस पथकावर वाळू माफियांचा प्राणघातक हल्ला
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
कुणाची मदत करत असताना त्याचा डोळ्यात बघू नका..
कारण त्याचे झुकलेले डोळे
तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतो
[धम्मदीप गायकवाड, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: