व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नांदेड जिल्ह्यातील मुखेड इथं फटाक्यांच्या दुकानाला आग लागली. यामध्ये 16 दुकानं जळून खाक झाली आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, या आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही.
मुखेड शहरात फटाक्यांच्या दुकानाना अचानक आग लागली. या आगीत फटाक्यांची 16 दुकाने जळून खाक झाली. जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानात फटाका व्यापार्यांनी दुकाने थाटली. सायंकाळी या बाजारात फटाके खरेदीसाठी मोठी गर्दी होती. अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली. या धावपळीत काही नागरिकांना किरकोळ दुखापत झाली.
या आगीत फटाका व्यापार्यांचं लाखो रुपयांचे नुकसान झाले. दुकानासमोरील 7 दुचाकी आणि एक ऑटोरिक्षाजळून खाक झाली. अग्निशमक दलाला घटना स्थळी पोहचायला उशीर झाल्याने संतप्त नागरिकांनी अग्निशमक दलाची गाडी फोडली. दरम्यान, सध्या आग आटोक्यात आली. या आगीमुळे कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
No comments:
Post a Comment