ब्राझीलमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानं भरदिवसा आपल्या पत्नीवर ११ वेळा गोळीबार केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय. डेली मेलमधील बातमीनुसार पोलीस अधिकाऱ्याचा गोळीबार करण्यापूर्वी पत्नीसोबत खूप वाद झाला आणि त्यानंतर पत्नी मागे धावून-धावून त्यानं गोळ्या चालवल्या. ही घटना उबेरलेंडिया शहरातील आहे.
डेली मेलच्या रिपोर्टुसार ४६ वर्षीय या व्यक्तीचा आपली पत्नी वेरिडिएना रॉड्रिक्स सोबत वाद झाला. भांडणानंतर त्यानं पत्नीला उबेरलेंडियाच्या रस्त्यावर भरदिवसा गोळी मारली. ही घटना २० ऑक्टोबरची आहे. याचा व्हिडिओ वायरल झालाय. व्हिडिओत आपण पाहू शकतो की, कशाप्रकारे आपल्या पत्नीला गोळी मारल्यानंतर तो तिथून आरामात जातोय. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर मानसोपचार सुरू आहेत.
No comments:
Post a Comment