राष्ट्रीय पुरस्कारासाठी यादव लोकडे यांची निवड
* दिल्लीत 12 डिसेंबर रोजी पुरस्काराचे वितरण
* ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ठ पत्रकार
* गत वर्षी महात्मा कबीर समता परिषदेकडून महाराष्ट्र भुषण पुरस्कार प्राप्त
सगरोळी : येथिल नवयुवक साहित्यिक , कवी , पत्रकार , ग्रंथपाल , विद्यावृत मासिकाचे संपादक मंडळातील सदस्य , बिलोली तालुका बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष , दैनिक एकमत व नमस्कार लाईव्ह प्रतिनीधी यादव लोकडे सगरोळीकर यांना भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली यांच्यावतीने दिले जाणाऱ्या डाँ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप अवार्ड हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून दिल्ली येथे 12 डिसेंबर रोजी पुरस्कार वितरण कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामविलास पासवान व रामदासजी आठवले तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे .
यादव लोकडे हे सगरोळी येथिल गरिब कुटुंबात जन्म घेऊन स्वतःच्या प्रयत्नांने नेहमी ध्येयवादी जीवन जगण्यासाठी धडपडत असतात. यादव लोकडे हे गेल्या काही वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून ग्रामीण भागातील जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी धडपडत असतात त्यांच्या या कार्यामुळे त्यांची अल्पकालावधीतच फार दुर पर्यत ओळख निर्माण झाली आहे. यादव लोकडे यांनी लिहीलेल्या व दोन वर्षापुर्वी प्रकाशित झालेल्या " सुशिक्षित बेकार " या काव्यसंग्रहास महात्मा कबीर समता परिषदेच्या वतिने गत वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर त्यांच्या पत्रकारीता क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन यावषी बिलोली तालुका बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली एकंदरीत त्यांच्या पत्रकारीता क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन नुकतेच 11 आँक्टोंबर रोजी परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग जि उस्मानाबाद यांच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या डाँ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप अवार्ड हा राष्ट्रीय पुरस्कार यादव लोकडे यांना जाहीर झाला असून दिल्ली येथे 12 डिसेंबर रोजी पुरस्कार वितरण कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामविलास पासवान व रामदासजी आठवले तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे याबरोबरच श्री कृष्ण सेवा ट्रस्ट पुणे यांच्यावतिने दर वर्षी दिल्या जाणाऱ्या आदर्श पत्रकारीता समाजरत्न पुरस्कारासाठी यावर्षी लोकडे यांची निवड झाली असून त्यांना पुणे येथे एका कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यादव लोकडे
सगरोळीकर

No comments:
Post a Comment