नांदेड, 6- जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत अपंगांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणार, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांनी केले.
कंधार तालुक्यातील कलंबर येथील विठ्ठल कतरे यांना शुक्रवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांच्याहस्ते पिठाची गिरणी देण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा कॉग्रेस कमीटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, राजश्री शिंदे, पानभोसीच्या सरपंच सुवर्णा नाईकवाडे, अॅड. दिगांबर गायकवाड, गोदावरीबाई कतरे, संगीता विठ्ठल कतरे, किशोर अंबेकर, अशोक कांबळे, सुधीर तपासे आदींची उपस्थिती होती.
कंधार तालुक्यातील पांगरा गावचे रहिवाशी विठ्ठल कोंडीबा कतरे हे कलंबर सहकारी साखर कारखाण्यात कामगार म्हणून काम करत होते. 1999 साली कामावर असतांना अपघात होऊन त्यांचे दोन्ही पाय गुडघ्यापासून निकामी झाले, त्यामुळे त्यांना कायमचे अपंगत्व पत्कारावे लागले. कारखान्याकडे नुकसान भरपाईसाठी त्यांनी दाद मागीतली परंतु त्यांना आधार मिळाला नाही. विठ्ठल कतरे यांच्या मदतीसाठी जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर धावून आल्या. त्यांच्या उदर निर्वाहासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत अपंगांसाठी असणा-या स्वयंरोजगार योजनेतून शंभर टक्के अनुदानावर कतरे यांना पिठाची गिरणी उपलब्ध करुन दिली. आज त्यांच्या कुटूंबास जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांच्याहस्ते पिठाची गिरनीचे वाटप करण्यात आली.

No comments:
Post a Comment