नांदेड, 6- नांदेड जिल्हा परिषदेचे कर्मचारी बालाजी ईश्वरराव आवर्दे यांनी आज दिनांक 6 नोव्हेंबर रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त नेत्रदान करण्याचा संकल्प केला आहे.
त्यांच्या या नेत्रदानाच्या संकल्पनेबद्दल शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे, जिल्हा परिषद सदस्य बळवंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, गजानन पवार यांनी बालाजी आवर्दे यांचा बुके देऊन सत्कार केला.
गेल्या अनेक वर्षापासून बालाजी आवर्दे यांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला होता. या संकल्पनेला त्यांच्या मातोश्री व सुविद्य पत्नी यांनीही प्रोत्साहन दिले. त्यामुळे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मरनोत्तर नेत्रदान करण्याचे प्रतिज्ञा पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांना दिले आहे. अंध व्यक्तींना नेत्र देऊन हे सुंदर जग डोळयांनी पाहता येईल यासाठी नेत्रदान करण्याचा बालाजी आवर्दे यांनी संकल्प केल्याचे सांगीतले. बालाजी आवर्दे हे जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे यांचे स्विय सहाय्यक आहेत. त्यांच्या या निर्णयाचे बालाजी आवर्दे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment