नमस्कार लाईव्ह ३१-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- सेक्ससाठी महिला गुलाम, आयसीसचा सर्वात क्रूर चेहरा
जगाला विध्वंसाच्या उंबरठ्यावर आणून ठेवणाऱ्या ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेचा क्रूर चेहरा अनेक देशांनी अनुभवला आहे. त्याच आयसिसचा प्रमुख अबू बक्र बगदादीनं एक फतवा जारी केला आहे. तो फतवा वाचून अमेरिकेसह जगभरातले देश पुरते हादरलेत. जगभरात नरसंहार घडवणाऱ्या आयसिस या दहशतवादी संघटनेचा सर्वात क्रूर चेहरा जगासमोर आला आहे. आयसिसकडून महिलांवर केल्या जाणाऱ्या अत्याचाराची कहाणी ऐकल्यानंतर, सैतानाची मानही शर्मेनं खाली झुकल्याशिवाय राहणार नाही. इराकमध्ये दहशतवाद्यांनी हजारो महिलांना गुलाम बनून ठेवलं आहे. तिथं त्या महिलांवर दिवस-रात्र अत्याचार केला जातो. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गर्भवती महिलांना देखील त्या नराधमांच्या वासनेची शिकार बनवलं जातं.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- नव्या वर्षात तरी संसद चालू देण्याचा संकल्प करा - मोदींचा काँग्रेसला टोला
घोषणाबाजी आणि गोंधळ घालून सातत्याने संसदेचे कामकाज रोखून धरणाऱ्या काँग्रेसला गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खडे बोल सुनावले. गेली ६० वर्षे देशावर राज्य करणाऱ्यांना आता संसदेचे कामकाज रोखून धरण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळे नवीन वर्षात काँग्रेसच्या नेत्यांनी संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू देण्याचा संकल्प करावा आणि देशाच्या विकासात अडथळा आणू नये, असे टोला मोदी यांनी लगावला.
३- चंदिगड : चोराशी दोन हात, आईला वाचवणाऱ्या चिमुरड्याला शौर्यपदक
शस्त्रधारी चोराशी दोन हात करुन आईचा जीव वाचवणाऱ्या आणि घरातील मौल्यवान सामानाचं रक्षण करणाऱ्या 13 वर्षांच्या बालकाचा राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. हरियाणाच्या पंचकुलातील शाळेत आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या दिशांत मेहन्दीरत्तला 26 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गौरवण्यात येईल.
काय झालं होतं?
4 एप्रिल 2015 रोजी दिशांतचे बाबा कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर दुपारी 2 च्या सुमारास एक अनोळखी इसम आला. त्यावेळी 13 वर्षांचा दिशांत, त्याचा 8 वर्षांचा भाऊ रायन आणि आई अर्चना घरात होते. अर्चना या एलआयसीमध्ये काम करतात, तर त्याचे बाबा सीए आहेत. दिशांतचे बाबा घरी नाहीत, हे पाहून घरात आलेल्या चोराने अर्चना यांना पतीला फोन लावण्यास सांगितलं. त्या आत गेल्यावर चोराने दिशांतला बोलण्यात गुंतवलं. दिशांतचे बाबा म्हणजे रविंद्र यांच्याशी चोराने फोनवरुन बोलण्यास सुरुवात केली. मात्र त्यांचीही ओळख न पटल्याने पुन्हा कधी तरी येण्यास त्यांनी सांगितले. यावेळी बाथरुमला जाण्याचं निमित्त करुन त्याने अर्चना यांना पकडलं आणि त्यांच्या गळ्याला सुरा लावला. हे पाहून दिशांत चोरट्याच्या पायाशी पडून आईच्या सुटकेसाठी विनवणी करु लागला. काही क्षणातच चित्र पालटलं आणि दिशांतने मोठ्या हिमतीने चोराच्या हातातून सुरा हिसकवला. हे पाहताच अर्चना यांनी झटापट करुन चोराला पाडलं. या सगळ्यात अर्चना यांनाही दुखापत झाली. मात्र त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलवलं आणि चोराला अटक झाली. या साहसाबद्दल दिशांतचं सर्व स्तरातून कौतुक झालंच. त्यात राष्ट्रीय शौर्य पुरस्कारामुळे कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला आहे. दिशांतला 26 जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते शौर्यपदक, प्रशस्तिपत्रक आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात येईल. दिशांतने सर्व लहान मुलांना कठीण प्रसंगात शौर्य दाखवण्याचं आवाहन केलं आहे.
४- डीएमडीकेचे अध्यक्ष विजयकांत यांच्या निवासस्थानाबाहेर विरोध प्रदर्शन करणाऱ्या पत्रकारांवर कार्यकर्त्यांचा हल्ला, १९ जण अटकेत
५- नव्या वर्षांच्या ग्रॅण्ड सेलिब्रेशनसाठी बॉलिवूड गर्ल्सना वाढती मागणी
६- नवीन वर्षाच्या स्वागतासासाठी गोव्यात ६ लाख पर्यटक
७- गृहमंत्रालयाने दिले १७ वरिष्ठ आयपीएस अधिका-यांच्या बदलीचे आदेश.
८- देशात ५८ लाख लोकांनी एलपीजी गॅसवरील सबसिडी सोडली - केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी वाटप ; पाणीपुरवठा योजनेसाठी ३१४ कोटी रुपये तर चारा छावण्यासाठी १०९ कोटी ९४ लाख रपपयांची तरदूत
१०- सामना आणि शिवसेनेला जय महाराष्ट्र, प्रेम शुक्ला भाजपच्या वाटेवर
‘दोपहर का सामना’ या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक प्रेम शुक्ला यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. यासोबतच प्रेम शुक्ला यांनी शिवसेनेचं मुखपत्र ‘सामाना’ची हिंदी आवृत्ती म्हणजेच ‘दोपहर का सामना’च्या कार्यकारी संपादकपदाचाही राजीनामा दिला प्रेम शुक्ला हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. शिवसेनेतून बाहेर पडण्याचं कारण प्रेम शुक्ला यांनी अद्याप सांगितलं नाही. मात्र, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. ‘दोपहर का सामना’मधून सडेतोड लेख लिहून प्रेम शुक्ला यांनी नेहमीच शिवसेनेची बाजू खंबीरपणे मांडली आहे. आपल्या आक्रमक लेखनशैलीमुळे प्रेम शुक्ला ओळखले जातात. ‘दोपहर का सामना’सह विविध वृत्तवाहिन्यांवरील चर्चात्मक कार्यक्रमांमध्ये प्रेम शुक्ला शिवसेनेची बाजू मांडत असत.
११- दारूची नव्हे, तर सामाजिक कामाची नशा असावी, डॉ. प्रकाश आमटेंचा कानमंत्र
अहमदनगर : माणसाला दारूची नव्हे, तर सामाजिक कामाची नशा असावी, असा कानमंत्र मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांनी दिला आहे. हेमलकसातील आदिवासींचा कायापालट करणाऱ्या आमटे दाम्पत्याला यावर्षीचा अहमदनगर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या पुरस्कार सोहळ्यात बोलताना प्रकाश आमटेंनी त्यांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला. यावेळी प्रकाश आमटे यांनी प्राण्यांचे मानवी वस्त्यांवरील हल्ल्यावरही भाष्य केलं. सुसंस्कृत म्हणवून घेणारी माणसं बॉम्बस्फोट, हत्या करतात. मात्र, क्रूर प्राणी प्रेमानं वागतात. माणूस सर्वात खतरनाक प्राणी असल्याचं प्रकाश आमटे यावेळी म्हणाले. प्रकाश आमटे यांनी यावेळी वास्तविकता मांडण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यनंतरही आदिवासींच्या समस्या कायम आहेत, असे बोलत प्रकाश आमटे यांनी सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे.
१२- लेट नाईट सेलिब्रेशन करणाऱ्यांना रेल्वेचं गिफ्ट
नववर्षाचं स्वागत करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्यांसाठी रेल्वेने मोठा दिलासा आहे. उशिरा घरी परतण्यासाठी लोकलच्या फेऱ्या रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार आहेत. पश्चिम रेल्वेवर रात्री आठ विशेष लोकल धावणार आहेत, तर मध्य रेल्वेवरही लोकलच्या 4 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक मुंबईकर मरिन ड्राईव्ह, चौपाटी सारख्या परिसरात जातात. मात्र बारा वाजल्यानंतर घरी परत येताना शेवटची लोकल पकडण्यासाठी अनेकांची धावपळ उडते. शिवाय लांब राहणाऱ्या नागरिकांना बस, टॅक्सीवर अवलंबून राहावं लागतं. मात्र गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
१३- मोतेवारला उपचारांसाठी सोलापुरला हलविले, खासगी सुरक्षारक्षकांची कॅमेरामनना धक्काबुक्की
उस्मानाबाद जिल्ह्यातील एका फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेला ‘समृद्ध जीवन’चा सर्वेसर्वा महेश मोतेवार याच्या छातीत दुखू लागल्याने पुढील उपचारांसाठी त्याला गुरुवारी सकाळी सोलापूरला हलविण्यात आले. उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार त्याला सोलापूरला नेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सोलापुरला रवाना होण्यापूर्वी मोतेवार याच्या खासगी सुरक्षारक्षकांनी काही कॅमेरमनना धक्काबुक्की केली. पोलिसांसमोरच हा प्रकार घडल्यामुळे पोलिसांनी एका सुरक्षारक्षकाला ताब्यात घेतले. मोतेवार याची पोलीस कोठडी आज संपते आहे. उस्मानाबाद पोलिसांनी दोनच दिवसांपूर्वी मोतेवारला पुण्यातून अटक केली होती. उमरगा न्यायालयाने त्याला ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यानंतर मुरूम पोलीस ठाण्याच्या ताब्यात असलेल्या महेश मोतेवारला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुढील तपासासाठी उस्मानाबादेत आणले. मात्र, बुधवारी रात्री दहाच्या सुमारास मोतेवार याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी सकाळी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी मोतेवारला सोलापूरला घेऊन जाण्याचा सल्ला पोलिसांना दिला. त्यामुळे त्याला सोलापुरला नेण्याचा निर्णय घेण्यात आला. उस्मानाबादमध्ये सर्व सुविधा असताना सोलापूरला हलविण्याचा निर्णय रुग्णालयाकडून कसा काय देण्यात आला, याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- अमरावतीत भीषण आग, 11 सिलेंडर स्फोट
१५- पुलवामा येथे लश्कर ए तैयबाचे दोन दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सुरक्षा जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा जवानांबरोबर चकमक झाली. यात चकमकीत लश्कर ए तैयबाचे दोन अतिरेकी मारण्यात यश आले पुलवामा परिसरात अतिरेकी आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर भारतीय जवानांनी गुरसू परिसराला घेरले. जवानांनी घर घराची तलाशी घेतली. त्यावेळी दहशतवाद्यांनी अंदाधुद गोळीबार केला. मात्र, जवानांनी शरण येण्यासाठी हत्यार खाली टाकण्याचे आवाहन केले. परंतु त्यांनी गोळीबार केला. जवानांनी उत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन अतिरेकी मारले गेलेत. दहशतवाद्यांचे शव आज सकाळी ताब्यात घेण्यात आले. हे दोघेही विदेशी असल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांकडून देण्यात आली. हे दोघेही लश्कर ए तैयबाचे असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून दोन एके रायफल जप्त करण्यात आली आहे.
१६- चंद्रपूरमध्ये तुमसर बालाघाट मार्गावर टॅक्सीच्या धडकेत ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
१७- ठाण्यातील बाळकुम परिसरातील ज्वेलर्सवर दरोडा, ३५ लाखांचे दागिने लुटून दरोडेखोर पसार.
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- पाकिस्तानी गायक अदनान सामी नववर्षापासून भारतीय
पाकिस्तानी गायक अदनान सामीला 1 जानेवारी 2016 म्हणजे उद्यापासून भारताचं नागरिकत्व देण्यात आलं आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातून सामीला भारतात राहू देण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. 26 मे 2015 रोजी अदनान सामीने मानवतेच्या दृष्टीकोनातून आपल्याला भारतात राहू देण्याबाबत संमतीचा अर्ज गृहमंत्रालयाकडे केला होता. पाकिस्तानातील लाहौरमध्ये जन्म झालेला अदनान सामी 13 मार्च 2001 रोजी भारतात आला होता. इस्लामाबादेतील भारतीय उच्चाधिकाऱ्यांनी दिलेल्या व्हिसानुसार त्याला पर्यटक म्हणून वर्षभर राहण्याची परवानगी होती. त्यानंतर अनेक वेळा त्याचा व्हिसा रिन्यू करण्यात आला. 27 मे 2010 रोजी इश्यू केलेल्या त्याच्या पाकिस्तानी पासपोर्टची मुदत 26 मे 2015 रोजी संपली. पाकिस्तान सरकारने पासपोर्टला मुदतवाढ दिली नव्हती. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनात आपलं भारतातील वास्तव्य कायदेशीर करावं, अशी मागणी सामीने भारताकडे केली. 2000 च्या सुमारास अदनान सामीचे ‘कभी तो नजर मिलाओ’ आणि ‘लिफ्ट करा दे’ या म्युझिक व्हिडिओंनी चांगलाच धुमाकूळ घातला होता.
१९- फुटबॉल - सैफ कपमध्ये भारताचा मालदीववर ३-२ने विजय
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२०- पाच बॅंक लुटारुंना भारी पडला एक गार्ड पाहा व्हिडिओ
http://goo.gl/S8mIzO
~~~~~~~~~~~~~~~
२१- दि.2 जानेवारी पोलीस स्थापना निमित्त पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन
http://goo.gl/5abFpt
~~~~~~~~~~~~~~~
२२- नवीन वर्षाची एक नवी सुरुवात, एक नवा संकल्प - २०१६
http://goo.gl/EpFuo4
~~~~~~~~~~~~~~~
२३- NASO च्या परीक्षेतही केंब्रीजचे यश
http://goo.gl/lL0cLe
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आयुष्यात कितीही संकटे आली तरी शांत राहून मात करणारच विजय मिळवितो
[संजय पाईकराव, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हवर नोंदवा आपले मत, खालील लिंकला क्लिक करून--
नरेंद्र मोदींचा अचानक पाकिस्तान दौरा भारतासाठी फायदेशीर आहे का?
http://goo.gl/wMLuSZ
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
सिटी मॅक्स, डिजिटल कलर लॅब
शहाजी मार्केट, शिवाजी नगर, नांदेड
फोन- 02462 - 230786
मो. - 9422185282
सर्व प्रकारची अल्बम प्रिंटींग, कॉफी मग प्रिंटींग, अल्बम डिझाईन, डिजिटल कॅमेरा, व्हिडीओ कॅमेरा, मेमरी कार्ड, आय कार्ड झेरोक्स, लॅमिनेषण, टी-शर्ट प्रिंटींग
http://goo.gl/OcvcIs
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN