Monday, 28 December 2015

मुखेड येथे हजरत सय्यद साबेर अली शाह खादरी यांचा उर्स शरिफ


मुखेड :- रियाज शेख



हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक हजरत सय्यद साबेर अली शाह खादरी यांचा उर्स शरिफ आज दि.29 डिसेंबर पासुन शुरु होणार आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रसिद्ध तिर्थक्षेत्र हजरत सय्यद साबेर अली शाह खादरी यांचा उर्स महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि.29 डिसेंबर रोजी शहरातील खंडोबा गल्ली येथील अकबर खान दाऊद खान यांच्या घरातुन संदल मिरवणुकीस सुरुवात होऊन संदल वाजत गाजत मुख्यमार्गाहुन खैरका रोड स्थित हजरत यांच्या दर्गाह ला जाईल. तेथे धार्मिक विधी व प्रवचनाचे कार्यक्रम होणार आहे. दि.30 डिसेंबर रोजी कव्वाली चा मुकाबला आयोजीत केले आहे. ज्यामध्ये गुलशन कव्वाल संगारेड्डी व मोईन दिलशाद हैदराबाद यांचा कव्वाली चा कार्यक्रम होईल. दि.31 डिसेंबर रोजी पहाटे फातेहाखानी व सलातु सलाम व प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी या ऊर्स शरिफ मध्ये जास्तीत जास्त भक्तांनी लाभ घ्यावाआसे आवाहन उर्स कमेटी च्या वतीने करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्र सह तेलंगणा ,आंध्रप्रदेश, कर्नाटक हून या उर्स निमित्त भाविक भक्त हजारों च्या संख्येने शहरात दाखल होतात.
--
धन्यवाद ............
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी आपल्या ग्रुप मध्ये 8975495656 हा नंबर अड्ड करा 

No comments: