नमस्कार लाईव्ह २६-१२-२०१५ चे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- पाकिस्तानच्या शत्रूचं असं स्वागत का?: हाफिज सईद
कराची : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीमुळे दशहतवादी हाफिज सईदचा तीळपापड झाला आहे. पाकिस्तानच्या शत्रूचं असं स्वागत का?, असं ट्वीट करुन हाफिज सईदने संताप व्यक्त केला आहे. मोदी यांच्या पाकिस्तान दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करुन सईद म्हणाला की, पाकिस्तानच्या शत्रूचं असं स्वागत व्हायला नको. आता काश्मिर भारताला देणार का? मोदी नेहमीच पाकिस्तानच्या विरोधात कारवाया करत असतात, अशी आगपाखडही हाफिज सईदने केली आहे.
त्याचवेळी त्याने नवाज शरीफ यांच्यावरही टीका केली आहे. काश्मिरी जनता पाकिस्तानला आपला वकील समजते, अशावेळी शरीफ यांनी मोदींना भेटणं हा तिथल्या जनतेचा अपमान आहे. शरीफ यांनी याचं स्पष्टीकरण जनतेला द्यायला हवं, असंही हाफिज सईदने म्हटलं आहे. त्याचबरोबर काश्मिरच्या जनतेबद्दल सहानुभूती व्यक्त करत काश्मिर हा पाकिस्तानचाच भाग आहे, हे सांगण्याचा हाफिज सईदने प्रयत्न केला.
२- चीनमध्ये १७ हजार कारखाने आजपासून बंद
बीजिंग : वाढत्या प्रदूषणाला काही प्रमाणात आळा घालण्यासाठी चीनमध्ये शनिवारी १७ हजार कारखाने बंद कऱण्यात आलेत. तसेच २८ हजार ६०० कारखाने तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याचे आदेश दिलेत. चीनच्या पर्यावरण मंत्रालयाकडून हे आदेश देण्यात आलेत. या कंपन्या मर्यादेपेक्षा अधिक प्रदूषण करत असल्याने मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय. हॉटलाईनद्वारे मिळालेल्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला. चीन सरकारने सप्टेंबरमध्ये हॉटलाईन सुरु केली होती आणि याद्वारे नागरिकांना प्रदूषणबाबतच्या तक्रारी देण्याचे आवाहन केले होते. आतापर्यंत १२ हजार ३६९ तक्रारींचे फोन आलेत. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. या तक्रारींद्वारे ६३ हजार ७०० कंपन्या बेकायदा पद्धतीने कंपनी चालवत असल्याची माहिती मिळाली.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- नागपूर विमानतळावरुन तीन तरुण ताब्यात, आयसिसच्या संपर्कात असल्याचा संशय
नागपूर विमानतळावरुन तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हे तरुण आयसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयातून नागपूर एटीएसने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून त्यांना हैदराबादला नेण्यात आलं आहे. आम्ही नागपूरहून जम्मू-काश्मिरला जात होतो, असा दावा तिन्ही युवक करत आहेत. अब्दुल वसीम, उमर हसन फारुखी, माज हसन फारुख अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावं आहेत. हे तिन्ही तरुण हैदराबादचे आहेत. हे तिघेही नागपूर विमानतळावरुन आज सकाळच्या विमानाने मध्य आशियातील कोणत्यातरी देशात जाण्याच्या तयारीत होते. आयसिसमध्ये सामील होण्यासाठी हे तरुण तिथे जात असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे.
४- एका उद्योगपतीने मोदी-शरीफ यांची भेट घडवून आणली
नवाज शरीफ यांनी नातीच्या लग्नाचं मोदींनी आमंत्रण दिलं होतं. मात्र मोदींनी आज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थेट लाहोर गाठलं. आता माध्यमांच्या वृत्तांनुसार, या दौऱ्याचं नियोजन आज सकाळीच करण्यात आलं होतं. पॅरिसमध्ये हवामान बदल परिषदेदरम्यान थोडी ‘हवा’ बदलली होतीच. कारण येथे मोदी आणि शरीफ यांच्यात काही मिनिटं चर्चा झाली होती. या बैठकीवरुन पत्रकार बरखा दत्त यांनी त्यांच्या ‘This Unquiet Land – Stories from India’s Fault Lines’ या पुस्तकात असा दावा केला आहे की, “नवाज आणि मोदी यांच्यातील ही बैठक 26 किंवा 27 नोव्हेंबर 2014 रोजी काठमांडूतील एका हॉटेलमध्ये झाली होती. या बैठकीचं आयोजन भारतातील स्टील व्यवसायातील मोठे उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी केलं होतं.” सज्जन जिंदाल हे काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदाल यांचे भाऊ आहेत.
५- मोदींच्या भेटीने दाऊद भारताला मिळणार का?: संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘सरप्राईज’ पाकिस्तान भेटीबाबत शिवसेनेने फारच आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘दहशतवाद पसरविणाऱ्या देशाविषयी शिवसेनेची भूमिका स्पष्ट आणि परखड आहे. त्यामुळे जोवर पाकिस्तान पूर्णपणे दहशतवाद थांबवित नाही तोवर पाकिस्तानशी कोणताहा संबंध ठेऊ नये अशी शिवसेनेची भूमिका आहे.’ असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी या भेटीवर थेट निशाणा साधला आहे.
६- राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे झटके
दिल्ली, एनसीआरसह उत्तर भारतात शुक्रवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रात्री १२.४५ ते १२.५५च्या दरम्यान हे धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे कोणतीही जिवित अथवा वित्तहानी झालेली नाही. या भूकंपाचे केंद्रबिंदू अफगाणिस्तानची राजधानी काबूल असल्याची माहिती मिळाली आहे. या भूकंपाची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल इतकी होती. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात भूकंपामुळे काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दिल्ली-एनसीआरसह चंदीगड, जयपूर आणि काश्मीरव्यतिरिक्त पाकिस्तानातील लाहोर आणि इस्लामाबादमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भारतात भूकंपाचे सर्वाधिक धक्के काश्मीरची राजधानी श्रीनगर आणि पाकिस्तानातील लाहोर शहरात जाणवले.
७- काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदी नवाज शरीफ यांच्याशी हस्तांदोलन करण्यासही तयार नव्हते, मग आता अचानक असे (लाहोरमध्ये शरीफ यांची भेट घेण्यासारखे) काय घडले? - काँग्रेस नेते मणी शंकर अय्यर यांचा सवाल
८- नवीन वर्षापासून एअर इंडिया डोमेस्टिक फ्लाईट्सच्या इकॉनॉमी क्लासमध्ये फक्त शाकाहारी जेवण
९- जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे बेरोजगार युवकांसाठी पोलिसांनी सुरू केली भरती मोहिम
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- शरद जोशींच्या मृत्यूपत्रात शेतकरी, सेवेकरी, ड्रायव्हरसाठी आयुष्याची कमाई दान
पुण्यातल्या आंबेठाण इथे शरद जोशी यांची 21 एकर जमीन आहे, जी अंगारमळा या नावानेही ओळखली जाते. त्यापैकी 14 एकर जमीन जोशींनी काही काळापूर्वी विकली होती. त्यातून आलेली रक्कम त्यांचे सेवेकरी, साथीदार आणि वाहन चालकांना दिली जावी, असं त्यांच्या मृत्यूपत्रात नमूद करण्यात आलं आहे. मागील 40 वर्षांपासून त्यांच्यासोबत वावरणारे सहकारी आणि शेतकरी संघटकचे संपादक प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे यांना 20 लाख रुपये, त्यांची देखभाल करणारे अनंत देशपांडे यांना 20 लाख रुपये आणि गेल्या 15 वर्षांपासून जोशींच्या गाडीचे ड्रायव्हर असलेल्या बबनराव गायकवाड यांना 10 लाख रुपये देण्यात यावे, असं इच्छापत्रात म्हटलं आहे.
११- मुंबईजवळ बुडणाऱ्या जहाजावरील आठ जणांची सुटका
मुरुडपासून 12 नॉटिकल मैल आणि मुंबईपासून 50 किमी अंतरावर एसएसव्ही सरोजिनी हे जहाज आलं असता, त्याच्या इंजिन रुममध्ये पाणी घुसण्यास सुरुवात झाली. जहाजावरील खलाशांनी 6.45 च्या सुमारास कोस्ट गार्डला कळवण्यात आली. ही माहिती 30 मैल दूर असलेल्या कोस्टगार्डच्या सम्राट जहावरील जवानांना दिली आणि त्यांनी तातडीने बचाव मोहीमेला सुरुवात केली. रात्री 6.45 ला सुरु झालेली बचाव मोहीम रात्री 10 वाजता संपली. सव्वा तीन तासांच्या या मोहीमेत तटरक्षक दलाच्या जवानांनी आठ मच्छिमांराची बुडणाऱ्या जहाजावरुन सुखरुप सुटका केली आणि सगळ्यांना मुंबईत आणलं.
१२- नववर्षच्या मुहूर्ताला कोकणाचा राजा बाजारात
रत्नागिरी : नवीन वर्षाच्या मुहूर्तावर कोकणचा हापूस आंबा तीन महिने आधीच भेटीला येणार आहे. हापूस आंब्याच्या आगमनासाठी अजून किमान तीन महिने असताना रत्नागिरीच्या पावस नजीकच्या गणेशगुळे येथील बागेत रत्नागिरी हापूस तयार झाला आहे. नाताळ आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनचं औचित्य साधत फळांचा राजा खवय्यांना भेटायला कोकणातील बागेतून थेट बाजारपेठेत येत आहे.
शशिकांत शिंदे या बागायतदाराने घेतलेल्या मेहनतीमुळे रत्नागिरीचा हापूस आंबा इतक्या लवकर तयार झाला आहे. शिंदे यांच्या बागेतील आंब्याच्या पाच पेट्या बाजारात पाठवण्यात आल्या आहेत. या पेटीला प्रत्येकी किमान दहा हजार रुपयांचा दर मिळेल अशी शशिकांत शिंदे यांची अपेक्षा आहे. मात्र हा आंबा चाखण्यासाठी तुमचा खिसा मात्र जड हवा
१३- अंबरनाथ; नेत्याच्या हत्येच्या निषेधार्थ सेनेचा बंद
अंबरनाथ नगरपरिषदेच्या मरोली प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज शिवसेनेकडून बंद पुकारण्यात आलाय. या बंदातून अत्यावश्यक सेवा, शाळा आणि कॉलेजेसला मात्र वगळ्यात आलंय... शुक्रवारी सकाळी १० च्या सुमाराला अंबरनाथ मोरोली रस्त्याने बाईकवरून जात असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी चॉपर आणि तलवारने गुंजाळ हल्ला चढविला. या प्राणघातक हल्ल्यात रमेश गुंजाळ यांचा मृत्यू झाला.गुंजाळ यांच्या हत्येने अंबरनाथ परिसरात खळबळ माजली आहे. या हत्येमुळे गेले काही दिवसांपासून शांत असलेल्या अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा हत्या सत्र सुरु होतं की काय अशी अंबरनाथकरांना भीती वाटत आहे.
१४- नवी दिल्ली: भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली परिवहन विभागाचे ३ अधिकारी निलंबित.
१५- मध्य प्रदेशमध्ये विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील ५ व्यक्तींचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- ठाणे; 25 वर्षापूर्वीच्या हत्येचा छडा लागला, एकाला अटक
एक दोन नव्हे तर तब्बल 25 वर्षांपूर्वी घडलेल्या हत्याप्रकरणाचा छडा लावण्यात ठाणे पोलिसांना यश आलं आहे. 16 मार्च 1990 रोजी दिवा-साबेगावमध्ये झालेल्या बाळाराम म्हात्रेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याचा अंगरक्षक विजय सिंग उर्फ अनिल रामसागर चौबेला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे याप्रकरणात लवकरच एका आमदाराला देखील अटक होण्याची शक्यता आहे. ऐंशीच्या दशकात ठाण्यातील आराधना टॉकीजजवळ गोऱ्यादादा नावाच्या इसमाची हत्या झाली होती. त्या हत्येचा सूड उगवण्यासाठी बाळाराम म्हात्रेनं मुंब्र्यातील रेतीबंदर परिसरात पिंट्यादादाची हत्या केली. मात्र हत्येचा बदला घेण्याचा हा सिलसिला सुरूच राहिला. 90च्या दशकात पिंट्या दादाच्या माणसांनी बाळाराम म्हात्रेला संपवलं. गेल्या 25 वर्षांपासून या खून प्रकरणाचा तपास सुरू होता. आता या प्रकरणात अटक होणारा राजकीय व्यक्ती कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
१७- मुंबईत ईस्टर्न फ्री वेजवळ 6 वर्षीय मुलाचा सांगाडा सापडला
मुंबईतील ईस्टर्न फ्री वेजवळील एका पोकळीत ६ वर्षीय मुलाचा सांगाडा सापडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. फ्री वेजवळ केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरु असताना हा सांगाडा आढळून आला. मृत मुलगा वडाळ्यातून 13 ऑक्टोबर 2015 पासून बेपत्ता होता. या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह येथील एका पोकळीत दडवून ठेवण्यात आला होता. फुरकन रहीम खान (वय 6) असे या मुलाचे नाव आहे. तो वडाळा येथील दिनबंधू नगर मध्ये राहणारा होता. वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी त्याची ओळख पटवली असून पुढील तपास सुरू आहे. फ्री वे ची ही पोकळी पूलाच्या खालील बाजूस असून ती सीएसटीपर्यंत आहे. ही एक विचित्र घटना असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून याबाबत अधिक तपास सुरु आहे.
१८- सांगलीत भावकीनं कुटुंबाला टाकलं वाळीत
सांगलीत आईच्या निधनानंतर सातव्या दिवशी उत्तर कार्य घेतल्याने भावकीने डूबल कुटुंबाला बहिष्कृत केलंय. गेले आठ महिने त्यांना कोणत्याही कार्यात सामावून घेतलेलं नाही. तासगाव तालुक्यातील धुळगाव इथं हा प्रकार घडलाय. आईच्या निधनानंतर तिच्या इच्छेनुसार धुळगावातल्या भगतसिंह डूबल यांनी सातव्या दिवशी उत्तर कार्य केलं. मात्र या कृत्याचा भावकीला राग आला. 26 एप्रिलपासून भावकीनं डुबल कुटुंबाला वाळीत टाकलंय. समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमास त्यांना बोलावले जात नाही. विविध बंधनं घालून छळण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप पीडित डुबल कुटुंबानं केलाय. यासंदर्भात डुबल यांनी तासगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीय.
१९- मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर टेम्पोला आग
पोस्टल डाकचं पार्सल घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग लागली. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे. यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. खंडाळा एक्झिटजवळ कूणे गाव पुलाच्या जवळ सात ते साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- आझादसाठी आमिर खान बनला सांता
बॉलीवूडचा मि.परफेक्टशनिस्ट म्हणून ओळखला जाणार आमिर खान चित्रपटात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभावतो. अशीच एक सांताची भूमिका आमिर खानने निभावली आहे, पण ती चित्रपटात नव्हे तर त्याच्या खर्याखुर्या जीवनात. मुलगा आझाद आणि त्याच्या मित्रांसाठी आमिर खान सांता बनला होता.
आमिरच्या घरी दरवर्षी ख्रिसमस सेलिब्रेशन करण्यात येतं. यावेळी हे सेलिब्रेशन अधिक खास करण्यासाठी तो चक्क सांताचं बनला होता. सॅण्टाक्लॉजच्या कपड्यांमध्ये येऊन आमिरने मुलगा आझादसह त्याच्या मित्रमंडळींना भरपूर गिफ्ट्स देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला. त्याच्या घरी झालेल्या या सेलिब्रेशनचे फोटो आमिरने फेसबुकवर टाकले आहेत. तसंच, त्याने सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या.
२२- 'तो' पराभव आजही मला बोचतोय: युवराज सिंह
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानिमित्तानं युवराजसिंगनं ट्वेन्टी-ट्वेन्टी संघात पुनरागमन केलं आहे. पण २०१४ सालच्या ट्वेन्टी-ट्वेन्टी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातल्या निराशाजनक कामगिरीच्या कटू आठवणी आजही युवराजसिंगला अस्वस्थ करून सोडतात. दस्तुरखुद्द युवराजनं त्याची कबुली दिली. गेल्या ट्वेन्टी-ट्वेन्टी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात युवराजला २१ चेंडूत केवळ अकराच धावा करता आल्या होत्या. युवराजची ती खेळी भारताच्या पराभवाचं एक कारण बनली होती. त्या सामन्यातल्या खराब कामगिरीमुळंच युवराजला भारतीय संघातून वगळण्यात आलं होतं. पण त्यानंतर शारीरिक तंदुरुस्ती, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीवर मेहनत घेऊन युवराजनं भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघात पुनरागमन केलं आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२३- मुखेड्मध्ये एकात्मिक पाणलोट कामात लाखोंचा घोटाळा; ३ कृषी अधिकाऱ्यांसह १२ कर्मचारी निलंबित
२४- महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह; केरळच्या धरतीवर तेहरा यांचा ई-टॉयलेटचा संकल्प
२५- तरोडा, कौठा, श्रावास्तीनगर, विनायकनगरमध्ये होणार नवे दवाखाने
२६- २७ डिसेंबर रोजी वजिराबाद येथील मारवाडी धर्मशाळेत वासुदेव समाजाचा वधू-वर परिचय मेळावा
२७- उमरी; वाळू, गौण खनिजाचे ट्रक्टर पकडून एक लाखाचा दंड
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
विरोधक एक असा गुरू आहे जो तुमच्या कमतरता परिणामांसहित दाखवून देतो.
[शिवाजी पोटे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
प्रोटीन >> आपल्या शरीराला दररोज आपल्या वजनाइतके प्रोटीनचि आवशकता असते. ते आपल्या आहारातून परिपूर्ण भेटत नाही. त्याची कमतरता भरून काढण्यासाठी
वेटगेनर >> मुले-मुली, पुरुष-महिला सर्वकाही आहार घेवून सुद्धा त्यांचे वजन वाढत नाही. ते काटकुळे व बारीक असतात. त्यांच्यासाठी उपयुक्त
फॅट बर्न >> चरबी कमी करणे व शरीराचे वजन कमी करणे. जे व्यक्ती आहार कमी घेवूनसुद्धा वजन कमी होत नाही त्यासाठी उपयुक्त [लवकर वजन कमी करते]
मल्टी व्हिटामिन्स >> आपल्या रोजचा आहारात परिपूर्ण व्हिटामिन्स, मिनरल्स, भेटत नाहीत त्याची कमतरता भरून काढण्यासाठी
एनर्जी ड्रिंक >> सर्व वयोगटातील खेळाडू, जिम करणारे, रिकव्हरी, स्ट्रेंग्थ, उर्जा वाढविण्यासाठी उपयुक्त. याचा वापर कोणीही करू शकते.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी, [नोव्हेंबरमधील नोंदीनुसार]
डिसेंबरमध्ये अड्ड झालेल्या सर्व ग्रुप स्वागत
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment