नमस्कार लाईव्ह २७-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- मोदींनी पाकिस्तानातल्या जनतेचं मन दुखावलंय, हाफिज सईदचा जळफळाट
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाकिस्तान दौर्याची जगभरात प्रशंसा होतेय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध सुधारण्यासाठी मोदींच्या दौर्याची मदत होईल, असं अमेरिकेने म्हटलंय. पण पाकिस्तानात मोदींच्या झालेल्या भव्य स्वागतामुळे मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा जळफळाट झालाय. नरेंद्र मोदींनी पाकिस्तानात येऊन पाकिस्तानातल्या जनतेचं मन दुखावलंय. त्यांचं पाकिस्तानात स्वागत का केलं गेलं असाही प्रश्न त्याने विचारलाय. अफगाणिस्तानच्या दौर्यात मोदींनी पाकिस्तानला दहशतवादासाठी जबाबदार ठरवलं आणि नंतर ते पाकिस्तानला आले, असं हाफिज सईदने म्हटलंय.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- मोदी-शरीफ भेटीमुळे लालकृष्ण अडवाणी समाधानी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान दौऱ्यावरुन देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी भारत-पाक संबंध सुधारण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल असल्याचं म्हटलं आहे. भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेले प्रयत्न आता पुढच्या टप्प्यात न्यायला हवेत. दहशतवादाच्या समस्येतून मार्ग काढायला हवा, असं मत यावेळी अडवाणींनी व्यक्त केलं.
३- पुणेकर गौतम बंबवाले यांची पाकमध्ये उच्चायुक्तपदी नियुक्ती
भारत आणि पाकिस्तानमधले संबंध सुधारावेत यासाठी स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ व्हावेत म्हणून मोदी सरकारनं गौतम बंबवाले यांची पाकिस्तानच्या उच्चायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भविष्यात त्यांना कोणत्या जबाबदारीचं शिवधनुष्य पेलायचं आहे. गौतम बंबवाले काल-परवापर्यंत फक्त आयएफएस अधिकाऱ्यांच्या वर्तुळाला परिचीत असलेलं हे नाव, सध्या चांगलच प्रकाशझोतात आलं आहे. कारण गौतम बंबवाले यांची भारताचे पाकिस्तानातील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४- रिलायन्स ‘जियो 4 जी सेवे’चा कर्मचार्यांपासून करणार शुभारंभ
रिलायन्स 4 जी सेवेची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. रिलायन्सचे संस्थापक स्वर्गीय धीरुभाई अंबानी यांच्या 83 व्या जयंतीचं औचित्य साधून रिलायन्स आपल्या महत्वाकांक्षी जियो 4 जी सेवा उद्या रविवारी 27 डिसेंबरला लाँच करणार आहे. रिलायन्स आपल्या जियो 4 जी सेवेची सुरुवात आपल्या कर्मचार्यांपासून करणार आहे. रिलायन्सच्या सर्व कर्मचार्यांसाठी जियो 4 जी सेवा ही प्रायोगिक तत्वावर लाँच करण्यात येईल. कमर्शियल लाँच होईपर्यंत रिलायन्सच्या सर्व कर्मचार्यांना मोफत 4 जी सेवेचा देणार आहे.
५- अमेरिकेच्या दबावामुळे मोदी पाकिस्तानला गेले -प्रकाश आंबेडकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानभेटीविषयी भारतात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना लक्ष्य केलंय. अमेरिका आणि युरोपच्या दबावामुळे मोदी पाकिस्तानला गेले असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. अमेरिका आणि युरोपकडून पाकला मिळणारी आर्थिक मदत थांबवावी. त्यानंतर पाक आर्थिक अडचणीत येईल तेव्हा भारतानं त्यांच्याशी चर्चा करावी असं मतही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. आर्थिक मदत पाक लष्कराकडे वळवली जाते, त्यातून लष्करी कुरघोडी सुरू होते. हे लक्षात ठेवावं. भाजपने दाऊदची रिटर्न गिफ्ट म्हणून मागणी करावी. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू असं आंबेडकर म्हणाले.
६- सत्तेसाठी थोर पुरुषांच्या नावाचा वापर केला जातोय-गडकरी
आपल्या मुलाला, मुलीला आणि चमच्यांना तिकीट देऊन सत्ता घेण्यासाठी थोर पुरुषांची नावं घेतली जातात आणि हे सर्वच पक्षांमध्ये होतं असं वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर टीकास्त्र सोडलं. ते अकोल्यात मराठा सेवा संघाच्या महाअधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. राजकारणात आजकाल जे सुरू आहे, ते राजकारण नाही. राष्ट्रकारण, समाजकारण आणि अर्थकारण हा राजकारणाचा अर्थ आहे. पण राजकारण आता केवळ सत्ता कारण झालंय असंही गडकरी म्हणाले. विदर्भात सोयाबीन पिकांची घात अधिक प्रमाणात होत आहे. सोयाबीनच्या पिकात घट का होत आहे. याच उत्तर आपल्या कृषी विद्यापीठ आणि महाबीजकडे नाही. तर, कृषी विद्यापीठाची आणि महाबीजच्या मोठ मोठ्या इमारतींचा उपयोग काय ? असा सवालही गडकरी यांनी केला. विशेष म्हणजे महाबीजचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार संजय धोत्रे यावेळी मंचावर उपस्थित होते.
७- भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र येऊन अखंड भारत तयार होईल - भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव
अल जझिरा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे मत व्यक्त केलंय. एकत्री करणाच्या प्रक्रियेवर माझा ठाम विश्वास आहे. हे तिन्ही देश एकत्र येण्यासाठी युद्ध करणयाची आवश्यकता नाही. युद्धाशिवाय लोकांच्या पुढाकारानेच ही प्रक्रीया घडेल असं ते म्हणालेत. मात्र ही एकत्री करणाची प्रक्रिया अशक्य असून त्याऐवजी दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणं गरजेचं असल्यांच काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर म्हणालेत.
८- आज 'मन की बात' - विविध योजनांतर्गत ४० हजार कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- विधानपरिषदेच्या सात जागांसाठी आज मतदान
विधान परिषदेच्या सात जागांसाठी आज मतदान होणार आहे. नागपूरच्या जागेवर भाजपच्या गिरीष व्यास यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर, धुळे-नंदुरबार, सोलापूर आणि अकोला- वाशिम- बुलडाणा जिल्ह्यातल्या एक-एका जागेसाठी मतदान पार पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी या उमेदवारांना निवडून देणार आहेत. काँग्रेसचे भाई जगताप, अंबरीशभाई पटेल, सतेज पाटील, राष्ट्रवादीचे रविंद्र सकपाळ आणि अपक्ष उमेदवार प्रसाद लाड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे विधान परिषदेवर जाऊ इच्छिणाऱ्या 12 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत तर 15 उमेदवार कोट्यधीश आहेत.
१०- मुंबई एंट्री पॉइंटवर पाचपट वसुली होऊनही टोलधाड सुरुच
कोल्हापुरात टोल रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा केली. पण, राजधानी मुंबापुरी अजूनही टोलधाडीने लुटली जात आहे. मुंबईच्या एंट्री पॉइंटवर बांधलेल्या पुलांचा खर्च 1560 कोटी होता. टोलच्या माध्यमातून तब्बल पाचपट म्हणजे 7322 कोटी रुपये वसुली होऊन सुद्धा अजूनही टोलवसुली सुरुच आहे.
११- चंद्रपूरच्या 5 वर्षीय चिमुरड्याचा लिम्बो स्केटिंगमध्ये विश्वविक्रम
चंद्रपूरच्या अवघ्या 5 वर्षांच्या शिशिर कामडी या चिमुकल्यानं लिम्बो स्केटिंग प्रकारात विश्वविक्रम केला आहे. शिशिरनं जमिनीच्या केवळ 6.67 इंचावर असलेल्या रॉड खालून 10 मीटरचं अंतर पार केलं.चंद्रपुरातल्या कन्यका सभागृहात शिशिरनं या नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली.
अडीच वर्षाचा असल्यापासून शिशिर लिम्बो स्केटिंगचा सराव करतो आहे. या आधीही शिशिरच्या नावावर याच क्रीडा प्रकारात अनेक विक्रम आहेत. लिम्बो स्केटिंग हा अत्यंत अवघड क्रीडा प्रकार मानला जातो. मात्र, ५ वर्षीच्या शिशिर कामडीने या क्रीडा प्रकारात नवा विश्वविक्रम केल्याचा दावा करण्यात येत आहे.
१२- ऑनलाईन शॉपिंगवर गाईच्या शेणाचा विक्रमी खप
हॉट केक्स प्रमाणे सध्या या साईटवर गोव-यांची विक्री होतीये. दिल्लीतील प्रीती शर्मा यांना ही आयडियाची कल्पना सुचली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात साकारलीय. एकाच आकाराच्या एकाच वजनाच्या गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गोव-या सध्या एमेझॉन डॉट कॉमवर तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. 419 रुपये किंमतीला गोव-यांचं हे पॅकेट विक्रीसाठी ठेवण्यात आलंय आणि त्याला शहरी भागातून मोठी मागणी मिळतीये.. आतापर्यंत 3 हजारांहून अधीक पॅकेट्सची विक्री झाल्याची माहिती प्रीति शर्मा यांनी दिलीये.. या गोव-यांचा वापर पूजा साहित्य म्हणून या गोव-यांना मोठी मागणी आहे.
१३- तेलंगण विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी मतदान सुरु.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- इस्लामपुरातील डॉक्टर दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी नर्ससह प्रियकर अटकेत
इस्लामपूरमधील प्रख्यात डॉक्टर दाम्पत्याच्या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. डॉक्टर कुलकर्णी यांची नर्स सीमा यादव आणि तिचा प्रियकर निलेश दिवाणजी या दोघांना रात्री उशिरा अटक करण्यात आलं आहे. इस्लामपूरमध्ये 20 डिसेंबरला 65 वर्षीय डॉ. प्रकाश कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी 58 वर्षीय डॉ. अरुणा कुलकर्णी यांची राहत्या घरी चाकून भोसकून हत्या करण्यात आली होती. हत्येवेळी डॉक्टर दाम्पत्याच्या घरात कुणीच हजर नव्हतं. डॉ. प्रकाश कुलकर्णी यांचा मृतदेह बेडरुममध्ये, तर त्यांच्या पत्नीचा म्हणजे डॉ. अरुणा कुलकर्णींचा मृतदेह स्वयंपाकघरात आढळला. डॉ. प्रकाश कुलकर्णी फिजिशिअन, तर डॉ. अरुणा कुलकर्णी स्त्रीरोग तज्ज्ञ होत्या.
१५- नवी मुंबई; लग्नाच्या तगाद्यामुळं रिक्षाचालकाने रचला अपहरणाचा बनाव
स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचून बेपत्ता झालेल्या रिक्षाचालकाला हुडकून काढण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलं आहे. 15 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मच्छिंद्र भोईर या रिक्षाचालकाला नेरूळ रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मच्छिंद्र भोईरचं बेपत्ता प्रकरण चांगलंच गाजतं आहे. कारण बेपत्ता होण्यापूर्वी त्यानं एक व्हिडिओ व्हायरल केला होता. चार इसमांनी मच्छिंद्रला बेदम मारहाण करून त्याच्याजवळचे पैसे उकळल्याचं त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे मच्छिंद्रचा घात तर झाला नाही ना? अशी शंका पोलिसांना सतावत होती. मात्र, शुक्रवारी मच्छिंद्र नेरूळ रेल्वे स्थानकावर फिरत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. टीबीचा आजार आणि लग्नासाठी प्रेयसी आणि घरच्यांनी लावलेला तगादा याला कंटाळून मच्छिंद्रनं स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला होता.
१६- बिहारच्या सीतामरीमध्ये अज्ञाताचा क्लिनिकवर गोळीबार, पोलिसांकडून तपास सुरु
१७- कोलकात्यातील डम डम पार्कमध्ये आग ; आग विझविण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल
१८- गाझियाबादमध्ये मालगाडीचा डब्बा रुऴावरुन घरसला, दिल्ली- हावडा मार्गावर अडथऴा
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- सनी लिऑनसोबत फोटो काढू नका, प्रियंका चोप्राची फोटोग्राफर्सना विनंती
बॉलिवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोप्राने पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या सनी लिऑनसोबत असं विधान केलं की, ते ऐकून सनी लिऑनलाही धक्का बसला असेल. सनी लिऑनसोबत तरी फोटो काढू नका, अशी विनंती प्रियंकाने उपस्थित फोटोग्राफर्सना केली. हे सर्व घडलं स्टार गिल्ड पुरस्कार सोहळ्यादरम्यान.त्याचं झालं असं की, पुरस्कार सोहळ्याच्या सुरुवातीला प्रियंका चोप्रापाठोपाठ सनी लिऑनचं रेड कार्पेटवर आगमन झालं. त्यामुळे फोटोग्राफर्सनी दोघींचे एकत्र फोटो काढण्याची विनंती केली. त्यानंतर फोटोग्राफर्सनी प्रियंका आणि सनी लिऑनला फोटोसाठी पोझ देण्यास सांगितले. त्यानंतर प्रियंका म्हणाली, “अरे हिच्यासोबत तरी फोटो नका काढू यार” प्रियंका चोप्राची ही प्रतिक्रिया ऐकून सनी लिऑन गोंधळूनच गेली आणि ती काही वेळ प्रियंकाकडे एकटक पाहत उभी होती. मात्र, हे बोलल्यानंतर प्रियंकाने मस्करी केल्याचं सांगत ती हसायला लागली आणि दोघींनीही पोझ देत एकत्र फोटोशूट केलं.
२०- दबंग सलमान खानचा आज ५० वा वाढदिवस
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२१- किनवट; अंत्यविधीस चाललेल्या आटोची ट्रक्टरशी धडक; एक ठार, तीन जखमी
२२- लोहा; कामळज गावाच्या डासमुक्त पॅटर्नची हरियाणाच्या पथकाकडून पाहणी
२३- शिवाजीनगरचे मनपा रुग्णालय असुविधांच्या भोवऱ्यात, आयुक्तांना विरोधीपक्ष नेता कल्याणकर यांचे निवेदन
२४- शासकीय रुग्णालयात प्रसुतीदरम्यान मृत्यू; शिकाऊ डॉक्टरवर हलगर्जीपणाचा आरोप
२५- आंबेडकरवादी मिशनचा १ जानेवारीला वर्धापन दिन; शंकरराव चव्हाण सभागृहात भव्य सोहळ्याचे आयोजन
~~~~~~~~~~~~~~~
२६- थर्टी फर्स्टची मस्ती करण्यापासून सावधान, डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडिओ
http://goo.gl/TxBKeM
~~~~~~~~~~~~~~~
२७- राम गोपाल वर्माच्या 'किलिंग वीरप्पन'चा जबरदस्त ट्रेलर
http://goo.gl/YX9SfR
~~~~~~~~~~~~~~~
२८- आरोग्य संपन्नतेसाठी डासमुक्त अभियानाची गरज – प्रणिताताई देवरे- चिखलीकर यांचे प्रतिपादन
http://goo.gl/piVJEa
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
गजानन पवार, प्रतिक गहाणकर, अनंत सावंत, तामिर शेख, सुधीर पड्घने, महेंद्र गायकवाड, संदीप पावडे, बालाजी पांचाळ, निलेश दातीर, प्रवीण, विजय कऱ्हाळे, योगेश जेठे, सोनू अमृतवाड, संतोष डी.
पाटील
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
लोकांना वाटतं कि काळा रंग अशुभ असतो, प्रत्येक काळ्या रंगाचा फळा विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवत असतो
[मंगेश साळुंके, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
प्रोटीन >> आपल्या शरीराला दररोज आपल्या वजनाइतके प्रोटीनचि आवशकता असते. ते आपल्या आहारातून परिपूर्ण भेटत नाही. त्याची कमतरता भरून काढण्यासाठी
वेटगेनर >> मुले-मुली, पुरुष-महिला सर्वकाही आहार घेवून सुद्धा त्यांचे वजन वाढत नाही. ते काटकुळे व बारीक असतात. त्यांच्यासाठी उपयुक्त
फॅट बर्न >> चरबी कमी करणे व शरीराचे वजन कमी करणे. जे व्यक्ती आहार कमी घेवूनसुद्धा वजन कमी होत नाही त्यासाठी उपयुक्त [लवकर वजन कमी करते]
मल्टी व्हिटामिन्स >> आपल्या रोजचा आहारात परिपूर्ण व्हिटामिन्स, मिनरल्स, भेटत नाहीत त्याची कमतरता भरून काढण्यासाठी
एनर्जी ड्रिंक >> सर्व वयोगटातील खेळाडू, जिम करणारे, रिकव्हरी, स्ट्रेंग्थ, उर्जा वाढविण्यासाठी उपयुक्त. याचा वापर कोणीही करू शकते.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment