Wednesday, 30 December 2015

मुखेड मध्ये असंख्य युवा कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश



मुखेड मध्ये असंख्य युवा कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश 

            मुखेड :- रियाज शेख
                             

                              शहरातील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्ये जिल्हा सरचिटणीस दत्ताभाऊ शेंबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहिर प्रवेश केला. शासकीय विश्रामगृह मध्ये आयोजीत बैठकीमध्ये शहर अध्यक्ष संतोष बनसोडे, माजी तालुका अध्यक्ष अशोक बच्चेवार, माजी सरचिटणीस अँड यशवंत सुभेदार, भाऊसाहेब गायकवाड़, विशाल गायकवाड़, मनोहर गंदपवाड, गोविंद गंगासागरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शहर अध्यक्ष संतोष बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील युवक कार्यकर्ते परमेश्वर आडगुलवार यांच्या सह रवी चौपवाड, माधव पंदिलवाड, अविनाश घोरपडे, सुनिल चौपवाड, दत्ता पानचवरे सह असंख्य युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी सर्व युवक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच परमेश्वर आडगुलवार यांची मनसे शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. आगामी काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहरात प्रत्येक वार्डात नवीन शाखा स्थापन करणार असल्याचे शहर अध्यक्ष बनसोडे यांनी सांगीतले .

No comments: