Tuesday, 22 December 2015

नमस्कार लाईव्ह २२-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २२-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
१- भुजबळांना दणका, 110 कोटींची संपत्ती जप्त 

                     महाराष्ट्र सदन, भूखंड घोटाळा अशा प्रकरणात अडचणीत आलेले राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या मालमत्तेवर अखेर टाच आणण्यास सुरुवात झाली आहे. ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने भुजबळांच्या वांद्रे आणि सांताक्रुजमधली संपत्ती जप्त केली आहे. ही कारवाई अद्यापही सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. ईडीनं वांद्रे आणि सांताक्रुजमधील जप्त केलेली संपत्ती अंदाजे 110 कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे.

२- दाभोलकर हत्या: पोलिस निरीक्षकांना धमकी देणारे सापडले 
                      डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय पोलिस निरीक्षकाना धमकीचे मेसेज पाठवणारे सापडले आहेत. याप्रकरणाचा तपास करताना आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. पोलिस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांना जीवे मारण्याची धमकी देणारे आणि २५ लाख रुपयांची खंडणी मागणारे मेसेज आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. परंतु आता पोलिसांच्या तपासात सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक या गावातील एका दाम्पत्याने हे मेसेज पाठवल्याचं उघड झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे पूर्व वैमनस्यातून एका व्यक्तीला त्रास देण्यासाठी, हे मेसेज चंद्रकांत आणि संगीता मोहिते या दाम्पत्याने पाठवल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे.

३- राम जेठमलानींचे 'निर्भया' प्रकरणी लज्जास्पद वक्तव्य 

                       जुवेनाईल कायद्याबाबत वरिष्ठ वकिल राम जेठमलानी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. जेठमलानी म्हणाले ही  (निर्भया) एक छोटीशी घटना आहे. जी व्हायला नको होती. पण त्यामुळे प्रभावित होऊन जुवेनाईल कायद्यात कोणताही बदल होणे गरजेचे नाही आणि योग्य नाही. जेठमलानी म्हणले मला नाही माहित की राज्यसभेत हे विधेयक पास होईल की नाही. पण माझ्यामते ते व्हायला नाही पाहिजे. काय फरक पडतो, निर्भया गँगरेप एक अनावश्यक घटना आहे. यामुळे विधेयकात कोणताही बदल व्हायला नको. दुसरीकडे जेठमलानी यांनी असे वादग्रस्त विधान केले असताना राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरू आहे. संसदेत सुरू असलेल्या जुवेनाईल कायद्यावर चर्चा व्हावी या मागणीसाठी निर्भयाचे आई-वडील राज्यसभेत पोहचले.

४- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार सिद्ध करावा अन्यथा पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा - केजरीवाल 

५- माझ्यामुळेच भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी हवाला प्रकरणातून सुटले - जेष्ठ वकील राम जेठमलानी 


६- डीडीसीए घोटाळा प्रकरणी चौकशी आयोग नेमण्याचा दिल्ली सरकारला अधिकार नाही - विजेंद्र गुप्ता, भाजप आमदार 

७- अनधिकृत झोपडया हटवण्याची प्रक्रिया निश्चित करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाचे दिल्ली पोलिस आणि डीयूएसआयबीला चार आठवडयांच्या आत बैठक घेण्याचे निर्देश 

~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- महाराष्ट्राला उद्या केंद्राची मदत : खा. नाना पटोले 

                        केंद्राच्या मदतीकडे डोळे लावून बसलेल्या दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी उद्या (बुधवारी) केंद्र सरकारच्यावतीने भरीव मदतीची घोषणा करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा खासदार नाना पटोले यांनी आज (मंगळवारी) दिली. सलग चार वर्षांपासून महाराष्ट्रातील मराठवाडा-विदर्भासह अन्य भागात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक येऊन महिना उलटला तरी अद्यापही केंद्राकडून मदतीची घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे दुष्काळी जनता हवालदिल झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा खासदारांच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेऊन त्यांना दुष्काळी जनतेसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर उद्याच (बुधवारी) दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मदतीची घोषणा करण्यात येणार असल्याचे आश्वासन जेटली यांनी दिलं. तसंच ही मदत अन्य राज्यांच्या तुलनेत भरीव स्वरूपाची असेल, असंही जेटलींनी सांगितल्याची माहिती पटोले यांनी दिली आहे.

९- भ्रष्टाचारी मंत्र्यांना हटवणारा मी पहिला मुख्यमंत्री - केजरीवाल 

१०- शाहरुख खानविरोधात 'ट्रॅफिक कंट्रोल'कडे तक्रार 

                  अभिनेता शाहरुख खानविरोधात वाहतूक नियंत्रण कक्षाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर उभी असलेली व्हॅनिटी व्हॅन रस्त्यावर पार्क केल्याने ही तक्रार करण्यात आली आहे. शाहरुखच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ बंगल्याबाहेरील रस्त्याच्या कडेला ही व्हॅन उभी आहे. मात्र यामुळे वाहतुकीला अडथळ होत असून, खाजगी वाहन सार्वजनिक रस्त्यावर का, असा सवाल विचारत ‘वॉचडॉग’ फौंडेशनने ही तक्रार केली आहे.  त्यामुळे आता मुंबई वाहतूक पोलीस कारवाईचा बडगा उचलण्याची शक्यता आहे. याच व्हॅनिटी व्हॅनसाठी शाहरुखने अनधिकृत रॅम्प बांधला होता. त्याच्यावर मुंबई महापालिकेने 14 फेब्रुवारी 2015 रोजी हातोडा चालवला होता. इतकंच नाही तर शाहरुखकडून 1 लाख 93 हजारांची नुकसान भरपाईही वसूल करण्यात केली होती. या आधी महाराष्ट्र कोस्टल झोन मँनेजमेंट अँथोरिटी कडून कारवाई झाली होती, आता शाहरुखवर ट्रॅफिक कंन्ट्रोलकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

११- पत्रकार जे.डे.हत्या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला ७ जानेवारीला हजर करण्यासाठी मुंबई न्यायालयाने वॉरंट बजावले 

१२- लहान मुलांना पॉर्न सहजतेने उपलब्ध असल्यामुळे त्यांची विचारसरणी बिघडत चालली आहे - वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस 

~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- सोलापूर; पोटच्या लेकराला दगडाने ठेचून जमिनीत पुरण्याचा आईचा प्रयत्न 
                         आई-लेकराच्या नात्याला काळीमा फासणारी घटना सोलापुरात घडली आहे. आईनेच सहा महिन्यांच्या बाळाला दगडाने ठेचून त्याला जमिनीत पुरण्याच्या प्रयत्न केला. संबंधित महिलेने पहिल्यांदा मुलाला दगडाने ठेचलं आणि त्यानंतर बाळाला पोत्यात गुंडाळून एका पडक्या इमारतीखाली त्याला जिवंतच जमिनीत पुरत होती. परंतु हा प्रकार सुरु असताना कचरा वेचणाऱ्या महिलांनी तिला हटकलं आणि हे संपूर्ण प्रकरण उजेडात आलं. या घटनेत बाळाला गंभीर दुखापत झाली असून पोलिसांच्या मदतीने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी या महिलेने बाळाला विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण पतीचा अपघात झाल्याचं सांगत ती बाळाला गुपचूप घेऊन गेली. आता पुन्हा एकदा तिने बाळाला मारण्याचा प्रयत्न केला.

१४- लोहा; ग्राम पंचायत स्तरावर शासकीय कर्मचाऱ्यांचे कामकाज व सेवा शुल्क आकारणीचे माहिती व सूचना फलक लावणे संबंधी जिल्हधीकारयांना निवेदन 

१५- जळगाव; एक्स्प्रेसमधून २२ लाखांची रोकड जप्त 
                 अहमदाबाद एक्स्प्रेसमधून हवालाची रक्कम नेत असताना आरपीएफनं एकाला अटक केलीय. जळगाव रेल्वे स्टेशनवर या आरोपीला अटक करण्यात आलीय. तब्बल 22 लाखांची रोकड नेत असताना रणजीत ठाकूर याला अटक करण्यात आलीय. रणजीत अमरावतीहून सुरतला ही रोकड नेत होता. हजारांच्या नोटांचे 6 तर 500 च्या नोटांचे 32 बंडल आरपीएफनं त्याच्याकडून जप्त केले आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे आरपीएफनं ही कारवाई केली आहे. रणजीत ठाकूर नेमकं ही रक्कम कशासाठी आणि कुठं घेऊन जात होता याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

१६- पुणे : जंगली महाराज रोजवर बालगंधर्व जवळ गुन्हेगाराला हटकल्यामुळे पोलीस कर्मचारी मयुर भोकरेवर केला गोळीबार 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- 'जय गंगाजल'चा पहिला ट्रेलर लाँच, प्रियंका चोप्राचा खास लूक

                   बाजीराव-मस्तानी या सिनेमात प्रियंका चोप्राने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवित प्रेक्षकांना आपली दखल घ्यायला लावली. आता या सिनेमानंतर प्रियंकाच्या चाहत्यांसाठी आणखी एक खूशखबर आहे. अमेरिकन शो क्वांटिकोचं शुटींग पूर्ण झालं असून प्रियंका भारतात परतली आहे. भारतात परताच तिचा आगामी सिनेमा जय गंगाजलचा पहिला ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. क्वांटिको या मालिकेने प्रियंकाला एक नवी ओळख मिळवून दिली आणि या मालिकेनंतर हा सिनेमा तिला ऑफर करण्यात आला.

१८- 'बाजीराव'चं बाजीगरला ओव्हरटेक, कमाईत रस्सीखेच सुरु 

                     ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिलवाले’ या दोन बिग बजेट चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर रस्सीखेच सुरु आहे. सोमवारी ‘बाजीराव’ने ‘दिलवाले’ला मागे टाकत एका दिवसाच्या कमाईत आघाडी घेतली. मात्र ‘दिलवाले’ एकूण कमाईत ‘बाजीराव’च्या पुढेच आहे. ‘दिलवाले’ चित्रपटाने पहिल्या विकेंडला 65.09 कोटींची कमाई केली. पहिल्या दिवशी 21 कोटी कमावणाऱ्या शाहरुखच्या ‘दिलवाले’ने दुसऱ्या दिवशीही कमाईची आगेकूच कायम ठेवली. दुसऱ्या दिवशी म्हणचे शनिवारी ‘दिलवाले’ने 20.09 कोटी, तर रविवारी या सिनेमाने 24 कोटी रुपयांचा गल्ला सोमवारी ‘दिलवाले’च्या कमाईत 50 टक्क्यांची घसरण झाली, आठवड्याच्या पहिल्या दिवशी ‘बाजीगर’ने अवघ्या 10.09 कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे पहिल्या चार दिवसांमध्ये दिलवालेच्या कमाईचा आकडा 75.18 कोटी इतका झाला आहे. परदेशात शाहरुख-काजोल जोडीला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘दिलवाले’ने परदेशात 56.38 कोटींचा बिझनेस केला दुसरीकडे प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमानेही बक्कळ गल्ला जमवला आहे. सोमवारी 10.25 कोटींची कमाई करत ‘बाजीराव’ ने एका दिवसापुरती आघाडी घेतली. ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमाने पहिल्या दिवशी 12.80 कोटी आणि शनिवारी 15.52 कोटींची कमाई केली होती. रविवारीही कमाईचा आकडा 18.45 कोटींवर पोहोचला आहे. त्यामुळे या तीन दिवसात ‘बाजीराव मस्तानी’ने 46.77 कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे. तर परदेशात दिलवालेच्या तुलनेत हा सिनेमा खूपच पिछाडीवर आहे. कारण परदेशातील कमाईचा आकडा 5 कोटींच्याच घरात आहे.

१९- दि. २३-१२-२०१५ ची नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेस दुपारी एक वाजता सुटेल 
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२०- बिलोली; MIM चे शे. गौस यांचा कॉंग्रेस प्रवेश
http://goo.gl/DOYPVO

~~~~~~~~~~~~~~~
२१- बिलोली; गुरूजनांचा आदर करा - डाँ लखमावार
http://goo.gl/fjLVVc
~~~~~~~~~~~~~~~
२२- किनवट-माहूर; आदिवासी परधान समाजाच्या वतीने नागपूर अधिवेशनावर विराट मोर्चा
http://goo.gl/otbQun
~~~~~~~~~~~~~~~
२३- गरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम करा - काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव हरेकृष्णा यांची किनवट विश्राम गृहात आढावा बैठक
http://goo.gl/E2QA4u
~~~~~~~~~~~~~~~
२४- २३ डिसेंबरला मुक्रमाबाद येथे मोफत स्त्रि रोग निदान व पंचकर्म शिबिराचे आयोजन
http://goo.gl/mS4Gl8
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हवर नोंदवा आपले मत, खालील लिंकला क्लिक करून--
प्रश्न;- नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कॉंग्रेस दोषी आहे असे वाटते का?
http://goo.gl/wMLuSZ
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
स्वतःला घडविण्यासाठी आपला वेळ खर्च करा म्हणजे दुसर्यांना दोष द्यायला तुम्हला वेळच मिळणार नाही.
[वर्षा मोहिते, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
प्रोटीन >> आपल्या शरीराला दररोज आपल्या वजनाइतके प्रोटीनचि आवशकता असते. ते आपल्या आहारातून परिपूर्ण भेटत नाही. त्याची कमतरता भरून काढण्यासाठी
वेटगेनर >> मुले-मुली, पुरुष-महिला सर्वकाही आहार घेवून सुद्धा त्यांचे वजन वाढत नाही. ते काटकुळे व बारीक असतात. त्यांच्यासाठी उपयुक्त
फॅट बर्न >> चरबी कमी करणे व शरीराचे वजन कमी करणे. जे व्यक्ती आहार कमी घेवूनसुद्धा वजन कमी होत नाही त्यासाठी उपयुक्त [लवकर वजन कमी करते]
मल्टी व्हिटामिन्स >> आपल्या रोजचा आहारात परिपूर्ण व्हिटामिन्स, मिनरल्स, भेटत नाहीत त्याची कमतरता भरून काढण्यासाठी
एनर्जी ड्रिंक >> सर्व वयोगटातील खेळाडू, जिम करणारे, रिकव्हरी, स्ट्रेंग्थ, उर्जा वाढविण्यासाठी उपयुक्त. याचा वापर कोणीही करू शकते.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
*  *  *  *  *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी, [नोव्हेंबरमधील नोंदीनुसार]
डिसेंबरमध्ये अड्ड झालेल्या सर्व ग्रुपचे स्वागत
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
 १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: