" मुखेड पोलिस प्रशासन व अवैध वाहतुकीच्या विरोधात दोन तास रास्ता रोको "
" विद्यार्थ्यांसह, व्यापा-यांचा आंदोलनास पाठिंबा "
[रियाझ. खान, तालुका प्रतिनिधी[
मुखेड :-
शहरातील राज्य महामार्गावर एसटी बस स्टाँप, पोलिस चौकी समोर अवैध वाहतुक करणा-या काळी-पिवळी जिप, अँटो, प्रवासी ट्रवल्स मुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. पोलिस प्रशासन फक्त बघ्याची भुमिका घेत आहे. यागाड्यामुळे येणा-या - जाणा-या नागरिकांना याचा त्रास होत असल्यामुळे जनता विकास मंचाच्या वतीने माजी नगरसेवक राहुल लोहबंदे यांच्या नेतृत्वामध्ये दि.21 डिसेंबर 2015 रोज सोमवारी संप्तत नागरिकांनी दोन तास "रास्ता रोको" आंदोलन केले.
याआंदोलनात मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक, युवक व व्यापारी सहभागी होते. यावेळी नायब तहसीलदार एस.एम.पांडे व पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यापुढे बस स्टाँप परिसराच्या 200 मीटर मध्ये अवैध प्रवासी वाहतुक थांबणार नसल्याचे पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी सांगीतले.
शहरातील प्रमुख मार्गावर एसटी बस स्टँड व पोलिस चौकी सह लोखंडे चौक ते डाँ.आंबेडकर स्मारकपर्यंत अवैध प्रवासी वाहतुक करणा-या काळी- पिवळी जीप, अँटो, टँव्हल्स चालकांनी मनमानी पध्दतीने रस्त्याच्या मध्यभागी कोठेही गाड्या थांबा करत वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत. याबाबत विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी लेखी व तोंडी तक्रार पोलिस स्टेशन मध्ये करुन सुध्दा कोणताच परिणाम झाला नाही. नागरिकांना विशेष महिला, शाळकरी विद्यार्थींना या वाहतुकीच्या कोंडीमुळे प्रचंड त्रास होत आहे. याकडे पोलिस प्रशासन जाणुन बुजुन कानाडोळा करत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी जनता विकास मंचातर्फे सोमवारी दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पोलिस चौकी समोर दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्याताले. यावेळी माजी नगरसेवक राहुल लोहबंदे, काँ. बालाजी घोडके, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे, महिला आघाडी प्रमुख मथुराबाई पुठ्ठेवाड संदिप पिल्लेवाड, आशित भारदे आदींनी आपल्या मनोगतातुन पोलिस प्रशासनच्या निष्क्रियतेबद्दल व अवैध वाहतुक करणा-याविरोधात तीव्र नाराजगी व्यक्त करत परिसरात अवैध वाहतुक नाही थांबल्यास मोठा जन आंदोलन करणार असल्याचा ईशारा प्रशासनास दिला.
या आंदोलनामध्ये गंगाधर सोंडारे, बालाजी बनसोडे, राजमुद्रा ग्रुप चे सचिन पाटील, पंकज गायकवाड़, शौकत होनवडजकर, सुरेंद्र भद्रे, शेख गौस, मिलिंद लोहबंदे, गौतम कांबळे, कपील गोणारकर, गवळे आदी सह सेकडो नागरिक, व्यापारी, कार्यकर्ते सहभागी होते.
रास्तारोको दरम्यान पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, सपोनि के.एन.चव्हाण, पिएस आय बिराजदार, पिएस आय सुदर्शन सुर्वे, डिएस बी विभागाचे भगवान केंद्रे, गारोळे यांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
आंदोलनानंतर पोलिस प्रशासन जागे झाल्यानंतर राज्य महामार्गावरील अवैध वाहतूकीसह रस्त्यावर ठेवलेल्या अतिक्रमण काढण्याचे कार्य शुरु आहे. पोलिस प्रशासन किती दिवस अवैध प्रवासी वाहतुकीच्या वाहनास रोखणार हे येणारा काळच सांगेण. याकडे सर्व नागरिकांच्या नजरा लागुन आहेत.


No comments:
Post a Comment