Monday, 28 December 2015

नमस्कार लाईव्ह २८-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २८-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- नातीच्या लग्नात शरीफ यांनी परिधान केला मोदींनी भेट दिलेला फेटा 

                    लाहोर : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपल्या नातीच्या दावत-ए-वलीमामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट म्हणून दिलेला गुलाबी रंगाचा फेटा परिधान केली होता. मागील आठवड्याच्या शुक्रवारी शरीफ यांच्या नातीचा निकाह झाला होता. पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या आणि नातीच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. तसंच फेटा भेट म्हणून दिला होता. राजस्थानी पद्धतीचा गुलाबी फेटा नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान दौऱ्यात शरीफ यांना राजस्थानी पद्धतीची गुलाबी फेटा भेट दिला होता, जो शरीफ यांनी रविवारी परिधान केला होता. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजच्या सुत्रांनुसार, “मोदींनी भेट म्हणून दिलेला फेटा परिधान करुन शरीफ यांचा शेजारच्या देशाप्रती असलेला प्रामाणिक उद्देश दिसतो. याशिवाय शरीफ नरेंद्र मोदींच्या भेटवस्तूला किती महत्त्व देतात, हेदेखील यातून दिसतं.”

२- सीरियात बॉम्बस्फोटात १४ जण ठार  
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- मोदी सरकारची जाहिरातींवर 850 कोटींची उधळपट्टी 

                     पुणे : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात फक्त जाहिरातींवर 850 कोटींहून अधिक रक्कम खर्च केल्याचं उघड झालं आहे. पुण्यातील वकील प्रणय अजमेरा यांनी केंद्र सरकारच्या जाहिरात आणि दृकश्राव्य प्रसिद्धी महासंचालनयाकडून माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत मिळवलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून करण्यात आलेल्या बहुतांश जाहिरातींमधे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच छबी झळकत असते, असेही निदर्शनास आले आहे. वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके ही मुद्रीत माध्यमे असोत, की खासगी टीव्ही चॅनेल्स, रेडियो स्टेशन्स, दूरदर्शन यासारखी इलेक्ट्रॉनिक माध्यमे असोतकिंवा अगदी फेसबुक, ट्विटर किंवा व्हॉट्सअॅप ही सोशल मीडिया असो, या सर्व माध्यमांमधून केंद्र सरकारच्या जाहिरातींचा भडीमार सातत्याने सुरु आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी, जी कामे पूर्ण झाली आहेत. त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा लोकोत्तर महापुरुषांच्या जन्मतिथी आणि पुण्यतिथीला त्यांना अभिवादन करण्यासाठी अशा विविध कारणांसाठी केंद्र सरकारकडून जाहिराती दिल्या जातात. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून या जाहीरातींच प्रमाण जाणवेल इतपत वाढलं.त्यामुळे पुण्यातील एक वकील प्रणय अजमेरा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला आरटीआयअंतर्गत  जाहिरातींवर झालेल्या खर्चाची माहिती मागितली. सुरुवातीला त्यांना उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली. परंतु त्यांनी केलेल्या सततच्या  पाठपुराव्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेली माहिती धक्कादायक होती.

४- वार्षिक १० लाखाचं उत्पन्न असणाऱ्यांना १ जानेवारीपासून गॅसचे अनुदान नाही 

५- 'काँग्रेस दर्शन' मुखपत्राचे संपादक (कन्टेंट एडिटर) सुधीर जोशी निलंबित

६- अंबरनाथ : शिवसेना नगरसेवक रमेश गुंजाळ हत्याप्रकणातील चारही आरोपींना उल्हासनगर कोर्टाने सुनावली ६ दिवसांची पोलीस कोठडी. 

७- दिल्लीच्या रस्त्यावर सम आणि विषम क्रमांकाच्या गाडी योजनेची ३० डिसेंबरला सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत रंगीततालिम 
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- 'समृद्ध जीवन'चे महेश मोतेवार उस्मानाबाद पोलिसांच्या ताब्यात 

                  ‘समृद्ध जीवन’चे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांना उस्मानाबाद पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुण्यात मोतेवारांना ताब्यात घेतलं असून सध्या त्यांना पुण्याहून उस्मानाबादला नेण्यात येत आहे. महेश मोतेवार यांना उस्मानाबादच्या मुरुम पोलिसांनी फरार घोषित केलं होतं. चिटफंड प्रकरणी गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात महेश मोतेवार यांना CRPC 299 प्रमाणे फरार घोषित करण्यात आलं आहे. महेश मोतेवार महाराष्ट्र पोलिसांना गेल्या 2 वर्षापासून सापडले नाहीत. उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुम पोलिस ठाण्यात आहे 420 , 448 , 427 , 491 34 कलमांअंतर्गत मोतेवारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डेअरी प्रकल्पामध्ये भागीदारी देण्याचे अमीष दाखवून 35 लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी 2012 मध्ये उमरगा कोर्टाच्या आदेशाने गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी कोर्टात 2013 साली आरोपपत्र दाखल करताना मोतेवार यांना फरार घोषित केलं होतं.

९- मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात लवकरच रोबो 

                   मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात लवकरच रोबो दाखल होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नसला तरी आज आयुक्तांसमोर त्याचं सादरीकरण करण्यात आलं.

भायखळा अग्निशमन स्टेशनमध्ये दलातील जवानांच्या कवायत स्पर्धा झाल्या. यात अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन प्रकारच्या कवायत स्पर्धा सादर केल्या. आगीत अडकलेल्या व्यक्तीला 55 सेकंदांत रेस्क्यू करणं, अतिशय अवघड ठिकाणी कमीत कमी वेळात जवान पोहोचवणं अशा स्पर्धांचा यात समावेश होता.

१०- दिवसाढवळ्या कॉलेजच्या गेटसमोर विद्यार्थीनीचे अपहरण, ३ संशयीतास अटक करण्यात पोलिसांना यश 

                                   दिल्लीतल्या गुडगावामध्ये दिवसाढवळ्या एका कॉलेजच्या गेटसमोरून विद्यार्थिनीचं अपहरण करण्यात आलंय. अपहरणाची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. अपहरणानंतर काही तासात या विद्यार्थिनीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय. ही मुलगी सुरक्षित असल्याचा दावा गुडगाव पोलिसांनी केलाय.  अपहरणकर्त्यांनी कॉलेजच्या गेटसमोरच या तरूणीला जबरदस्तीनं ओढत नेऊन गाडीत घातलं आणि गाडीतून तिला घेऊन गेले. नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून हे अपहरणकर्ते आले होते.  एकूण चार अपरहरणकर्ते असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. मुलगी सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली असली, तरी अपहरणकर्त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय का, याबाबत मात्र कुठलीही माहिती पोलिसांनी अद्याप दिलेली नाही.

११- ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी बिहार सरकारची भोंगे वाजवण्यावर बंदी

१२- बीड; मुलीच्या कन्यादानाआधीच शेतकरी पित्याने जीवन संपवलं 

                     दारात लग्नसोहळ्याची तयारी सुरू होती, श्रीमंतीचा थाटमाट तसा नव्हताच, पण लग्नसोहळ्याला गरीबीचं का असेना, आनंदाचं कोंदण होतं. अवधूत सातभाई यांच्या दोनही मुलींच्या लग्नाचा सोहळा २९ डिसेंबरला आहे. या शेतकरी माणसाने, पैशांची तजवीज करण्यास सुरूवात केली, पण पैसे काही जमले नाहीत, समाज काय म्हणेल, म्हणून अवधूत सातभाई घाबरले, अखेर या शेतकरी पित्याने मुलींना निरोप देण्याआधीच, गळफास घेत या जगाचा निरोप घेतला.अखेर गाव धावून आलं...पोरके झालेल्या या मुलींसाठी गावासह काही दानशूरांनी लोकवर्गणीतून १ लाख ५ हजार ५०० रुपये जमवले. आता नियोजित तारखेला परळी तालुक्यातील तडोळी हे गाव या मुलींचे कन्यादान करणार आहे.

१३- चंदीगडमधील सेक्टर २६ मध्ये इमारत कोसळली, ६ जण ठार तर आणखी १२ जण अडकले 
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- सांगलीत दोन मुलांना विष पाजून आई-वडिलांचा गळफास 

                   सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बनेवाडी गावात आज पहाटे हा धक्कादायक प्रकार घडला. संजय यादव आणि जयश्री यादव या दाम्पत्याने प्रथम आपल्या दोन मुलांना विष पाजलं आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. यादव परिवाराच्या या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही. दरम्यान, सावकारीच्या जाचातून स्वतःला सोडवण्यासाठी यादव कुटुंबाने हे पाऊल उचललं असल्याची शक्यता गावकऱ्यांकडून वर्तवण्यात येते आहे. या प्रकरणात जयवंत पाटणकर या सावकाराला चौकशीसाठी इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

१५- उल्हासनगरमध्ये पोलिसागिरी, प्रेमीयुगुलांना मारहाण

                    उल्हासनगरमध्ये प्रेमीयुगुलांवर कारवाई करत असताना पोलिसांच्या अरेरावीचा कहर पाहायला मिळाला. पोलिसांनी प्रेमीयुगुलांना मारहाण करत शिवीगाळ केली. उल्हासनगरमधल्या प्रभात गार्डन आणि परिसरात प्रेमी युगुल येत असतात. त्यांच्यापैकी काही जण गैरवर्तन करतात. याचा त्रास इथल्या नागरिकांना होतो. नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या प्रेमीयुगुलांवर कारवाई केली. मात्र ही कारवाई करत असताना पोलिसांची अरेरावी पाहायला मिळाली. पोलिसांनी या प्रेमी युगुलांना शिवीगाळ आणि मारहाण केली. काल रविवारी येथील रहिवासी पोलिसांना घेवून आले. यावेळी अनेक प्रेमी जोड़पे इथं अश्लील चाळे करत तर काही गांजा आणि बियर पित असताना आढळून आले. पोलीस आल्याचे पाहाताच अनेकांनी पळ काढला तर इतराना पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी पिटाळुन लावले.

१६- मिर्झापूर; निवडणुकीतील पराभवाचा बदला - मुलीवर बलात्कार 
                      अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. ग्राम पंचायत निवडणुकीत एका महिलेकडून पराभव झाल्याने, एका संतप्त झालेल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने तिच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला.  मिर्झापूर जिल्ह्यातील ब्लॉक डेव्हल्पमेंट काउंसिल (बी़डीएस) निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महिलेकडून एका व्यक्तीचा पराभव झाला. कोणत्याही निवडणुकीत एकाचा विजय तर दुसऱ्याचा पराभव हा ठरलेला आहे. मात्र एका महिलेकडून पराभव पत्करावा लागल्याने सहन न झाल्याने पराभवाचा वचपा काढण्यासाठी पराभूत उमेदवाराने त्याच्या साथीदारासोबत महिलेच्या अकरावीत शिकणाऱ्या मुलीला घरातून उचलून जवळच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगताच तिच्या आईने पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली. परंतु पोलिसांनी एफआयर दाखल न करताच कारवाईचे तोंडी आश्वासन देऊन तक्रारकर्त्यांना माघारी धा़डले.  बुधवारी रात्री घटना घडूनही पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला न केल्याने शुक्रवारी मुलीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून बलात्कारसारख्या गंभीर प्रश्नांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई का केली नाही, याचा तपास करण्यात येईल ,तसेच दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मिर्झापूरचे पोलीस अधीक्षक अरविंद सेन यांनी दिली.   बलात्कार पीडित मुलीने आत्महत्या करताच खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी पप्पू बाहेलिया आणि बिंदू बाहेलिया दोघांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.

१७- मध्यप्रदेशातील सेओनी-नरसिंगपूर महामार्गावर ज्वलनशील गॅसने भरलेला टॅंकर उलटल्याने महामार्ग बंद केला असून, हायवेजवळची गावे रिकामी करण्यात आली 

१८- पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात सूजापूरमध्ये बॉम्बस्फोट; दोन ठार, २ जखमी 

१९- चंद्रपूरात वाघाच्याा हल्ल्यात महिलेचा मृत्यू 

२०- सोलापूरमध्ये टँकर व खासगी बसची धडक होऊन ३ ठार ६ जखमी. अपघातातील सर्व कर्नाटकचे रहिवासी 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- 'बाजीराव मस्तानी' बॉक्स ऑफिसवर बाजी 

                       संजय लीला भंसालीचा ‘बाजीराव मस्तानी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. रोमँटिक जोडी शाहरुख-काजोलला मात देऊन रणवीर-दीपिकाच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. इतकंच नाही तर ‘बाजीराव मस्तानी’ने 100 कोटी रुपयांची कमाई देखील केली आहे. ‘दिलवाले’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. ‘दिलवाले’च्या तुलनेत ‘बाजीराव मस्तानी’ची ओपनिंग विकेण्डमधील कमाई कमी होती. परंतु दुसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांनी ‘दिलवाले’पेक्षा ‘बाजीराव मस्तानी’ला अधिक पसंती दर्शवली. ‘बाजीराव मस्तानी’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर शंभर कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली. ट्रेड अनालिस्ट तरण आदर्शने ट्वीट करुन बाजीराव मस्तानीच्या कमाईचे आकडे जाहीर केलं. दुसऱ्या आठवड्याच्या विकेण्डला शुक्रवार 12.25 कोटी, शनिवार 10.30 कोटींचा गल्ला जमवला. सिनेमाने आतापर्यंत एकूण 108.70 रुपयांची कमाई केली आहे.

~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२२- डाँ.बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन करुन बहुजनांचा उद्धार केला- काँ. बालाजी लंगेवाड
http://goo.gl/Hchi3S
~~~~~~~~~~~~~~~
२३- विभागीय रेल्वे उपभोक्ता सलाहकार सदस्य समिती ची १४ वी बैठक संपन्न
http://goo.gl/885Eyc
~~~~~~~~~~~~~~~
२४- मुखेड येथे मातोश्री भीमाई व्याख्यानमालेत डाँ.रामचंद्र देखणे यांचे व्याख्यान
http://goo.gl/vSUiUi
~~~~~~~~~~~~~~~
२५- मुखेड येथे हजरत सय्यद साबेर अली शाह खादरी यांचा उर्स शरिफ
http://goo.gl/x6kTiH
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आळसाला आजचा दिवस बहाल केला की, उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा. आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो की दारिद्रय त्यास लगेच गाठते.
[प्रीती कदम, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
*  *  *  *  *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
 १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: