नमस्कार लाईव्ह २३-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- इस्तांबुल विमानतळावर झालेल्या बॉम्ब स्फोटामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू - एएफपी
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- राम मंदिराच्या मुद्यावरुन राज्यसभेत गदारोळ
राज्यसभेत आज पुन्हा गदारोळ सुरू आहे. मुद्दा आहे राम मंदिराचा. काही दिवसांपूर्वी अयोध्येमध्ये 2 ट्रक भरून शिला आल्या होत्या. आणि त्यानंतर त्या शिलांना घडवण्याचं काम सुरू आहे. याच मुद्द्यावरुन आज राज्यसभेत गदारोळ झाला.काँग्रेस, बीजेडी, आणि डावे पक्ष सरकारवर तुटून पडले. 2017 साली होणार्या उत्तर प्रदेश विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भाजप वातावरण तापवतंय, असा आरोप जेडीयूनं केला आहे. तर सरकारच्या बाजूनं मुख्तार अब्बास नक्वींनी उत्तर दिलं. शिला आल्या म्हणजे राम मंदिर बनलं असं नाही. तो मुद्दा न्यायप्रविष्ट आहे, आणि सरकार न्यायालयाचा आदर करतं, असं नक्वी म्हणाले. शिला आणण्याचं काम 1990 पासून सुरू असल्याचंही नक्वी म्हणाले.
३- हिट अँड रन : राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार
राज्य सरकार हिट अँड रनप्रकरणात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच अभिनेता सलमान खानची निर्दोष मुक्तता केली आहे. याविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली.
४- खासदार सचिनचं टीकाकारांना कृतीतून उत्तर
राज्यसभेतील गैरहजेरीवरून सचिनवर अनेकांनी टीका केली. मात्र सचिनने आपल्या खासदारनिधीतील तब्बल 98 टक्के पैसे विकासकामांवर खर्च केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सचिन राज्यसभेत जरी गैरहजर राहत असला, तरी प्रत्यक्ष कामांमध्ये मात्र तो अग्रेसर असल्याचं दिसून येत आहे.सचिन 2012 मध्ये राज्यसभा खासदार झाला. मात्र त्याने 235 दिवसांपैकी फक्त 13 दिवसच हजेरी लावली. त्यामुळे सचिनच्या उपस्थितीवरून अनेकांनी टीका केली होती. पण सचिनने प्रत्यक्ष विकासकामांसाठी आत्तापर्यंत ९८ टक्के खासदार निधीचा वापर केल्याचं वृत्त, ‘इकॉनॉकिस टाईम्स’ने दिलं आहे. सचिनने आपला खासदार निधी जम्मू-काश्मीर आणि तामिळनाडूतील पूरग्रस्तांनी खर्च केला. इतकंच नाही तर उत्तराखंडच्या महाभयंक पुरात वाहून गेलेल्या चामोली गावातील शाळांच्या उभारणीसाठीही सचिनने निधी दिला.
५- चार दिवस बँका बंद
बँकेशी संबंधित असलेली कामं आजच उरकून घ्या, कारण उद्यापासून सलग चार दिवस बँकांना सुट्टी आहे. 24, 25, 26 आणि 27 असे सलग चार दिवस बँकांचं कामकाज बंद असणार आहे. बँक हॉलिडेच्या काळात ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एटीएम सेवा अखंडित सुरु राहण्यासाठी शनिवार 26 डिसेंबरला केवळ एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी बँका काही वेळासाठी सुरु राहणार आहे, मात्र या वेळेत कुठलेही बँकेचे व्यवहार होणार नाहीत. तसंच बँकांचे ग्राहक सेवा केंद्र सुरु राहणार असल्याने याच्या माध्यमातून पैशांची देवाण-घेवाण यांसारखे व्यवहार करता येणार आहेत.
बँकांच्या सुट्टीचे दिवस
24 डिसेंबर – ईद ए मिलाद
25 डिसेंबर – ख्रिसमस
26 डिसेंबर – चौथा शनिवार
27 डिसेंबर – रविवार
६- करकरडूमा कोर्ट परिसरात गोळीबार, पोलिसाचा मृत्यू
करकरडूमा कोर्टाच्या रुम नंबर 73 जवळ गोळीबार झाला. आरोपी इरफानच्या डोक्यात एक आणि पायाला एक गोळी लागली. तर त्याच्या सुरक्षेसाठी असलेले कॉन्स्टेबल रामकुमार यांचा गोळी लागून जागीच मृत्यू झाला. तर इरफानला रुग्णालयात दाखल केलं असून त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे. इरफान जुन्या दिल्लीच्या सीलमपूरचा रहिवासी आहे. दिल्लीच्या केजरीवाल सरकारने मृत रामकुमार यांच्या नातेवाईकांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
७- विधानपरिषद सभापतींविरोधात सरकारचा एल्गार, कामकाज होत नसल्याने अविश्वास ठराव आणण्याची तयारी
८- कीर्ती आझाद भाजपमधून निलंबित, शत्रुघ्न सिन्हांकडून पाठराखण
भाजप खासदार कीर्ती आझाद यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन म्हणजेच डीडीसीए मधल्या तिकीट वाटप घोटाळ्यावरुन, कीर्ती आझाद यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरच आरोप केले होते. त्यानंतर आझाद यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
९- दिल्लीत व्दारकामध्ये कोसळलेल्या बीएसएफ विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडला
१०- सर्व देशावासियांना राम मंदिर हवे आहे - व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री
११- कोळसा घोटाळयात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना समन्स बजावण्याची मागणी करणारी याचिका विशेष न्यायालयाने फेटाळली.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- प्रत्येक पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदणी ऑनलाईन होणार, १ जानेवारीपासून आकस्मिक तपासणी करणार - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
१३- कोल्हापूर; टोल रद्द, मुख्यमंत्र्यांची घोषणा
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभरात चर्चेत असलेला कोल्हापूर टोलचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. कोल्हापूरचा टोल बंद करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. कोल्हापुरातील टोल सरकार विकत घेणार आहे. त्यामुळे आयआरबीला गाशा गुंडाळावा लागणार आहे. IRB ला सरकारने जी जागा दिली होती, त्यावर त्यांनी बांधकाम केलं आहे. ती जागा आयआरबीला परत करावी लागणार . या जागेची किंमत 107 कोटी आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. कोल्हापूर शहरांतर्गत 49 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले आहेत. आयआरबी कंपनीने या रस्त्यांचं काम केलं आहे. आयआरबी टोल उभारून रस्त्याचं पैसे वसूल करणार होती. मात्र शहरांतर्गत टोल आणि आयआरबीने केलेल्या रस्त्याचं दर्जाहीन काम याला कोल्हापूरकरांचा विरोध होता. राज्यात किंवा देशात शहरांतर्गत टोल हा फक्त कोल्हापुरातच का, असा सवाल करत, गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरात जनआंदोलन सुरु होतं. या आंदोलना अखेर यश आलं आहे.
१४- इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रगीताविनाच विधानपरिषद तहकूब
नागपूर: विधानपरिषदेचं कामकाज आज इतिहासात पहिल्यांदा राष्ट्रगीताविना तहकूब करण्यात आलं. महत्वाचं म्हणजे याप्रकरणी राडा झाल्यानंतर पुन्हा एकदा सभागृह बोलावून मंत्र्यांनी राष्ट्रगीत म्हटलं. विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन देत होते. त्यावेळी तालिका सभापतींनी कामकाज तहकूब केल्याने एकच गदारोळ झाला. यानंतर लागलीच शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते सभापतींच्या दालनात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. खरं तर मुख्यमंत्री निवेदन देत असताना कामकाज तहकूब होत नाही. मात्र विरोधकांच्या दबावामुळे सभापतींनी सभागृह तहकूब केल्याचा दावा भाजपने केला. महत्वाचं म्हणजे सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणण्याचीही भाजपची तयारी आहे. विधानपरिषदेत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे विरोधकांना या बहुमताचा माज आहे, असा घणाघात सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला.
१५- ‘समृद्ध जीवन’चे महेश मोतेवार फरार घोषित, उस्मानाबादेत गुन्हा दाखल
उस्मानाबाद : समृद्ध जीवन ग्रुपचे महेश मोतेवार यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. उस्मामानाबादच्या मुरुम पोलिसांनी मोतेवारांना फरार घोषित केलं आहे. गुंतवणूकदरांचे पैस परत केले नसल्याचा त्यांच्यावर आरोप ‘समृद्ध जीवन’चे महेश मोतेवार यांना 420 फसवणुकीच्या गुनह्यात महेश मोतेवार CRPC 299 प्रमाणे फरार घोषित करण्यात आलं आहे. महेश मोतेवार महाराष्ट्र पोलिसांना गेल्या 2 वर्षापासून सापडले नाहीत. मोतेवारवर उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम पोलिस ठाण्यात आहे 420 , 448 , 427 , 491 34 कलमाअंतर्गत मोतेवारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डेअरी प्रकल्पामध्ये भागीदारी देण्याचे अमीष दाखवून 35 लाख रूपयांना फसवल्याप्रकरणी 2012 मध्ये उमरगा कोर्टाच्या आदेशाने गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी कोर्टात 2013 साली आरोपपत्र दाखल करताना मोतेवारला फरारी घोषीत केले आहे. मात्र, महेश मोतेवारला फसवणुकीच्या गुह्यात अजून पोलिस अटक करू शकले नाहीत.
१६- नवी मुंबईकरांचा ‘नैना’ला विरोध, सिडको विरुद्ध शेतकरी संघर्षाची शक्यता
नवी मुंबईच्या विकासानंतर आता सिडकोने आपला मोर्चा पनवेलमधील नैना प्रकल्पाकडे वळवला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विकासाबरोबरच सिडको 5 लाख स्वस्त घर देखील निर्माण करणार आहे. मात्र हा प्रकल्प सिडको शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रेटत असल्याचा आरोप नैनाबाधित शेतकरी संघर्ष समितीने केला आहे. सिडकोच्या या नैना प्रकल्पामुळे पनवेल मधील 275 गावं ही बाधित होणार आहेत. शिवाय या जमिनी सिडको संपादित करणार नसून थेट बिल्डरला या जमिनी विकत घेता येणार आहेत. यामुळे उद्या गरीब शेतकऱ्यांची फसवणूक झाली, तर याला जबाबदार कोण, असा प्रश्नही शेतकऱ्यांना पडला आहे. या विरोधात आता शेतकऱ्यांनी ‘नैना बाधित शेतकरी संघर्ष समिती’ची स्थापना करुन सिडको विरोधात एल्गार पुकारला आहे. पनवेलमध्ये नुकतीच या संघर्ष समितीने बैठक घेऊन नैनाला आपला असणारा विरोध स्पष्ट केला आहे. महत्वाचं म्हणजे नैनाला विरोध असणाऱ्या 275 गावातील शेतकरी या बैठकिला उपस्थित होते.
१७- पोलिस दलात १२,०४३ नवीन पदे लवकरच भरणार - देवेंद्र फडणवीस
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- औरंगाबादेत गरिबांसाठी उभारली रोटी बँक
देशभरात अनेक पोटं अशी असतील त्यांना रात्री उपाशी जोपावं लागतं…औरंगाबादेत मात्र एका संस्थेन पुढाकार घेवून उपाशी राहण्याची वेळ कुणावर येवू नये यासाठी उपक्रम सुरू केलाय. या संस्थेन अनोखी रोटी बॅक सुरू केलीय. या बँकेच्या माध्यमातून नागरीकांना रोज भाजी पोळी बँकेत जमा करण्याचं आवाहन या करण्यात आलंय. आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. बँकेत आलेल्या भाकरी पोळी गरजूंना दिली जातेय. ईस्लामिक हारूण सेंटरचा हा उपक्रम आहे. दररोज जवळपास तीनशे गरजू या रोटी बँकेतून जेवण मोफत घेवून जातात.
१९- जम्म-काश्मीरमधील उधमपूर गावात झालेल्या स्फोटात २ जण ठार
२०- आबोहार प्रकरणी चंदीगडमध्ये पंजाब सरकारविरोधात निदर्शने करणा-या काँग्रेस कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पाण्याचे फवारे मारले.
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- लिलावात खरेदी केलली दाऊदची कार पेटवली
दिल्लीला लागूनच असलेल्या गाजियाबादमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची कार आज जाळण्यात आली. हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी मुंबईतील एका लिलावात दाऊदची कार विकत घेतली होती. त्या कारला आज स्वामी चक्रपाणी यांनी पेटवून दिलं. कारवर दाऊदचे फोटो लावून आणि कारच्या चहूबाजूने चितेप्रमाणे लाकडं रचली होती. कारवर तेल ओतलं आणि आग लावली. यावेळी स्वामी चक्रपाणी यांच्यासोबत एक मौलानाही होते. स्वामी चक्रपाणी यांना ही कार एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जाळणार होते, परंतु पोलिसांनी त्यांना कार दूर जाळण्याची परवानगी दिली. यानंतर एका फार्महाऊसवर काही लोकांच्या उपस्थितीत कारला जाळण्यात आलं. मुंबईत 9 डिसेंबर रोजी दाऊदच्या संपत्तीचा लिलाव झाला होता. या लिलावात स्वामी चक्रपाणी यांनी दाऊदच्या ह्युंदाई एसेंट कारला केवळ 32 हजारांची बोली लावून ती खरेदी केली होती.
२२- 'व्हॉटसअप'वर लवकरच व्हीडीओ कॉलिंगची सुविधा
व्हॉटसअप युझर्ससाठी एक खुशखबर आहे. यूझर्सला बऱ्याच कालावधीपासून प्रतिक्षा असलेलं 'व्हिडिओ कॉलिंग' फिचर लवकरच व्हॉटसअपमध्ये समाविष्ट होणार असल्याचं समजतंय. जर्मनीच्या एका वेबसाईटनं ही माहिती दिलीय. या वेबसाईटनं व्हॉटसअपच्या 'आयओएस' अॅपचे काही स्क्रीनशॉटही सोबत शेअर केलेत. हे स्क्रीन शॉट व्हॉटसअप कॉलिंगचे आहेत. व्हॉटसअपचं २.१२.१६.२ या आयओएस वर्जन अजून टेस्टिंग सुरू असल्याचं सांगण्यात येतंय. येत्या वर्षात व्हॉटसअपच्या या फिचरला रोलआऊट करण्यात येऊ शकतं, असं म्हटलं जातंय.
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२३- मुहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करून मुस्लीम समाजाच्या भावना दुखाविणाऱ्या हिंदू महासभेचे कमलेश तिवारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी किनवट येथे निषेध मोर्चा
http://goo.gl/bJ72vm
~~~~~~~~~~~~~~~
२४- मुखेड येथे महिला बचत गटाची 4 दिवशीय कार्यशाळा संपन्न
http://goo.gl/P5WVvY
~~~~~~~~~~~~~~~
२५- रतन पेंटर यांना नंदिग्राम भूषण पुरस्कार जाहिर
http://goo.gl/KDYn3k
~~~~~~~~~~~~~~~
२६- दि. २४-१२-२०१५ रोजी ईद-ए-मिलाद सणानिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल
http://goo.gl/nJ3998
~~~~~~~~~~~~~~~
२७- गावातील शाश्वत स्वच्छतेसाठी प्रत्येक नागरीकांनी वेळ द्यावा – जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर
http://goo.gl/kRUyrO
~~~~~~~~~~~~~~~
२८- डासमुक्तीचा ‘नांदेड पॅटर्न’– राज्यभर गाजणार
http://goo.gl/1fbPFx
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हवर नोंदवा आपले मत, खालील लिंकला क्लिक करून--
प्रश्न;- नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कॉंग्रेस दोषी आहे असे वाटते का?
a] होय
b] नाही
c] सांगता येत नाही
http://goo.gl/wMLuSZ
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
नशिबाला भाव देण्यापेक्षा, कर्तृत्वाला वाव दिल्यास दिर्घ यशाची नाव तुम्हाला जीवनरूपी, सागरात प्रवास करताना दिसेल
[विठ्ठल धर्माधिकारी, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
।। आपला सहभाग..आईला साद ।।
"आई कलामहोत्सव,औरंगाबाद"
पेंटीग,कॅलिग्राफी,फोटोग्राफी,कविता आपण या कलामहोत्सवासाठी पाठवु शकता.
प्रत्येक विभागातुन अनुक्रमे प्रथम पारितोषिक- ५००१/-, ३००१/-, २००१/- व १००१/- रु.
पाच पारितोषिके, स्मृतिचिन्ह, प्रमाणपञ.सहभागी कविंच्या कवितेचे पुस्तक महोत्सवातील प्रदर्शनादरम्यान पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रकाशित होईल.
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारिख: ३१ डिसेंबर २०१५.
संपर्क -
महेश ढाकणे,
आयोजक,आई कलामहोत्सव,
औरंगाबाद २०१६
मो. - 9503204201
अधिक माहितीसाठी लिंक क्लिक करा
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_569.html
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी, [नोव्हेंबरमधील नोंदीनुसार]
डिसेंबरमध्ये अड्ड झालेल्या सर्व ग्रुपचे स्वागत
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment