नवीन वर्षाची सुरुवात गोर-गरीब, अंध-अपंग, अनाथ अशा किमान १६ निराधाराला आधार किंवा सहकार्य करून नवीन वर्ष २०१६ ची सुरुवात करूयात, आज हा संकल्प आपण करूयात
[सुरेश मोरे, टेळकीकर]
२०१५ ला निरोप देत, आपण नवीन वर्षात पदार्पण करीत आहोत. मागील सालात आपण काय वावगे वागलो, कळत-न-कळत आपल्या हातून चुकाही झाल्या असतील. आपल्या मनावर असलेला भर कमी व्हावा व नवीन वर्षासंबंधी
मानसिक समाधान लाभावे ह्यासाठी आपण जर हजारो रुपये खर्च करून एखादी पार्टी सेलिब्रेशन करण्यापेक्षा एखाद्या उपेक्षित गोर-गरीब, अंध-अपंग, अनाथ किंवा गरजू १६ लोकांना वर्षभरात जर आपण अर्थ सहाय्य करण्यची
सुरुवात १ जानेवारी रोजी करण्याचा संकल्प करूयात.
आपल्यासाठी साठी नवीन वर्षाची सुरुवात चांगली असेल आणि यापेक्षाही आपला मनुष्य जन्म चांगल्याप्रकारे जगता येवू शकतो याची जाणीव आपल्याला होईल. मित्रहो कोणत्याही कामाची सुरुवात चांगलीच होणे अपेक्षित असते. मग
२०१६ वर्षाच्जी सुरुवात चांगली व समाधानी व्हायला नको का?.
नवीन वर्ष आपणास सुख-समृद्धीचे जावो हीच शेवटी प्रार्थना
-----सुरेश मोरे, टेळकीकर

No comments:
Post a Comment