नमस्कार लाईव्ह २१-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- इंडोनेशियामध्ये ७६ प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट बुडाली, आत्तापर्यंत २ जणांना वाचवण्यात यश मिळाले असून इतर प्रवाशांचा शोध सुरू
२- चीन - बचाव पथकाने तब्बल ६० तासांनतर शेंझेन शहरातील भूस्खलनाच्या मलब्यातून एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढले
३- पाकिस्तानमध्ये शाहरुख खानच्या 'दिलवाले'ने बॉक्स ऑफिसवर भंन्सालींच्या 'बाजीराव मस्तानी'ला मागे टाकले
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- बालगुन्हेगाराचं वय 18 वरुन 16, राज्यसभेत विधेयक मंजूर
बालगुन्हेगार विषयक विधेयक अखेर राज्यसभेत मंजूर करण्यात आलं आहे. डाव्या पक्षांचा विरोध मोडून काढत, कुठल्याही संशोधनाशिवाय विधेयक मंजूर करण्यात आलं. यामुळे बालगुन्हेगाराचं वय 18 वरुन 16 वर आलं आहे. निर्भया म्हणजेच दिल्लीतील गँगरेप प्रकरणातील बालगुन्हेगाराच्या सुटकेनंतर देशभरात गदारोळ झाला होता. बालगुन्हेगारी विधेयकात बदल करुन दोषीला गंभीर गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षा देण्याला संसदेत मंजुरी मिळाली आहे. बालगुन्हेगार विधेयकातील बदलामुळे निर्भयाच्या बालगुन्हेगाराला शिक्षा मिळणार नाही. मात्र यापुढे अशा घटना घडल्यास अल्पवयीन आरोपींना कठोरात कठोर शासन मिळण्यास मदत होईल.
५- नवी बालसुधारणा कायदा झाला तरी आम्ही होतो तिथेच आहोत, आमच्या मुलीला न्याय मिळालेला नाही. आमची लढाई अद्याप संपलेली नाही- निर्भयाची आई
६- जनतेचा राग शांत करण्यासाठी संसदेत बालगुन्हेगार विधेयक मंजूर करण्यात आले - माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू.
७- दिल्ली बीएसएफ विमान दुर्घटना: त्या विमानात कोणताही बिघाड झालेला नव्हता, ते अतिशय चांगल्या स्थितीत होते - डी.के.पाठक, (डीजी बीएसएफ)
८- पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या रशिया भेटीवर, दौ-याबद्दल पंतप्रधान आशावादी
९- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची याची कार आज जाळण्यात येणार, एका लिलावात ती कार स्वामी चक्रपाणी यांनी ३ लाख रुपयांत विकत घेतली होती.
१०- शिवसेनेची सामनामधून केजरीवाल यांच्यावर टीका, केजरीवाल यांचे राजकारण पाण्याच्या बुडबुड्यासारखे, लवकरच हा बुडबुडा फुटेल
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- अधिवेशनाचं आज सूप वाजणार, आमदारांच्या हिवाळी सुट्ट्या संपल्या
नागपूर हिवाळी अधिवेशनचा आज शेवटचा दिवस... सत्ताधारांसाठी हे अधिवेशन गेल्या तीन अधिवेशनच्या तुलनेत खुपच सोपं ठरलंय. महागाई, डाळीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप, राज्यातील कायदा सुस्ववस्था, दुष्काळ - शेतकरी आत्महत्या, केंद्राची मदत असे अनेक मुद्दे विरोधकांच्या हाती होते. पण मुद्दे असून सुद्धाविरोधक सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्यात साफ अपयशी ठरले. कायदा सुव्यवस्थासारखा विषय अधिवेशनच्या शेवटच्या आठवड्यात विरोधक अंतिम आठवडा प्रस्तावद्वारे उपस्थित केला. त्यामुळे सत्ताधारी यांना हा अधिवेशनाचा हा पेपर खुपच सोपा गेला. सत्तेत असलेल्या शिवसेनेने अणे यांचा मुद्दा उपस्थित करत काही काळ वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला खरा. पण भाजपाने डावपेच आखून हा मुद्दा फार ताणू दिला नाही. राज्यात शेतकऱ्यांसाठी पॅकेज देऊन मुख्यमंत्र्यांना बॅकफुट लोटले. त्यामुळे अधिवेशनाच्या आधी अडचणीत दिसणारे सत्ताधारी अधिवेशन संपतांना निर्धास्त झाले आहेत
१२- शाहरुखने पोलिसांची कधीही मदत केली नाही : माजी पोलिस आयुक्त एम एन सिंह
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने पोलिसांची कधीही मदत केली नाही, असा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त एम एन सिंह यांनी केला आहे. ज्येष्ठ पत्रकार शीला रावल यांच्या ‘गॉडफादर्स ऑफ क्राईम’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात एम एन सिंह बोलत होते. “दीड दशकापूर्वी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांप्रमाणे शाहरुख खानलाही छोटा शकीलकडून धमकीचे कॉल आले होते. शाहरुखने मोठ्या व्यक्तींमार्फत मुंबई पोलिसांकडून सुरक्षा मागितली होती. त्याला सुरक्षाही देण्यात आली. पण जेव्हा चोरी चोरी चुपके चुपके प्रकरणात पोलिसांनी शाहरुखला कोर्टात जबाब देण्यास सांगितलं, तेव्हा त्याने पोलिसांना कोणतीही मदत केली नाही,” असा दावा एम एन सिंह यांनी केला आहे. एम एन सिंह पुढे म्हणाले की, “त्यावेळी फक्त प्रिटी झिंटानेच पोलिसांच्या बाजूने आणि अंडरवर्ल्डविरोधात कोर्टात जबाब दिला होता. प्रितीच्या जबाबानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक शंकर कांबळे म्हणाले होते की, बॉलिवूडमध्ये केवळ एकच मर्द आहे आणि
ती प्रिटी झिंटा आहे.”
१३- 'पोलिसांनी चित्रपट गाणी रिंगटोन ठेवू नये', विश्वास नांगरे-पाटलांचा फतवा
औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास-नांगरे पाटील यांनी एक तुघलकी फतवा काढला आहे. औरंगाबाद विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांनी यापुढे आपल्या मोबाईलची रिंगटोन सिनेमाच गाणं, पक्षांचा आवाज किंवा कर्कश आवाजांच्या ठेऊ नये असा आदेश त्यांनी दिला आहे. विश्वास नांगरे-पाटील यांनी त्यापद्धतीचं एक पत्रक काढून मराठवाड्यातील सर्व पोलिस स्टेशनला धाडलं आहे. अशा रिंगटोनमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होते. असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं पत्रक काढून त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना थेट याबाबत आदेश दिले आहेत. या पत्रकामुळे औरंगाबादमध्ये मात्र, बरीच चर्चा सुरु आहे.
१४- रिक्षावाला ठरला प्रामाणिकपणाचा आदर्श
अंबाजी सुर्यवंशी हे पुण्यातले एक सामान्य रिक्षाचालक. पण अंबाजी आता पुण्यातल्या रिक्षाचालकांसाठी आदर्श ठरले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या रिक्षात रात्रीच्या वेळी तीन प्रवासी बसले. अंबाजी यांनी त्यांना स्वारगेट स्टँडला सोडलं. दुस-या दिवशी रिक्षा साफ करताना त्यांना रिक्षाच्या मागे एक बॅग मिळाली. बॅग उघडली असता त्या बॅगेत तब्बल 32 मोबाईल होते. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांनी थेट पोलिसांकडेच दिले.
१५- उच्चशिक्षित आईचा चिमुरड्याला ठार मारण्याचा प्रयत्न
सोलापूर : 'माता न तू वैरिण' या उक्तीचा प्रत्यय सोलापुरात आलाय. एका उच्चशिक्षित आईनं आपल्या तीन महिन्याच्या बाळाला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. एकदा नाही तर दोनदा या महिलेनं आपल्याच शरीराचा अंश असलेल्या आपल्या चिमुरड्याला मारण्याचा प्रयत्न केलाय. सविता असं या महिलेचं नाव आहे. सवितानं एमएपर्यंत शिक्षण घेतलंय. पहिल्यांदा सवितानं आपल्या बाळाला विष पाजलं. या घटनेनंतर बाळ कसं बसं बरं होत असताना सवितानं पुन्हा एकदा बाळाला हॉस्पिटलमधून निर्जन स्थळी नेलं.. आणि तिथं त्याला दगडानं मारण्याचा प्रयत्न केला...परंतु, दैव बलवत्तर म्हणून हा सारा प्रकार काही महिलांनी पाहिला... या महिलांनी आरडाओरड केल्यानं सवितानं तिथून पळ काढला.
१६- थंडीच्या वाढत्या कडाक्यामुळे उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथील शाळा ३ जानेवारीपर्यंत राहणार बंद.
१७- विना अनुदानित शाळांना शुल्कवाढ करण्यास हायकोर्टाची परवानगी
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- उस्मानाबाद : गोठ्याला लागलेल्या आगीत पती-पत्नीचा होरपळून मृत्यू
उस्मानाबाद : गोठ्याला लागलेल्या आगीत पती-पत्नीचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उस्मानाबादमध्ये घडली आहे. कळंब तालुक्यातील खामसवाडीत आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेत सखाराम शेळके आणि शकुंतला शेळके या दाम्पत्याचा मृत्यू झाला. शेळके दाम्पत्याच्या शरीराची अक्षरश: राख रांगोळी झाली आहे. इतकंच नाही तर गोठ्यातील शेळी आणि शेतीसाठी लागणारं साहित्यही जळून खाक झालं आहे. ही आग शार्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
१९- पुण्यात पाठलाग करणाऱ्या पोलिसावर आरोपीचा गोळीबार
पाठलाग करणाऱ्या पोलिस शिपायावर आरोपीने गोळीबार केल्याची घटना पुणे शहरात घडली आहे. पुण्यातील आपटे रस्त्यावर ही थरारक घडना घडली. गोळीबार करणारा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचं समजतं. मयूर भोकरे आणि संदेश खडके हे पोलिस कर्मचारी शिवाजीनगर येथील सावरकर भवनाजवळ गस्तीवर होते. त्यावेळी बाईकवर जाणाऱ्या एका व्यक्तीकडे देशी बनावटीची पिस्तूल त्यांनी पाहिली. त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला. पोलिस पाठलाग करत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्या वक्तीने आपटे रोडवरील पाटील बंगाला भागात पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. ती गोळी भोकरे यांच्या बुटाला चाटून गेली. सुदैवाने यात भोकरे यांना कोणतीही दुखापत झाली.
२०- मुंबईत कडाक्याची थंडी
मुंबई : एरव्ही घामाने ओथंबणारे मुंबईकर सध्या तापमान घसरल्याने चांगलेच गारठले आहे. मुंबईत काल रात्रीचं तापमान 13 अंश सेल्सिअस होतं. त्यामुळे स्वेटर आणि मफलरने मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवात झाली. वातावरणात गारवा वाढल्याने मुंबईकरही या थंडीची मजा लुटताना दिसत आहे. उत्तर भारतात थंडीची जबरदस्त लाट असल्याने मुंबईसह राज्याच्या काही भागात थंडीचा जोर वाढल्याचं म्हटलं जात आहे..
२१- मालवणीतील बेपत्ता तिघांपैकी वाजिद शेख एटीएसच्या ताब्यात
मुंबईच्या मालवणी परिसरातून बेपत्ता झालेल्या तीन तरूणांपैकी वाजिद शेखला एटीएसच्या पथकानं पुण्यातून ताब्यात घेतलं आहे. वाजिद शेख, मोहसीन शेख आणि एयाज सुलतान हे तिघंही 16 डिसेंबरपासून बेपत्ता असून ते आयसिसच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. मात्र वाजिद शेख हाती लागल्यामुळे या प्रकरणातलं नेमकं सत्य समोर येणार आहे. वाजिद शेखकडून मालवणीतील मोहसीन शेख आणि एयाज सुलतान यांच्या ठावठिकाण्याबद्दल देखील माहिती मिळवण्याचा एटीएसकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, मुंबईत आणखी दोन तरुण आयसिसमध्ये भरती होण्यासाठी गेल्याची माहिती एटीएसकडून देण्यात आली आहे. मालवणी परिसरातील नूर शेख आणि अकरम हे दोन युवक 16 डिसेंबरपासून गायब आहेत. हे दोघंही वाजिद शेख, मोहसीन शेख आणि एयाज सुलतान यांचे मित्र होते. त्यांच्यासोबतच हे दोघंही आयसिसमध्ये गेल्याची शंका आहे.
२२- किनवट येथे ८ मे रोजी मातंग समाजाच्या ५० जोडप्यांचे विवाह करण्याचा आयोजक के. स्वामीचा निर्धार
२३- वाराणसीतील लोहता अलाउदीन येथे इंडिका कारमध्ये अडकून विद्यार्थिनीचा झाला मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- सानिया-मार्टिना टेनिसच्या डबल्स वर्ल्ड चॅम्पियन
सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या अव्वल मानांकित जोडीला आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन अर्थात आयटीएफनं यंदाचा विमेन्स डबल्स वर्ल्ड चॅम्पियन्स किताब जाहीर केला आहे. 2015 या वर्षात सानिया आणि मार्टिनानं टेनिसच्या महिला दुहेरीत अक्षरशः राज्य केलं आहे. सानिया आणि मार्टिनानं यंदा विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन या ग्रँड स्लॅम स्पर्धा तसंच डब्लूटीए टूर फायनल्ससह एकूण नऊ स्पर्धांची जेतेपदं मिळवली. अमेरिकन ओपननंतर गेल्या 22 सामन्यांत ही जोडी अपराजितच आहे. याच शानदार कामगिरीसाठी आयटीएफनं सानिया आणि मार्टिनाचा सन्मान केला आहे. मार्टिनानं याआधी 2005 साली आयटीएफ विमेन्स सिंगल्स वर्ल्ड चॅम्पियन किताब मिळवला होता. यंदा महिला एकेरीत सेरेना विल्यम्स आणि पुरुष एकेरीत नोवाक जोकोविचची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२५- जिल्ह्यातील १३१ आत्महत्याग्रस्त शेतकरी अनुदानास पात्र, आतापर्यंत १८६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
२६- भोकार्मध्ये मोबाईलचे दुकान फोडून एक लाखाचा ऐवज लंपास
२७- स्वरातीम विद्यापीठाच्या अधिसभेवर आ, हेमंत पाटील यांची नियुक्ती
२८- नागपूर अधिवेशनावर मातंग समाजाच्या मोर्चावर झालेल्या लाठीहाल्याच्या निषेधार्थ लोह्यात लालसेनेचा बांगडी मोर्चा
२९- किनवट; वाळूची चोरटी वाहतूक करणारे पकडले तीन ट्रकटर
३०- माहूर गडावरील दत्त जयंतीस उत्सवास सुरुवात
~~~~~~~~~~~~~~~
३१- दोन गाड्यांचा सिसव खेळाचा सोशल मिडीयावरील व्हायरल व्हिडीओ
http://goo.gl/BZP5vd
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
गौरवी दरक, अशोक लोया, डी जॉय, भालचंद्र पुंडे, पवन पावडे, ज्ञानेश्वर पावडे, श्याम ढवळे, सुगत हणमंते, गणेश डहाळे, गुंजन राजे, राजेंद्र काळे, प्रीतम मंत्री, विक्रम गडाख, जयदीप देशमुख
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
ज्यावेळी तुम्ही स्वतःला खुश करण्यासाठी एखाद्याचा " अपमान " करत असता...
खरतर त्यावेळी तुम्ही तुमचा " सन्मान " गमावत असता..
[विठ्ठल धर्माधिकारी, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हवर नोंदवा आपले मत, खालील लिंकला क्लिक करून--
प्रश्न;- नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कॉंग्रेस दोषी आहे असे वाटते का?
A] होय
B] नाही
C] सांगता येत नाही
http://goo.gl/wMLuSZ
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
प्रोटीन >> आपल्या शरीराला दररोज आपल्या वजनाइतके प्रोटीनचि आवशकता असते. ते आपल्या आहारातून परिपूर्ण भेटत नाही. त्याची कमतरता भरून काढण्यासाठी
वेटगेनर >> मुले-मुली, पुरुष-महिला सर्वकाही आहार घेवून सुद्धा त्यांचे वजन वाढत नाही. ते काटकुळे व बारीक असतात. त्यांच्यासाठी उपयुक्त
फॅट बर्न >> चरबी कमी करणे व शरीराचे वजन कमी करणे. जे व्यक्ती आहार कमी घेवूनसुद्धा वजन कमी होत नाही त्यासाठी उपयुक्त [लवकर वजन कमी करते]
मल्टी व्हिटामिन्स >> आपल्या रोजचा आहारात परिपूर्ण व्हिटामिन्स, मिनरल्स, भेटत नाहीत त्याची कमतरता भरून काढण्यासाठी
एनर्जी ड्रिंक >> सर्व वयोगटातील खेळाडू, जिम करणारे, रिकव्हरी, स्ट्रेंग्थ, उर्जा वाढविण्यासाठी उपयुक्त. याचा वापर कोणीही करू शकते.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी, [नोव्हेंबरमधील नोंदीनुसार]
डिसेंबरमध्ये अड्ड झालेल्या सर्व ग्रुप स्वागत
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment