नमस्कार लाईव्ह २६-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- मॅनहॅटन ; १३० सेलिब्रेटींचे अकाउंट हॅक करणारा अटकेत
१३० सेलिब्रेटींचे इमेल अकाउंट हॅकर करणाऱ्या तसेच प्रदर्शित न झालेले चित्रपट आणि टीव्ही स्क्रिप्ट्स चोरणाऱ्या एका २३ वर्षीय युवकाला अटक करण्यात आलीय. अलोंझो नोवेल्स असे या युवकाचे नाव आहे. तो बहामासचा नागरिक आहे. अलोंझोने एका प्रसिद्ध रेडिओ निवेदकाला एका प्रसिद्ध टेलिव्हिजन शोच्या पहिल्या सहा एपिसोडचे स्क्रिप्ट विकण्याची मागणी केली होती. या निवेदकाने याबाबत होमलँड सिक्युरिटीला याबाबत माहिती दिली. यावेळी स्टिंग ऑपरेशनद्वारा अलोंझोला जाळ्यात पकडण्यात यश आले. सोमवारी मॅनहॅटन येथून तरुणाला अटक करण्यात आली.
२- जगातील सर्वात लठ्ठ व्यक्ती असलेला मेक्सिकोचा रहिवासी आंद्रेस मोरेनो याचा वेट लॉस सर्जरीनंतर झाला मृत्यू.
३- भारत फ्रान्सकडून ३६ राफेल फायटर जेट घेणार विकत, २६ जानेवारी रोजी करारावर होणार स्वाक्षरी
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- राहुल गांधींनी आक्रमक व्हावं, पृथ्वीराज चव्हाणांचा सल्ला
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना संसदेतील भाषणाबाबत सल्ला दिला आहे. संसदेत कोणत्याही मुद्द्यावर भाजपला उत्तर देताना राहुल गांधींनी आणखी आक्रमक व्हायला हवं, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाणांनी राहुल गांधींना दिला आहे. ते वृत्तसंस्था पीटीआयशी बोलत होते. पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीनुसार, राहुल गांधींनी संसदेत अधिक बोलण्यापेक्षा बॉडी लँग्वेजवर भर दिला पाहिजे. जेणेकरुन त्यांची विश्वासार्हता वाढेल, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. काही दिवसांपूर्वी संपलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान काँग्रेसह अन्य विरोधी पक्षांनीही विविध मुद्द्यांवर सरकारचा विरोध केला आणि या गदारोळातच हिवाळी अधिवेशन संपलं. तर विरोधी पक्षांनी संसद चालवू न दिल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे. “संसदेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण होतं. त्यामुळे राहुल गांधींनी विविध विषयांवर चर्चा करणं गरजेचं आहे. एखादं वाक्य बोलल्यनं नेहमी चालत नाही. तर सलग 45 मिनिटं ते 1 तासापर्यंत बोलणं गरजेचं आहे.”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
५- सांगलीतून जाणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गांना केंद्राची मंजुरी
सांगली जिल्ह्यात दोन राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. सांगली-गुहागर-विजापूर आणि मनमाड-सांगली-बेळगाव असे हे दोन महामार्ग असतील. या दोन्ही महामार्गांना केंद्राची मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार संजय काका पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. माण, खटाव, खानापूर, जत अशा दुष्काळी पट्ट्यातून हा महामार्ग जाणार आहे. त्यामुळे साहजिक त्या भागात शेती आणि उद्योगाची भरभराट होईल, अशी आशा आहे. पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणं महत्वाचं होतं, त्यादृष्टीने गुहागर-विजापूर हा महामार्ग महत्वपूर्ण ठरेल, अशी माहितीही संजय काका पाटील यांनी दिली.
६- सम-विषम क्रमांक फॉर्म्युलातून व्हीआयपींना वगळणे हा ढोंगीपणा - रॉबर्ट वाड्रा
राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सम-विषम क्रमांकानुसार वाहने रस्त्यावर आणण्याच्या योजनेतून 'व्हीआयपीं'ना वगळण्याचा 'आम आदमी पक्षाचा' निर्णय म्हणजे ढोंगीपणा आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई व प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी केली आहे. फेसबूक या सोशल नेटवर्किंग साईटवरील पोस्टद्वारे वाड्रा यांनी 'आप'वर निशाणा साधला.
७- व्यापमं घोटाळा : इंदौर सत्र न्यायलयाने दोन आरोपींना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
८- जगात असा मुत्सद्दीपणा अात्तापर्यंत कोणीही पाहिला नसेल - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाहोर दौ-याबाबत गृहमंत्री राजनाथ सिंग यांची प्रतिक्रिया
९- भारत हा जगातील सर्वात सहिष्णू देश आहे - प्रसिद्ध व्हायोलिनवादक एल. सुब्रमण्यम
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- पुणे : उपमहापौरांच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा
पुणे महापालिकेचे उपमहापौर आबा बागुल यांच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 38 वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला पेशाने नर्स असल्याची माहिती मिळते आहे. उपमहापौर आबा बागुल यांच्या अमित या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला रविवार पेठ येथील राहणारी आहे. दरम्यान, आबा बागुल यांनी पीडित महिलेचे आरोप फेटाळले आहेत. शिवाय, या महिलेविरोधात 4 वर्षांपूर्वी आम्ही पोलिस ठाण्यात तक्रार केली होती आणि त्यावर सध्या कोर्टात खटलाही सुरु आहे, अशी माहिती उपमहापौर आबा बागुल यांनी दिली आहे.
११- विधानपरिषद निवडणूक : 16 पैकी 15 उमेदवार कोट्यधीश, तर 12 जणांवर गुन्हे
विधानपरिषदेच्या सात जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. कारण नागपूरच्या जागेवर यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उद्या सात जागांसाठी मतदान होणार आहे. पण विधानपरिषदेवर जाऊ इच्छिणाऱ्या 12 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत, तर 15 उमेदवार कोट्यधीश आहेत. महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि एडीआर अर्थात असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स यांच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. विधानपरिषदेच्या 8 जागांसाठी 16 उमेदवार रिंगणात आहे. त्यापैकी 12 उमेदवार कोट्यधीश आहेत. अहवालानुसार, 16 उमेदवारांपैकी 12 उमेदवार करोडपती आहेत. तर 10 उमेदवारांकडे 10 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता आहे. तर एका उमेदवाराकडे 100 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता आहे.
अपक्ष उमेदवार प्रसाद लाड – 101 कोटी
काँग्रेसचे भाई जगताप – 87 कोटी
राष्ट्रवादीचे रविंद्र सकपाळ – 86 कोटी
काँग्रेसचे अंबरीशभाई पटेल – 80 कोटी
काँग्रेसचे सतेज पाटील – 29 कोटी
विधानपरिषद निवडणुकांमध्ये 16 पैकी 12 उमेदवारांवर गुन्हा दाखल असल्याचं अहवालातून स्पष्ट होतं आहे. त्यात अहमदनगरमधील आघाडीचे उमेदवार अरुण जगताप, काँग्रेसचे सतेज पाटील या दोघांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. विधान परिषदेच्या आठ जागांसाठी निवडणूक होते आहे. यामध्ये मुंबईतून 2 जागा, अकोला- वाशिम- बुलढाणा जिल्ह्यात एक जागा, कोल्हापूरमधून एक जागा, अहमदनगरमध्ये एक जागा, धुळे- नंदुरबार जिल्ह्यातून एक जागा आणि सोलापूर जिल्ह्यातून एक जागा आहे.
१२- अंबरनाथच्या राजकारणाचा रक्तरंजित इतिहास, 15 वर्षात 6 नगरसेवकांची हत्या
अंबरनाथ नगरपरिषदेतील शिवसेना नगरसेवक रमेश गुंजाळ यांचा अज्ञातांनी चाकूहल्ला करुन खून केला. मात्र अंबरनाथमधील राजकारणाला रक्तरंजित इतिहास आहे. मागील 15 वर्षांत तब्बल सहा नगरसेवकांची हत्या झाली आहे. यामध्ये शिवसेनेच्या 4, भाजप 1 आणि रिपाइंच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे.
पहिली हत्या : 1999 :वसंत पांढरे (भाजप)
दुसरी हत्या : 2001 प्रसन्न कुलकर्णी (शिवसेना)
तिसरी हत्या : 2002 नरेश गायकवाड (रिपाइं)
चौथी हत्या : 2008 : संतोष पवार (शिवसेना)
पाचवी हत्या : 2011 : नितीन वारंगे (शिवसेना)
सहावी हत्या : 2015 : रमेश गुंजाळ (शिवसेना)
१३- छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये मिळून १.३४ कोटी रुपयांच्या सोने व हि-यांची तस्करी विमानतळ कस्टम्सच्या हवाई गुप्तवार्ता विभागाने पकडले
१४- दिल्ली सरकारचा सम-विषम क्रमांकाच्या गाड्यांचा फॉर्म्युला यशस्वी होणार नाही - मनोज तिवारी
१५- उत्तर प्रदेश: इसीसने फोनवरून धमकी दिल्याचा भाजप आमदार संगीत सोम यांचा दावा
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- सांगली; पत्नीच्या प्रसूतीसाठी 10 हजार नव्हते म्हणून शेतकर्याची आत्महत्या
पत्नीच्या प्रसूतीचं बिल भरण्यासाठी 10 हजार रुपये नाही म्हणून या शेतकर्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात घडलीये. श्रीशैल रायगोंडा बिजरगी असं या शेतकर्याचं नाव आहे. रायगोंडा बिजरगी या शेतकर्याच्या बायकोने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र हे कळण्याआधीच या शेतकर्यानं हे चुकीचं पाऊल उचललंय. श्रीशैल रायगोंडा बिजरगी हा तरुण शेतकरी फक्त 30 वर्षांचा आहे. विजापूर रस्त्याजवळ विष पिऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवली. या शेतकर्यानं यापूर्वीही दोन वेळा त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. जत येथिल खाजगी रुग्णालयात त्याच्या पत्नीवर उपचार सुरू असून तिला प्रसूती नंतर मुलगा झाला आहे. श्रीशैल बिजरगी हा पैसे आणण्यासाठी जातो म्हणून दवाखान्यातून बाहेर पडला. विजापूर रस्त्याला कोरी यांच्या शेतात विष पिऊन त्याने आत्महत्या केली.याची जत पोलिसांत नोंद झाली आहे. मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
१७- बिहारमधील दरभंगा येथे खासगी रस्ताबांधणी कंपनीचा प्रोजेक्ट इंजिनिअर व सहाय्यक इंजिनिअर अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून केली हत्या
१८- वाशिम: भाडोत्री शिक्षक ठेवणारा जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक अखेर निलंबित
१९- छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे पोलिसांनी चार माओवाद्यांना केली अटक
२०- मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन रात्र शीत लहरींची शक्यता
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- रितेश देशमुख काढणार 'छत्रपती शिवाजी महाराजां'वर चित्रपट
अवघ्या महाराष्ट्राचं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनावर लवकरच मराठी सिनेमा बनणार आहे. अभिनेत्री जेनेलिया डिसूजाची निर्मिती असलेल्या ‘छत्रपती शिवाजी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. रितेश देशमुखने ट्विटरवरुन रवी जाधव यांच्या नावाची घोषणा केली आहे. ‘मुंबई फिल्म कंपनीच्या छत्रपती शिवाजी चित्रपटाचंदिग्दर्शन रवी जाधव करतील, ही घोषणा करताना मला अत्यंत अभिमान वाटत आहे’ असं रितेशने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.बालक पालक, टाईमपास, टाईमपास 2 यासारख्या अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं आहे.
२२- राम गोपाल वर्माच्या 'किलिंग वीरप्पन'चा जबरदस्त ट्रेलर
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२३- मराठी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी गोविंद घोळवे
http://goo.gl/QxFZ3w
~~~~~~~~~~~~~~~
२४- डासमुक्तीचा नांदेड पॅटर्न हरियाणा राज्यात राबविणार - पंचायत राजचे मुख्य अभियंता शंकर जिंदल
http://goo.gl/AkOr3H
~~~~~~~~~~~~~~~
२५- नांदेड; पिंपरी महिपाल येथे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पारधी समाजाच्या वस्तीवर धान्य वाटपाचा कार्यक्रम
http://goo.gl/aBOHC7
~~~~~~~~~~~~~~~
२६- नांदेड तालुक्यातील शिधापत्रिकेचे आधार सीडिंग; रास्तभाव दुकानात शिधापत्रिकाधारकांनी फार्म भरण्याचे तहसीलदारांच्या सूचना
http://goo.gl/b9dbNQ
~~~~~~~~~~~~~~~
२७- सिध्देश्वर मंदीर परिसराचा तीर्थक्षेत्र विकास निधीतून विकास करु - जि. प. सदस्या वर्षाताई भोसीकर
http://goo.gl/LV7kJf
~~~~~~~~~~~~~~~
२८- पोलीस बिनतारी संदेश विभागामध्ये नोकरीच्या संधी
http://goo.gl/3n5tu2
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आळसात प्रारंभी सुख वाटते, पण त्याचा शेवट दु:खात होतो
[सुमित सूर्यवंशी, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी, [नोव्हेंबरमधील नोंदीनुसार]
डिसेंबरमध्ये अड्ड झालेल्या सर्व ग्रुपचे स्वागत
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment