Saturday, 19 December 2015

बिलोलीत विविध संघटनेच्या वतिने तीव्र निषेध



बिलोलीत विविध संघटनेच्या वतिने तीव्र निषेध 

* लोकस्वराज्य अंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवर केलेल्या लाठीमार निषेधार्थ 
* उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

बिलोली : ( यादव लोकडे )

येथिल विविध सामाजिक संघटनेच्या वतिने काल दि 18 डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी लोकस्वराज्य अंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतिने काढण्यात आलेल्या मोर्चेतील सहभागी अंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवर पोलिस व स्थानिक प्रशासनाने अमानुष लाठीमार केला यामध्ये संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भरांडे यांच्यासह हजारो कार्यकर्ते जखमी झाले या घटनेच्या निषेधार्थ म्हणून बिलोली येथिल विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन प्रशासनाने सबंधित लाठीमार घटनेची लवकरात लवकर चौकशी करून त्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा सर्व संघटना रस्त्यावर उतरून तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांना दिला आहे .
नागपूर येथे चालु असलेल्या हिवाळी अधिवेशनावर अनुसुचित जाती आरक्षणात अ , ब , क , ड असे वर्गिकरण करण्यात यावे यासह विविध मागण्यासाठी लोकस्वराज्य अंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतिने संस्थापक अध्यक्ष मा.प्रा.रामचंद्र भराडे यांच्य नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांसह नांदेड ते नागपूर संघर्ष महापद यात्रा सनदशिर मार्गाने मातंग सामाजाच्या न्याय हक्काच्या मागणी संदर्भात अधिवेशनावर दि 18 डिसेंबर रोजी अंदोलन करीत असताना तेथिल प्रशासनाने पोलिस बळांचा वापर करून अंदोलनातील वृध्द महिला व पुरूषांना अमानुष लाठीमार करून जखमी केले .लोकशाहीच्या मार्गाने अंदोलन करित असताना समाजाच्या मागन्या संदर्भात अवाज दाबण्याचा कुटीर डाव करून लोकशाही प्रणाली नांदत असलेल्या देशात मातंग समाजाचे अब्रू वेशीवर टांगण्याचा प्रकार चालवला गेला.
सदरील घटनेबाबत योग्य ती चौकशी करून संबंधितावर कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्रातील मातंग समाज रस्त्यावर उतरून तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा लोकस्वराज्य अंदोलन , वारणेचा वाघ व मनसे संघटनेच्या वतिने रस्त्यावर उतरून तीव्र अंदोलन छेडण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांना एका निवेदनाद्वारे कळविले असून या निवेदनावर अण्णाभाऊ साठे संघर्ष समितीचे मराठवाडा अध्यक्ष मारोती वाघमारे खतगावकर , मनविसे चे जिल्हा उपाध्यक्ष संदिप कटारे , वारणेचा वाघ चे संस्थापक अध्यक्ष गौतम भालेराव , युवा परिवर्तन संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव वाघमारे , साहेबराव डोंगरे , राजु कुडकेकर , शेषेराव जेठ्ठे , गंगाधर गायकवाड , चंद्रकांत तुडमे , पिराजी भंडारे , साहेबराव कुडकेकर , गंगाधर भंडारे , चंद्रकांत भरांडे , निवृत्ती वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या निवेदनावर स्वाक्ष-या आहेत .

No comments: