रक्ताच्या नात्यापेक्षा रक्तदानाचे कार्य मोठे - डाँ.दिलीप पुंडे
मुखेड :- रियाज शेख
जात, पात, धर्माच्या नात्यापेक्षाही एक नात पुढे आहे ते म्हणजे माणुसकीचे नाते. त्याचप्रमाणे रक्ताच्या नात्यापेक्षा रक्तदानाचे कार्य मोठे आहे असे प्रतिपादन मुखेड भुषण डाँ.दिलीप पुंडे यांनी केले. ते आँल इंडिया तन्जीम ए इन्साफ संघटनेच्या वतीने आयोजीत रक्तदात्यांच्या सत्कार प्रसंगी बोलते होते. कार्यक्रमास प्रसिद्ध -ह्रदयरोग तज्ञ डाँ. अशोक कौरवार, जेष्ठ पत्रकार शिवाजी कोनापुरे, मानवता विचार मंचाचे अध्यक्ष मारोती कार्लेकर, सरकारी अभिवक्ता आमेर काझी, किशनराव पाटील, दलितमित्र गादेकर गुरुजी, दिलीप कोडगीरे, रोटरी क्लबचे महेबुब चौधरी इत्यादि उपस्थित होते.
यावेळी डाँ.अशोक कौरवार यांनी सांगीतले की, ज्योत से ज्योत जलाते चलो म्हणी प्रमाणे 1 इस रक्तदान केले तर 4 जणांचे जीव वाचतात. सर्व गोष्टीला पर्याय आहेत मात्र रक्तदानाला पर्यायच नाही. रक्तदान हे केलेच पाहिजे. रक्तदात्याला माहित नसते की आपले रक्त कुणाला व कोणत्या जातीतल्या माणसाला जात आहे. रक्तदानामुळे हजारों जणांचे जीव वाचतात. रक्तदानाची चळवळ न होता एक मोठे आंदोलन झाले पाहिजे असे ते म्हणाले. संविधान दिनानिमित्य तन्जीम ए इन्साफ चे रियाज शेख यांच्या नेतृत्वामध्ये आयोजीत केलेल्या रक्तदान शिबीरात 112 जणांनी रक्तदान केले. त्या सर्वांचा सत्कार कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अँड. मिलिंद कांबळे यांनी केले तर आभार पत्रकार शेख महेताब यांनी मानले. याच कार्यक्रमात मुखेड शहरात 51 वेळा रक्तदान केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते श्रावण रँपनवाड यांचा सन्मान चिन्ह देवुन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी पत्रकार बबलु मुल्ला, आसद बल्खी, खाजा धुंदी, शादुल होनवडजकर, आयुब चिखलीकर, संतोष इंगोले, अँड.गोविंद डुमणे, वजीर सलगरकर, गौस गोणारकर, जिलानी शहा, शेख सत्तार आदींनी प्रयत्न केले.

No comments:
Post a Comment