Tuesday, 22 December 2015

बिलोली; गुरूजनांचा आदर करा - डाँ लखमावार



गुरूजनांचा आदर करा - डाँ लखमावार 



बिलोली : ( यादव लोकडे )

सगरोळी येथिल श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल प्रशालेत दि २२ डिसेंबर रोजी आयोजित थोर गणित तज्ञ रामानुजन यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी सदैव गुरूजनांचा आदर व सन्मान करावा व गुरूजनांचे अनमोल विचार आत्मसात करावेत तिथेच आपले भवितव्य अवलंबून असल्याचे बिलोली ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक डाँ नागेश लखमावार यांनी सांगितले .
घरची परिस्थिती आर्थिक हालाखिची व शिक्षणाचा कुठलाही गंध नसलेल्या कुटुंबात जन्म जरी माझा झाला असला तरी मला मिळालेल्या माझ्या गुरूजनांच्या अनमोल मार्गदर्शन व माझे परिश्रम यामुळेच मी वैद्यकीय अधिकारी ते अधिक्षक पदापर्यत पोहचू शकलो असे सांगितले 
थोर गणित तज्ञ रामानुजन यांच्या जयंती दिनानिमीत्त शिवाजी हायस्कुल सगरोळी प्रशालेच्या गणित विभागाच्या वतिने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या आयोजित कार्यक्रमात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गणित तज्ञ रामानुजन यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकले तर प्रमुख मार्गदर्शक डाँ नागेश लखमावार हे विद्यार्थ्यांनी सदैव गुरूजनांच्या ऋणात , गुरूजनांचा आदर व सन्मान करावा , गुरूजनांचे अनमोल विचार आत्मसात करावेत त्यावरच आपले भवितव्य अवलंबून असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना चालु स्पर्धेच्या युग कसे आहे यात आपण स्पर्धा कशी करावी , आपण यश कसे संपादन कराल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी लोकमत संस्काराचे मोती या स्पर्धेतील विजेत्यांना डाँ लखमावार , माजी उपसरपंच सुनिलराव देशमुख , प्रशालेचे मुख्याध्यापक विठ्ठल जाठोरे यांच्याहस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले यावेळी दैनिक लोकमतचे सगरोळी प्रतिनिधी बस्वराज वाघमारे , पत्रकार गंगाधर कुडके , शिक्षक उपस्थित होते

No comments: