रतन पेंटर यांना नंदिग्राम भूषण पुरस्कार जाहिर
------------------------------
नांदेड-मराठवाड्यातील अतंत्य प्रतिष्ठतेचा असलेला नंदिग्राम भूषण पुरस्कार नांदेड मध्ये कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या रतन पेंटर यांना जाहिर करण्यात आला असून 13 व 14 फेब्रुवारी रोजी होणा-या नरेंद्र महोत्सवामध्ये मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार असल्याची घोषणा संयोजक धर्मभूषण अँड.दिलीप ठाकूर यांनी केली आहे. #प्रबोधनकार ठाकरे स्मृती प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी एका व्यक्तीला रोख ₹11000,स्मृतीचिन्ह,मानपत्र व महावस्त्र देऊन हजारो रसिकांच्या उपस्थितीत नंदिग्राम भूषण पुरस्काराने गौरविण्यात येते.आतापर्यंत जेष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी,निवृत मनपा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.साहेबराव मोरे ,स्वच्छतादुत माधवराव झरीकर यांना नंदिग्राम भूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.नरेंद्र महोत्सवात 13 फेब्रुवारी रोजी तिसरा मराठी हास्य दरबार व 14 फेब्रुवारी रोजी एकोणिसावे अ.भा.विराट कविसंमेलन होणार असून स्वागताध्यक्ष पदी राजेश संभाजीराव पवार यांची निवड करण्यात आली आहे.रतन पेंटर यांनी आपले संपुर्ण आयुष्य कलाक्षेत्रासाठी वाहून घेतले आहे.बँनर प्रिटींग सुरू होण्याआधी त्यांचा नांदेड मध्ये मोठा दबदबा होता.त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो तरूणांनी पेटिंग व्यवसायात आपली उपजिविका चालविली.सध्या बँनर युगात दुर्लक्षीत असलेल्या पेटिंग व्यवसायात रतन जैन यांनी आयुष्यभर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांची नंदिग्राम भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी राज ठाकूर,राजू मोरे,संतोष परळीकर,सुनील पाटील,मनोज ठाकरे,शेखर अंबारे,संजय लोया हे परिश्रम घेत आहेत.
Plz publish(कृपया बातमी प्रसिध्द करून सहकार्य करावे.ही नम्र विनंती)

No comments:
Post a Comment