नमस्कार लाईव्ह २८-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- मेक्सिको : 450 किलोवर वजन गेलेल्या जगातील सर्वात स्थूल व्यक्तीचा मृत्यू
जगातील सर्वात स्थूल असलेल्या अँड्रिज मोरेनो यांचं मेक्सिकोमध्ये निधन झालं. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी वजन कमी करण्यासाठी सर्जरी केली होती. त्यानंतर हृदयविकाराचा धक्का आणि पेरिटनाईटिस म्हणजेच पोटातील सुजेमुळे त्यांचा मृत्यू झाला. मोरेनो 38 वर्षांचे होते. कोणे एके काळी त्यांच्या वजनाने 450 किलोचा आकडा गाठला होता. 28 ऑक्टोबर रोजी केलेल्या सर्जरीनंतर सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य व्यतीत करता येईल, अशी त्यांची आशा होती. ते यापूर्वी पोलिस दलात कार्यरत होते. मेडिकल डेलीमधील अहवालानुसार सर्जरीनंतर त्यांच्या पोटाचा तीन चतुर्थांश म्हणजे 75 टक्के भाग कमी करण्यात आला होता. त्यांची भूक कमी करण्यासाठी पोटात एक ट्यूब लावली होती. ही सर्जरी यशस्वी झाल्याचं मेक्सिकोच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. मोरेनो यांना नाताळाच्या दिवशी श्वासोच्छवासात त्रास होत होता. अखेर नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. मदतीसाठी नातेवाईकांनी अग्निशमन दलाच्या जवानांनाही पाचारण केलं होतं. मात्र हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
२- न्यूयॉर्क : विद्यार्थ्याशी संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेला सहा वर्षांची कैद
अमेरिकेच्या विनकोंसिन प्रांतातील एका न्यायालयाने १६ वर्षीय विद्यार्थ्यांशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोपाखाली एका शिक्षिकेला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा तसेच एक लाख वीस हजार डॉलर दंड ठोठावलाय. नोवाक असे या आरोपी शिक्षिकेचे नाव आहे. डेलीस्टारडॉटकोडॉटयूकेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षिकेने आपला गुन्हा कबूल केलाय. मात्र हे संबंध दोघांच्या संमतीने ठेवल्यात आल्याचे तिने यावेळी सांगितले. तसेच तिने शिक्षा कमी कऱण्याबाबत दाखल केलेली याचिका यावेळी फेटाळून लावली. याप्रकरणाची माहिती विद्यार्थ्यानेही अन्य शिक्षकांना दिली नव्हती. ११ डिसेंबर रोजी दुसऱ्या शिक्षिकेने नोवाक आणि विद्यार्थ्याला क्लासमध्ये चुंबन घेताना पाहिले. त्यानंतर या प्रकऱणाचा खुलासा झाला.
३- काबूलमध्ये विमानतळाजवळ स्फोट
अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये एका विमानतळावरील कारमध्ये बॉम्बस्फोट झालाय. हमिद करझाई या विमातळाजवळील एका कारमध्ये हा स्फोट झालाय. या हल्ल्यात अनेक जण मृत्यूमुखी पडल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. तर चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलेय. अफगाणिस्तान सरकारने या स्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. अफगाणिस्ताना याआधीही अशा प्रकारचे हल्ले झालेत. याच महिन्यात आठ डिसेंबरला अफगाणिस्तानच्या कंधार विमानतळावर गोळीबार तसेच बॉम्बस्फोट झाला होता. तीन आत्मघाती तालिबान्यांनी हा हल्ला केला होता.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- नव्या वर्षात नवी सुरुवात, 15 जानेवारीला भारत-पाक द्विपक्षीय चर्चा
भारत-पाकिस्तान परराष्ट्र सचिवांच्या पातळीवर नवीन वर्षात म्हणजेच 15 जानेवारी 2016 च्या दरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील डॉन वृत्तपत्रातील बातमीनुसार नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अजीज यांनी भारतासमोर चर्चेचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. आता पाकिस्तान भारत सरकारच्या उत्तराची वाट पाहतंय.
५- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाक दौऱ्यावर ‘सामना’तून खोचक टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाक दौऱ्यावर आजच्या ‘सामना’तून खोचक टीका करण्यात आली आहे. भारत-पाक संबंध सुधारावेत अशी आमचीही इच्छा आहे, मात्र पाकची भूमी शापित आहे. तिच्या नादी जे लागले त्यांचं राजकारणच संपलं, असं अग्रलेखात म्हटलं आहे. ‘काँग्रेसचे पंतप्रधान अचानक लाहौर किंवा कराचीत उतरले असते, तर भाजपने त्यांचं जंगी स्वागत केलं असतं का असा खोचक सवालही शिवसेनेने विचारला आहे. मोदींच्या पाक भेटीचं स्वागत होत असलं तरी पूर्वीचे अनुभव पाहता पंतप्रधानांनी जरा जपून
पाऊल टाकावं अन्यथा मोदींना वाजपेयींप्रमाणे धोका होऊ शकतो’ असा सल्लाही यातून मोदींना देण्यात आला आहे. हाफीज सईद, इम्रान खान काय बरळले ते सोडून द्या. पण मोदींच्या पाकभेटीचे कौतुक भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनीही केले हे विशेष असल्याचा टोला लगावला आहे.
६- देशाच्या संसदेला नव्या इमारतीची गरज, महाजन यांची मागणी
देशाला संसदेची नवी इमारत मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासमोर संसद भवनाच्या नव्या इमारतीबाबत प्रस्ताव मांडला 88 वर्ष जुनी असलेली इमारत जागेची कमतरता आणि जुन्या बांधकामामुळे संकट ठरत असल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे. यासाठी संसद भवन परिसरातील एका जागेचा आणि राजपथजवळील एका जागेचा पर्याय देण्यात आला आहे. सेंट्रल हॉल लोकसभेच्या कामकाजासाठी वापरायचा झाला, तरीही जागेची कमतरता भरुन काढता येणार नाही, असं महाजन यांनी म्हटलं आहे. सेंट्रल हॉलमध्ये सध्या 398 आसनं आहेत, ती 550 पर्यंत वाढवता येऊ शकतात. मात्र ती अपुरी ठरण्याचं म्हटलं जातं.
७- सोनियांचे वडील फॅसिस्ट होते, काँग्रेसच्या मुखपत्रात उल्लेख
एरव्ही कोणत्याही प्रकरणावरुन विरोधकांवर टीका करणारी काँग्रेस आता स्वतःच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण मुंबई काँग्रेसच्या मुखपत्रात स्वपक्षाच्या नेत्यांवरच टीका करण्यात आलं आहे. खुद्द मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हेच या मुखपत्राचे संपादक आहेत. जर सरदार पटेलांच्या सल्ल्याने पंडित जवाहरलाल नेहरु वागले असते तर आज काश्मिर, तिबेट, सियाचीन हे प्रश्न उद्भवलेच नसते, असा उल्लेख ‘काँग्रेस दर्शन’मध्ये करण्यात आला आहे. याचसोबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या नेतृत्त्वाबद्दलही मुखपत्रात टीका करण्यात आली सोनियांचे वडील फॅसिस्ट होते सोनिया गांधींचे वडील एक फॅसिस्ट शिपाई होते. 1968 मध्ये राजीव गांधींसोबत सोनिया यां विवाह झाल्यानंतर त्या भारतात राहू लागल्या. मात्र त्यांनी उशिरा म्हणजेच 1983 मध्ये भारताचं नागरिकत्व स्वीकारलं. सोनिया गांधी 1998 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या आणि त्यांनी सरकार स्थापन करण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला होता, असंही मुखपत्रात म्हटलं आहे.
८- डीडीसीए घोटाळा : अरुण जेटलींना चौकशी आयोगाची क्लीन चीट
डीडीसीए भ्रष्टाचार प्रकरणी अर्थमंत्री अरुण जेटली यांना क्लीन चीट मिळाली आहे. दिल्ली सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय चौकशी आयोगाला जेटलींविरोधात एकही पुरावा सापडलेला नाही. डीडीसीएच्या अध्यक्षपदावर असताना जेटलींनी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केला असे अनेक गंभीर आरोप अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाने केले होते. परंतु 274 पानी अहवालात समितीने जेटलींना कुठेही जबाबदार धरलेले नाही. आता जेटलींनी केजरीवालांसह आपच्या 6 नेत्यांवर मानहानीचा दावा ठोकून नुकसान भरपाई म्हणून 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल अडचणीत येण्याची शक्यता आहे. तर किर्ती आझाद यांनी जेटलींवर आरोप करुन स्वत:च्या पायावर दगड मारुन घेतला आहे.
९- 'स्मृती इरांनीकडे लोकं मोदींची दुसरी पत्नी म्हणून पाहाता' -काँग्रेस नेते
मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यावर टीका एका काँग्रेस नेत्याने असं वक्तव्य केलंय ज्यामुळे ते टीकेचं लक्ष बनलेत. भाजप नेते राम माधव यांनी यावक्तव्याविरोधात त्यांच्यावर टीका केली आहे. आसाममधील काँग्रसेचे नेते निलामोनी सेन डेका यांनी 'स्मृती इरानी यांच्याकडे लोकं नरेंद्र मोदी यांची दुसरी पत्नी म्हणूनच पाहाता' असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. निलामोनी यांनी स्मृती इरानी यांच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा उपस्थित केला. पण त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठणार हे नक्की.
१०- अवघ्या ७१६ रुपयांत स्पाईसजेटने करा विमान सफर
स्पाईसजेट विमान कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त दरात हवाई सफर करण्याची ऑफर दिलीय. नववर्ष स्वागताच्या निमित्ताने कंपनीने 'हॅप्पी न्यू इयर सेल या नावाने ही योजना सुरु केलीय. या योजनेंतर्गत तुम्ही केवळ ७१६ रुपयांत विमान प्रवास करु शकता. ही ऑफर केवळ देशांतर्गत प्रवासासाठी लागू करण्यात आलीय. या योजनेंतर्गत तुम्ही २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत तिकीट बुक करु शकता. १५ जानेवारी ते १२ एप्रिल २०१६दरम्यान तुम्ही स्वस्त विमान प्रवासाची मजा घेऊ शकता. स्पाईसजेटची वेबसाईट, अॅपवरुन वा अन्य ठिकाणांहून तुम्ही हि तिकीटे बुक करु शकता.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- शिवसेना नगरसेवक गुंजाळ हत्येप्रकरणी 4 आरोपी अटकेत
अंबरनाथमधील शिवसेना नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्येप्रकरणी चार आरोपींना टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. संदीप गायकार, दीपक कलिदे, विशाल जवेरी आणि सचिन चव्हाण अशी या आरोपींची नावं आहेत. संदीप उर्फ पप्पू गायकार हा यातील प्रमुख आरोपी असल्याची माहिती आहे. अंबरनाथ नगरपालिकेतील शिवसेना नगरसेवक रमेश गुंजाळ शुक्रवाळी सकाळी घरातून बाहेर पडत असताना त्यांच्यावर काही जणांनी चाकूहल्ला केला होता. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गुंजाळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथे उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूपूर्वी दिलेल्या जबानीत त्यांनी 13 व्यक्तींची नावं घेतली होती. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि चौघांना ताब्यात घेतलं.
१२- चंद्रपूर; थंडीमुळे आणि दूध न मिळाल्याने चंद्रपुरातील बछड्यांचा मृत्यू
चंद्रपुरातल्या सावली तालुक्यात वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू थंडी आणि दूध न मिळाल्याने झाल्याचं समोर आलं आहे. चारपैकी दोन बछड्यांच्या पोस्टमॉर्टेम अहवालातून हे निष्पन्न झालं आहे. त्यामुळे इतर दोन बछड्यांचा अंतही आईची ऊब आणि उपासमारीमुळे झाल्याचं म्हटलं जात आहे. सावलीतल्या नवेगाव मार्गावर फिरायला गेलेल्या लोकांना शनिवारी ही चार वाघांची पिल्लं मृतावस्थेत आढळून आली. याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर सुरुवातीला हद्दीवरुन वनविभाग कर्मचाऱ्यांनी हात झटकण्याचेही प्रयत्न केले. परंतु मोठा गाजावाजा करुन सुरु झालेल्या व्याघ्र मोहीमेला या घटनेने धक्का बसला आहे. मात्र या प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या बछड्यांची आई म्हणजेच वाघिण कुठे आहे? तिची शिकार झाली का? या भागात चार बछड्यांना जन्म दिलेली वाघिण आहे, याची माहिती वनखात्याला नव्हती का?
दरम्यान या मृत्यूप्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
१३- मुंबई; मिरारोडमध्ये डान्सबारवर छापा, 12 बारबालांसह 35 ग्राहकांना अटक
मुंबईतल्या मिरारोडच्या काशिमीरा येथील ऑर्चिड डान्स बारवर छापा टाकून 12 बारबालांची सुटका करण्यात आली आहे. या बारमध्ये अतिरिक्त मुली कामावर ठेवल्यानं पोलिसांनी बारबाला आणि ग्राहकांना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी नयानगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बारबाला अल्पवयीन असून त्यांना बारमधील एकाच रूममध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे या बारमधून पोलिसांनी 12 बारबाला आणि 35 लोकांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये हॉटेलचा स्टाफ आणि ग्राहकांचाही समावेश आहे. परंतु या हॉटेलचा मालक अजुनही फरार आहे.
१४- ‘मिहान’मध्ये 63 कंपन्यांना नोटीसा पाठवणार, विप्रो, डीएलएफचा समावेश
नागपूरमधील महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनींबद्दल वाद निर्माण झालाय. ‘मिहान’मध्ये ज्या उद्योजकांनी जमिनी ताब्यात घेऊन उद्योग सुरू केलेला नाही आणि ज्यांनी उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अशा सर्व उद्योजकांसोबत बैठक घेण्यात येईल,अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी येथे झालेल्या मिहान प्रकल्प प्रगती आढावा बैठकीत दिली.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- सातारा : दरीत कोसळलेल्या कारमधील चौघांची 28 तासांनी सुटका
पोलादपूरच्या घाटात तब्बल 700 फूट खोल दरीत कोसळलेल्या कारमधील चार जणांना वाचवण्यात यश आलं आहे. महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुपनी शर्थीचे प्रयत्न करुन 28 तासांनंतर चौघांना जिवंत बाहेर काढले, तर कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये एकूण सहा प्रवासी होते. गाडीतील सर्व प्रवासी बंगळुरुचे रहिवासी होते. शनिवारी रात्री 1.30 वाजता कार दरीत कोसळली. त्याच पती-पत्नीचा दोघांचा जागीच मृत्यू झाला. जमुना खन्ना बिरानी (वय 65 वर्ष) आणि वेणूगोपाल स्वामी खन्ना बिरानी (वय 70 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.
१६- अकोल्यात माकडांचा उच्छाद, 3 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू
अकोला जिल्ह्यातील तेल्हारामध्ये माकडांच्या उच्छादात एका तीन महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. आरोही मालवे असं या मृत मुलीचं नाव आहे. माकडांच्या हल्ल्यात मृत मुलीची आजी त्रिगुणा मालवे ही महिला जखमी झाली आहे. त्रिगुणा मालवे या आज सकाळी आपली नात आरोहीला घेऊन अंगणात बसल्या होत्या. यावेळी एका माकडानं भिंतीवर उडी मारली. त्यावेळी भिंतीच्या काही विटा आरोहीच्या डोक्यावर पडल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. तर तिची आजी त्रिगुणा मालवे यांच्या हातालाही दुखापत झाली आहे. चार महिन्यांपूर्वी तेल्हारा शहरालगतच्या बेलखेडमध्ये माकडाच्या हल्ल्यात एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे. त्यामुंळं या माकडांचा बंदोबस्त कधी होणार, हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातो आहे.
१७- मुंबईच्या डब्बेवाल्यांमध्ये वादाची ठिणगी
हजारो मुंबईकरांना वेळेत डब्बा पोहचवण्यासाठी मुंबईचे डब्बेवाले प्रसिद्द आहेत. गेल्या सव्वाशे वर्षांपासून त्यांची ही परंपरा अखंडित सुरु आहे. ऊन वारा पाऊस याची चिंता न करता आपल काम करणाऱ्या या डब्बेवाल्यांना मध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरु आहेत. कारण आहे त्यांचेच सहकारी असणाऱ्या सुभाष तळेकर हे सुरु करत असलेल्या ख़ानावळीचे. सुभाष तळेकर हे डब्बावाला संघटनेचे प्रवक्ते म्हणुन माध्यमांमधे प्रसिद्द आहेत. डब्बेवाल्यांचा आरोप आहे की सुभाष तळेकर हे स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी डब्बा वाहतूक संघटनेच्या नावाचा गैरवापर करत स्वताची खानावळ सुरु करत आहेत, त्यामुळे डब्बेवाल्यांच नुकसान होणार आहे. तर दुसरीकडे सुभाष तळेकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत असं सांगत या खानावळी साठी मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाच्या नावाचा कुठलाही वापर करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. अनेक परप्रांतीयांच्या खानावळी मधून मुंबईकरांना डब्बे पोहचवणाऱ्या डब्बेवाल्यांना त्यांच्यातल्याच एकाने स्वतःची खानावळ सुरु केली तर अडचण काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- एअरटेलचा ‘अनलिमिटेड व्हॅलिडिटी’चा इंटरनेट पॅक लॉन्च
एअरटेलचं सिम वापरणाऱ्या ग्राहकांना खुशखबर आहे. एअरटेलने अनलिमिटेड व्हॅलिडिटी असणारा इंटरनेट पॅक लॉन्च केला आहे. एअरटेलने या पॅकसह आणखी तीन डेटा प्लॅनही लॉन्च केले आहेत, ज्यांची व्हॅलिडिटीही अनलिमिटेड आहे. हा डेटा प्लॅन 2G, 3G आणि 4G नेटवर्कसाठी आहे. एअरटेलने 110MB, 75MB आणि 35MB इंटरनेट डेटासाठी हा प्लॅन तयार केला आहे. एअरटेलचे हे नवे प्लॅन 18 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. मुंबईकर ग्राहकांसाठी एअरटेलने आणखी काही स्पेशल प्लॅन लॉन्च केले आहेत. यामध्ये 22 रुपयात 30 एमबी, 54 रुपयांत 80 एमबी आणि 73 रुपयांत 110 एमबी डेटा मुंबईकरांना मिळणार आहे. एअरटेल कंपनीचे अजय पुरी यांनी सांगितले की, आता ग्राहकांना व्हॅलिडिटीवरुन काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही.
१९- कल्पना चावलावर आधारित चित्रपटात प्रियंका मुख्य भूमिकेत
पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावला यांच्या प्रेरणादायी आयुष्यावर लवकरच एक चित्रपट येणार आहे.‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात साकारलेल्या ‘काशीबाई’मुळे कौतुकाचा वर्षाव होणारी प्रियंका चोप्रा यात मुख्य भूमिका साकारण्याची शक्यता आहे.‘या घडीला मला सहा चित्रपटांची ऑफर आलेली आहे. त्यापैकी काही चित्रपटांच्या स्क्रीप्ट फारच उत्तम आहेत. माझ्याकडे पर्याय खूप आहेत, पण वेळ कमी. त्यामुळे कल्पना चावलांवर आधारित चित्रपटातील भूमिका मी स्वीकारणार का, याबाबत इतक्यात
काही सांगता येऊ शकत नाही.’ असं प्रियंका चोप्रा म्हणते. ‘क्वॉन्टिंको सिरीजला मिळालेल्या तूफान प्रतिसादामुळे ती लांबवण्यात आली. त्यामुळे मला काही चित्रपट करता येणार नाहीत’ अशी माहिती यावेळी प्रियंकाने दिली. कोलंबिया अंतराळयानातून कल्पना चावला सर्वप्रथम 1997 मध्ये अवकाशात गेल्या होत्या. 2003 मधल्या मोहिमेवरुन येताना अंतराळयानाचा स्फोट होऊन सात अंतराळवीरांचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यात कल्पना यांचाही समावेश होता.
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२०- कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन भावाचा मृत्यू; भोकर तालुक्यातील धानोरा येथील घटना
२१- शहरात करणार नळांचे सर्व्हेक्षण; तारोद्यात अडीच हजार नळाला बसविले मीटर
२२- पैनगंगा नदी पाण्याअभावी कोरडीठाक
२३- गोदापात्रातून दिवसरात्र रेतीचे अवैध उत्खनन ; प्रशासनाची डोळेझाक
२४- शहरवासियांना पाणीपुरवठा मात्र वर्षातून १०० दिवस; पाणीपट्टी मात्र ३६५ दिवसाची
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आपली बाग साजावितांना दुसऱ्याची फुले विस्कटणार नाहीत यांची काळजी घ्या
उच्चारावरून विद्वता, आवाजावरून नम्रता व वर्तनावरून शील समजते
[सोनल अग्रवाल, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
प्रोटीन >> आपल्या शरीराला दररोज आपल्या वजनाइतके प्रोटीनचि आवशकता असते. ते आपल्या आहारातून परिपूर्ण भेटत नाही. त्याची कमतरता भरून काढण्यासाठी
वेटगेनर >> मुले-मुली, पुरुष-महिला सर्वकाही आहार घेवून सुद्धा त्यांचे वजन वाढत नाही. ते काटकुळे व बारीक असतात. त्यांच्यासाठी उपयुक्त
फॅट बर्न >> चरबी कमी करणे व शरीराचे वजन कमी करणे. जे व्यक्ती आहार कमी घेवूनसुद्धा वजन कमी होत नाही त्यासाठी उपयुक्त [लवकर वजन कमी करते]
मल्टी व्हिटामिन्स >> आपल्या रोजचा आहारात परिपूर्ण व्हिटामिन्स, मिनरल्स, भेटत नाहीत त्याची कमतरता भरून काढण्यासाठी
एनर्जी ड्रिंक >> सर्व वयोगटातील खेळाडू, जिम करणारे, रिकव्हरी, स्ट्रेंग्थ, उर्जा वाढविण्यासाठी उपयुक्त. याचा वापर कोणीही करू शकते.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment