Thursday, 24 December 2015

ईद ए मिलादुन्नबी उत्साहात साजरी


" मुखेड येथे ईद ए मिलादुन्नबी उत्साहात साजरी " 
" विश्वशांती साठी सामुहीक प्रार्थना "

           मुखेड :- रियाज शेख
जगाला एकेश्वरवादाचा सिध्दांत देणारे, जात व वर्ण विरहीत धर्म-समाज रचनेची व्यवस्था प्रदान करणारे, अस्पृष्यतेचा धार्मिक सिध्दांत नाकारणारे, समता व समानतेचा पुरस्कार करणारे, भेदाभेद दूर करून श्रीमंत-गरीब, गोरा-काळा, वरिष्ट-कनिष्ट, गुलाम-सुलतान सगळ्यांना समान रांगेत ऊभे करणारे इस्लाम धर्माचे पैग़ंबर मोहम्मद (स.अ.स.) यांच्या जन्मदिन अर्थात ईद ए मिलादुन्नबी मुखेड शहर व तालुक्यातील बा-हाळी, जांब येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. ईद निमित्य विश्वशांती साठी सामुही प्रार्थना करण्यात आली.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ईद ए मीलाद निमित्त शहारातुन भव्य जुलूस काढण्यात आला. यामध्ये युवक, बालक जेष्ठ मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होते. यावर्षी मुस्लीम युवकांनी मोठ्या संख्येने जुलूस मध्ये सहभागी होवुन नारे तकबीर अल्लाह हू अकबर, पैगंबर मोहम्मद जिंदाबाद चे नारे लावले. जुलूस स्थानिक हजरत मस्तान शाह वली दर्गाह हुन प्रमुख मार्गाने काढण्यात आला. स्थानिक बस स्टँड चौक मध्ये हाफिज आरिफ रजा, हाफिज अब्दुल गफार यांनी ईद ए मीलाद निमित्य उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले. याजुलुस मध्ये रजा चौक मस्जिद, नुरी मस्जिद फुलेनगर, गरीब नवाज मस्जिद, मदीना, मोहम्मदीया मस्जिद चे प्रमुख उपस्थिती होती. जुलूस ला यशस्वी करण्यासाठी अयुब पठाण, जिलानी शहा, युसुफ शहा, रमजान सौदागर, मियासेठ कुरेशी, नजीर सौदागर, शेख रहीमोद्दीन, शेख रफीक सदर, गौस अली सलगरकर, खाजा धुंदी, शेख मसरुर, आसद बल्खी, बबलु मुल्ला, शेख मुनवर, इमरान पठाण आदींनी परिश्रम घेतले. " ईद निमित्त विविध ठिकाणी बुंदी, खाऊ, पाणी पाउच वाटप करण्यात आले. मित्र संघ ग्रुप चे अध्यक्ष वतीने खाऊ वाटप करण्यात आले. तसेच हाजी रतन सेठ चौधरी, टिपु सुलतान ब्रिगेड च्यावतीने ही बुंदी, खाऊ वाटप करण्यात आले. पटेल पान शाँप, सानिया टी हाऊस च्यावतीने पाणी पाऊच वाटप करण्यात आले.
ईद निमित्य पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला होता.
***********************************************************************
किनवट येथे ईद ए मिलादुन्नबी उत्साहात साजरी 

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मस्जीत-ए-खिझरा शुभाश नगर त. किनवट मध्ये ईद ए मिलादुन्नबीचा जुलूस काढण्यात आला. 
मौलाना तनिष राझा यांनी विश्वशांतीसाठी प्रार्थना केली. 
यावेळी हाजी अहमद, हाजी गफ्फार, गुलाम मुस्तफा, शेख मसूद, सय्यद जाफर, शेख महमूद आली, शेख मुर्तुजा, शेख मसूद आली, सय्यद मजीद, समशेर खिजी, 
साजिद खान, पी.आय. पाटील, मौलाना म. तैश उपस्थित होते. 



No comments: