" मुखेड येथे महिला बचत गटाची 4 दिवशीय कार्यशाळा संपन्न "
मुखेड :- रियाज शेख
राज्य नागरी उपजिवीका अंतर्गत मुखेड नगर परिषदेच्या वतीने शहरातील जोशी इन्फोटेक मध्ये महिला बचत गटांची 4 दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्षा सौ.मनीषा चंद्रकांत गरुडकर होते. प्रमुख पाहुणे मुख्याधिकारी डाँ.अमितकुमार सोंडगे, आरपीआय जिल्हाध्यक्ष गौतम काळे, पाणीपुरवठा सभापती जगदीश बियाणी, जय जोशी, कुंडलवाडी न.पा चे सुनिल कल्याणकर, बिलोली न.पा चे आर्चणा मोहीरे सह फुलवळकर, शिवशंकर कुचेवाड, रफिक बागवान, समेत न.पा. चे कर्मचारी उपस्थित होते.
चार दिवशीय या कार्यशाळा मध्ये बचत गटाच्या महिलांना फायदेशीर व्यवसाय कसे करावे याबाबत प्रोजेक्टर द्वारा माहीती देण्यात आली. उपस्थित महिलांना साहित्य वाटप करण्यात आले. ज्यामध्ये बैग, नोटबुक, पेन, छोटी बँग देण्यात आली. याकार्यशाळेमध्ये १२ बचत महिला गटांच्या महिलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये इद्रांयनी, पद्मावती, निर्मिति, श्रीकिर्ती, वनश्री, अन्नपुर्णा, सम्राट अशोका, शिवशंकर, मातोश्री, आदर्श, प्रतीक्षा, ओर साईकृपा महिला बचत गटांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियंका यंबल सहायक प्रकल्प अधिकारी यांनी केले. तर सुत्रसंचलन बलभीम शेंडगे, आभार समुदाय संघटक उमाकांत डांगे यांनी मानले.

No comments:
Post a Comment