Monday, 21 December 2015

नमस्कार लाईव्ह २१-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २१-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- मिस युनिव्हर्स’मध्ये सूत्रसंचालकाची ‘मिस’टेक! फिलिपाईन्सऐवजी कोलंबियाला ताज 
                                   फिलिपाईन्सची पिया वर्जकैक मिस युनिव्हर्स बनली आहे. अमेरिकेतील लॉस वेगास शहरात 64 वी ‘मिस युनिव्हर्स ब्युटी पेजेंट’ स्पर्ध पार पडली. मात्र, सूत्रसंचालकाच्या चुकीमुळे मिस कोलंबियाच्या अरियादना ग्वातरेज नावाची घोषणा केली. तिला मिस युनिव्हर्सचा किताब देण्यातही आला. मात्र, सूत्रसंचालकाला चूक लक्षात आली आणि मिस कोलंबियाच्या शिरपेचातून ताज काढून फिलिपाईन्सच्या पिया वर्जकैक हिला देण्यात आला.
काय झालं स्टेजवर?
‘मिस युनिव्हर्स’च्या अंतिम फेरीत दाखल झालेल्या फिलिपाईन्सची पिया वर्जकैक आणि कोलंबिया अरियादना ग्वातरेज या दोघी स्टेजवर होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक स्टीव्ह हार्वे यांनी मिस कोलंबिया अरियादना ग्वातरेज ‘मिस युनिव्हर्स’ म्हणून घोषित केलं. 2014 ची मिस युनिव्हर्स पॉलिना वेगा हिने मिस कोलंबिया गुटिरेज हिला मिस युनिव्हर्सचा किताबही दिला. मात्र, त्यानंतर चूक लक्षात आली आणि ग्वातरेजकडून किताब परत घेऊन फिलिपाईन्सच्या पियाला देण्यात आला.

२- इंडोनेशियाला बसले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.० इतकी मोजण्यात आली 
३- चीनमध्ये शेनझेन शहरात दरड कोसळल्याने ३३ इमारती कोसळल्या 
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी विहिंप आक्रमक, देशभरातून दगड मागवले 
                    विश्व हिंदू परिषद अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी आक्रमक झालेली दिसते आहे. देशभरातून मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेने दगड मागवले आहेत. पोलिसांच्या निगराणीखाली दोन ट्रक भरुन दगड अयोध्येतील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयामध्ये जमा झाले आहेत. इतकच नाही तर महंत न्रित्य गोपाल दास यांच्याकडून मंदिराच्या शिला पूजनाचा कार्यक्रमही पार पडला आहे. ही गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मंदिर उभारण्याचे संकेत असल्याचं विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केलं. दरम्यान, 2017 मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे वातावरण तापवलं तर जात नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

५- निर्भया गँगरेप: अल्पवयीन दोषीविरोधातील याचिका फेटाळली 
                       संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्ली गँगरेपप्रकरणातील बाल गुन्हेगाराचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण सुटकेला विरोध करणारी महिला आयोगाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे डांबून ठेवणं चुकीचं आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. दिल्लीतल्या निर्भया बलात्कारप्रकरणी सर्वात हिंसक कृत्य करणाऱ्या अल्पवयीन बलात्काऱ्याला सोडून देण्याची नामुष्की आली आहे. कालच एका अज्ञात स्थळी त्याला नेण्यात आलं आहे. काल गुन्हेगाराच्या सुटकेनंतर निर्भयाच्या आई-वडिलांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राजपथावर आंदोलनही केलं. यावेळी दिल्ली पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेऊन निर्भयाच्या आई-वडिलांचं आंदोलन दडपण्याचाही प्रयत्न केला होता.

६- मालवणीतील 3 तरुण 2 महिन्यांपासून बेपत्ता; ISIS संघटनेत सहभागी झाल्याचा संशय 
                  कल्याणपाठोपाठ आता मुंबईतील मालवणी भागातील 3 तरुण आयसीस या इस्लामिक दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. मालवणी भागातून तीन तरुण किरकोळ कारण सांगत 2 महिन्यांआधी घराबाहेर पडले होते. मात्र ते अद्यापही घरी परतलेले नाहीत. त्यामुळे ते तरुण आयसिसमध्ये सहभागी झाल्याचा एटीएसला दाट संशय आहे. दोन महिन्यांआधी 23 वर्षीय अयाज सुल्ताननं पुण्यात नोकरीसाठी जात असल्याचं सांगत घर सोडलं. तर मोहसिन शेख हा 26 वर्षीय तरुण, मित्राच्या लग्नाचं कारण देत घराबाहेर पडला. याच पद्धतीनं आधार कार्डमधल्या त्रुटी दुरुस्त करुन येतो असं सांगून वाजिद शेख यानंही घर सोडलं. एटीएसच्या सूत्रांनुसार यापैकी अयाज सुल्तान यानं याआधीच देश सोडल्याचा संशय आहे. पालकांच्या म्हणण्यानुसार या तिघांच्या वागण्या-बोलण्यात बेपत्ता होण्याआधी अनेक बदल झाले होते.. मात्र, त्यांच्या बेपत्ता होण्यामागे असाही संशय वर्तवला जात असल्यानं पालक आता चिंतेत आहेत.

७- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी केजरीवाल व आपच्या पाच नेत्यांविरोधात दिल्ली हायकोर्टात केला अब्रुनुकसानीचा खटला दाखल 

८- राष्ट्रपति प्रणब मुखर्जी २३ आणि २४ डिसेंबर रोजी कर्नाटक दौऱ्यावर 

९- ज्युवेनाईल जस्टीस विधेयकावर राज्यसभेत होणार चर्चा, सर्व पक्षांचे चर्चेवर एकमत 

१०- महिलांनी आता मेणबत्तीऐवजी मशाल हाती घेण्याची वेळ आली आहे - स्वाती मालिवाल, दिल्ली महिला आयोग अध्यक्ष 

११- आम्हाला तुमची चिंता कळते, पण सध्याचे जे कायदे आहेत त्यानुसार अल्पवयीन दोषीला तीन वर्षांपेक्षा जास्त तुरुंगात ठेवता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय 

१२- केंद्र सरकार सर्व मुद्यांवर चर्चेसाठी तयार आहे, पण विरोधी पक्षच चर्चा करणे टाळत आहे - मुख्तार अब्बास नकवी, भाजपा 
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१३- औरंगाबाद येथील बौद्धविहारे पडणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, आज कृती समिती तर्फे भिख्खूच्या मार्गदर्शखाली क्रांती चौकातून मोर्चाचे आयोजन 

१४- कुख्यात गँगस्टर अश्विन नाईकला आज कोर्टात 
                       कुख्यात गँगस्टर आश्विन नाईक याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. एका बिल्डरकडून 50 लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आश्विन नाईकनं तक्रारदार बिल्डरच्या पार्टनरकडून 50 लाखांची खंडणी मागितली होती. त्यानंतर आश्विननं तक्रारदार बिल्डरकडे खंडणीसाठी तगादा लावला होता. ही खंडणीची रक्कम वसूल करताना पोलिसांनी आश्विन नाईकला रंगेहात अटक केली आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी आश्विनला चार साथीदारांसह बेडया ठोकल्यात..  या प्रकरणी अश्विन नाईकाल आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.

१५- केवळ स्वतःची काळजी घेण्याइतका वृद्ध नाही झालो : पवार 
                   75 वर्षांचा झालो तरी फक्त स्वत:ची काळजी घ्यावी इतका मी वृद्ध झालो नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी नेते शरद पवारांनी केलं आहे. पवारांनी मराठी साहित्य संमेलनाबरोबर विविध प्रश्नावर आपली मतं व्यक्त केली. बाजीराव मस्तानी चित्रपटाविरोधात निदर्शनं करणं अयोग्य असल्याचंही मत यावेळी पवारांनी व्यक्त केलं. चित्रपट पाहणं किंवा न पाहणं हा वैयक्तिक भाग असल्याचं पवारांनी म्हटलं.  त्याच बरोबर साहित्य संमेलन अध्यक्ष निवडणूक मला मान्य नसल्याचंही यावेळी पवारांनी म्हटलं.

१६- पार्टी आॅल नाईट, नाताळ आणि थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत हॉटेल्स सुरू राहणार  

१७- निर्भयाचे आई-वडिल आज ४ वाजता जंतर-मंतरवर करणार आंदोलन 
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या मुलाला पोलिसानं वाचवलं, प्रसंग सीसीटीव्हीत कैद
                          एका लहानग्याला रेल्वेचा रुळ ओलंडत असताना प्लॅटफॉर्मवर चढता आलं नाही. पण त्याचक्षणी कर्जतहून सीएसटीकडे जाणारी लोकल आली. त्यावेळी संदीप भोपळे या प्रवाशानं प्रसंगावधान दाखवत त्या मुलाला प्लॅटफॉर्मवर खेचलं आणि मुलाचा जीव मुलगा आणि लोकलमध्ये अगदी काही फुटांचं अंतर राहीलं होतं. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाची आई रेल्वे रुळ ओलांडून फलाट क्रंमाक 3 वर पोहोचली. मात्र, मुलगा फलाट क्रमांक 2 वरच राहिला. त्यामुळं आईला शोधत हा मुलगा 2 नंबरच्या फलाटावरुन 3 वर जाण्यासाठी रुळ ओलंडण्याचा प्रयत्नात होता. मात्र प्रवाशानं जीवावर उदार होवून दाखवलेल्या धैर्यानं या मुलाचे प्राण वाचले..

१९- शनीशिंगणापूर प्रकरणात भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या फिर्यादीवरुन चार सुरक्षारक्षकांविरुध्द अदाखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे, धक्काबुक्की केल्याची तक्रार महिलांनी केली 

२०- सांगली : पुणे- बंगळुरू महामार्गावर बसला अपघात, ३ ठार , ७ जखमी 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- रोलबॉल विश्वचषकात भारताचा डंका, अंतिम फेरीत इराणचा धुव्वा 
                     तिसऱ्या रोलबॉल विश्वचषकावर भारतानं आपलं नाव कोरलं आहे. या स्पर्धेत पुरुष गटाच्या अंतिम फेरीत भारतानं इराणचा 6-3 असा धुव्वा उडवला आणि सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. या सामन्यावर भारतानं सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं. भारतासाठी उत्कर्ष तरटे आणि आदित्य गणेशवाडे या दोघांनी प्रत्येकी दोन गोल केले. तर चेतन भांडवलकर आणि मिहीर सानेनं प्रत्येकी एक गोल डागला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. पुण्याच्या बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडली. त्यात पुरुष विभागात जगभरातले 33 संघ सहभागी झाले होते. पुण्याचे क्रीडाप्रशिक्षक राजू दाभाडे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा खेळ वेगानं जगभर पसरत असून, त्यात भारतानं आपली मक्तेदारी कायम राखली आहे.

~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२२- स्नानासाठी गेलेल्या युवकाचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू 

२३- आ. हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सौ. राजश्री पाटील यांच्या हस्ते धान्य वाटप 

२४- अंतरजातीय विवाह करणाऱ्या पतीचा पत्नीसाठी २५ डिसेंबर पासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा 

२५- नांदेड जिल्हा सहकारी बंकेतेर्फे उमरीत झालेल्या ठेवी वश मेळाव्यात २ कोटी ११ लाख रुपयांच्या ठेवी 

२६- फुलवळ येथील पाणी-प्रश्न गंभीर; आठ दिवसाआड पाणी पुरवठा 
~~~~~~~~~~~~~~~
मुखेड येथे अवैध वाहतुकीच्या विरोधात आज रास्ता रोको
http://goo.gl/zz3Xjr
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
मन्मथ खंकरे, गिरीश कोंडावार, लाबाजी गोनेकर, पप्पू देसाई, संदीप भालेराव, रामचंद्र जाधव, योगेश लाठ्कर, निलेश कौलकर, सुनील करवंदे, हुसैन अख्तर, श्यामल, राजेश भराडिया, युवराज शिंदे, अविनाश जोंधळे, मंगेश उनवणे, श्याम जोशी, सुशांत गडीकर, मोहन सचिन मेष्कार, अमोल पालेकर, रवी भागवत
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
सगळ्यात मोठी चुक म्हणजे आपल्या हातुन काहीतरी चुक होईल याची भिती बाळगणे होय.
[दिगांबर नरवाडे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्ह वाचकांच्या मते .....
प्रश्न; सध्याच्या घडामोडी पाहता पाकिस्तान दाउदला भारताच्या ताब्यात देईल का?
A] होय..देण्याची शक्यता आहे - 23%
B] नाही..कधीच देणार नाही- 57%
C] सांगता येत नाही - 19%
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
*  *  *  *  *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी, [नोव्हेंबरमधील नोंदीनुसार]
डिसेंबरमध्ये अड्ड झालेल्या सर्व ग्रुप स्वागत
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
 १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: