मुखेड :- रियाज शेख
माणसांना माणुसपण नाकरणा-या, महिलांवर अन्याय करणा-या, या देशातील मूलनिवासी बहुजन समाजाला बंदिस्त ठेवुन राज्य चालवणा-या त्या मनुच्या मनुस्मृतीची होळी करुन महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुभाव यावर आधारीत संविधान दिले व तमाम बहुजन समाजाचा उद्धार केला आहे, असे प्रतिपादन पुरोगामी कार्यकर्ते काँ.बालाजी लंगेवाड यांनी मनुस्मृती दहन जनजागरण व संविधान गौरव रँली कार्यक्रमात केले.
यावेळी काँ.बालाजी घोडके, माजी नगरसेवक राहुल लोहबंदे, अनिल सिरसे, गौस अली सलगरकर ,संतोष पाटील इंगोले, बालाजी कडमपल्ले, अँड संजय भारदे, अतुल बनसोडे, अंकुश माचेवाड, धोंडिबा नारनाळीकर, छोटु पाटील, सचिन पाटील, पंकज गायकवाड़, अँड मिलिंद कांबळे, नवनाथ भद्रे, आदी उपस्थित होते.
अनिष्ट रुढी परंपरा व बंधनातुन मुक्त करण्यासाठी डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे दहन केले होते. याचे आजही समाजामध्ये प्रबोधन झाले नाही. याची जनजागृती करण्यासाठी मुखेड तालुक्यातील सर्व पुरोगामी संघटनाच्या वतीने 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिनानिमित्य जनजागरण रँलीचे आयोजन करण्यात आले होते.
मानवी उन्नती साठी भारतीय संविधान एकमेव पर्याय असतानाही 21 व्या शतकात धर्ममार्तंडाच्या माध्यमातुन मनुस्मृती विचार डोक वर काढत आहे.व अश्या लोकांना विषमतावादी कायद्याचा हेतुत विसर पडल्यास पुन्हा तो माहित होणे ही काळाची गरज आहे. म्हणुन मनुस्मृती दिनानिमित्य संविधानाचे गौरव करण्यात आले.
यारँली मध्ये विविध जातीधर्माचे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने शामील होवुन 'मनुस्मृति मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद ' या घोषणांनी सारे मुखेड शहर दुमदुमले. रँली शहरातील मुख्यमार्गाने काढुन डाँ आंबेडकर स्मारक जवळ समारोप करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
--
धन्यवाद ............
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी आपल्या ग्रुप मध्ये 8975495656 हा नंबर अड्ड करा 
No comments:
Post a Comment