नमस्कार लाईव्ह ३०-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
1- लश्कर-ए-तोएबाच्या हिट लिस्टवर मोदी, संसद, लष्कर मुख्यालय
२०१६च्या सुरुवातीला मोठा धमाका करण्याचा प्लॅन लश्कर-ए-तोएबाने आखला आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसद आणि लष्कराचे मुख्यालय टार्गेट ठेवण्यात आलेय. देशात 'लश्कर-ए-तोएबा’ या दहशतवादी संघटनेकडून घातपात घडविण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसद भवन आणि लष्कराचे मुख्यालय दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. सीमेपलीकडून १५ ते २० दहशतवादी भारतात घुसण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली.
केंद्र सरकारने नववर्षानिमित्त करण्यात येणाऱ्या सेलिब्रेशनवेळी मुख्यत्वे पर्यटनस्थळांवर हल्ले होण्याची शक्यता वर्तविली होती. तसेच राज्यांना सतर्कतेच्या सूचना देखील दिल्या आहेत. महत्त्वाची ठिकाणे, धार्मिक स्थळे, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेश केंद्राने दिलेत.
ऑस्ट्रेलिया सोबत नागरी अणुऊर्जा सहकार्य सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
2- खडसे यांनी शिवसेना आमदाराविरोधात ५ कोटींचा ठोकला दावा
जळगाव : कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध ५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केलाय. जळगाव दिवाणी न्यायालयात खडसे यांनी हा खटला दाखल केला. खडसे यावेळी स्वतः हजर होते. आमदार गुलाबराव पाटील यांनी कोणतेही पुरावे नसतांना पॉलीहाऊसच अनुदान एकाच दिवशी लाटले. तसेच मुक्ताईनगर सूत गिरणीसाठी १६१ कोटी रुपये अनुदान घेतल्याचा आरोप केला होता.
3- दिल्ली; ISIच्या संपर्कात वायुसेनेचा जवान, ब्रिटनच्या दामिनीने फसविले
पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेला माहिती देणारा भारतीय वायुसेनेचा जवान रंजीत यांने मोठा खुलासा केलाय. रणजितने सांगितले, दामिनीला गुप्त माहिती देण्यासाठी ३० हजार रुपये मला मिळाले होते. याबदल्यात रणजितने काही महत्वाची गुप्त माहिती दिली. याप्रकरणी या जवानाला बडतर्फ करण्यात आलेय. या प्रकरणात रणजित याला दामिनी मॅकनॉट या ब्रिटनमधील माध्यम अधिकारी असलेल्या महिलेच्या बनावट नावाने काम करणाऱ्यांने फसवले, हवाई दलाची माहिती आमच्या नियतकालिकाला हवी आहे असे सांगून त्याच्याकडे माहिती मागण्यात आली. तसेच या बदल्यात रणजितला ३० हजार रुपये दिल्याचे पुढे आलेय.
4- देशातील 3.72 लाख भिकाऱ्यांपैकी 75 हजार 12 वी पास
देशभरात कुठेही जा, एक ना एक भिकारी दिसतोच दिसतो. देशभरातील भिकाऱ्यांची संख्या नुकतीच जाहीर झाली आहे. 2011 च्या गणनेनुसार देशात तब्बल 3 लाख 72 हजार भिकारी आहेत. महत्त्वाचं म्हणजे यातील बहुसंख्य हे शिकले-सवरलेले आहेत. देशातील 3.72 लाख भिकाऱ्यांपैकी 21 टक्के भिकारी बारावीपर्यंत शिकलेले आहेत. म्हणजेच हा आकडा 75 हजारांच्या पुढे जातो. इतकंच नाही तर यातील 3 हजार जणांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाचा डिप्लोमाही पूर्ण केला आहे. तसंच अनेकजण पदवीधर आणि पदवीत्तर शिकलेले आहेत. शिक्षण घेऊनही चांगल्या नोकऱ्या न मिळाल्यानेच भीक मागण्याची वेळ आल्याचं, अनेकांनी सांगितलं
5- नवी दिल्ली: सम-विषम क्रमांकाचा नियम मोडणा-या चालकांना फूल द्या - मुख्यमंत्री केजरीवाल यांचा कार्यकर्त्यांना गांधीगिरीचा सल्ला
6- आयएएस अधिकारी संजय प्रताप सिंह यांच्याविरोधात अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल
7- दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल असलेले जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांना आयसीयूमध्ये दाखल
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
8- टेप लीक: निवडणुकीत सौदेबाजी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री अडचणीत
छत्तीसगडमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत मोठ्या प्रमाणात सौदेबाजी झाल्याचं समोर येत आहे. मुख्यमंत्री रमण सिंह यांचे नातेवाईक आणि माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांच्यात ‘सौदेबाजी’ झाल्याची कथित टेप सार्वजनिक करण्यात आली आहे. इंग्रजी वृत्तपत्र ‘इंडियन एक्स्प्रेस’ने यासंदर्भातली एक ऑडीयो क्लिप जाहीर केली आहे. ज्यात काँग्रेस उमेदवाराला माघार घेण्यासाठी भाग पाडल्याचा उल्लेख असल्याचं सांगण्यात येत आहे. या क्लिपमध्ये मुख्यमंत्री रमण सिंह, त्यांचे जावई पुनीत गुप्ता, माजी मुख्यमंत्री अजित जोगी आणि त्यांचा मुलगा अमित जोगी यांचाही उल्लेख 13 सप्टेंबर 2014 रोजी अंतागढ विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. यावेली 13 उमेदवार रिंगणात होते. मात्र ऐन निवडणूक तोंडावर असतानाच, काँग्रेसचे उमेदवार मंतूराम पवार यांनी माघार घेतली होती. इतकंच नाही तर यानंतर एक-एक करत 10 उमेदवारांनीही आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे ज्यामुळे या जागेवर भाजपच्या भोजराज नाग यांचा विजय सोपा झाला. नाग हे 50 हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले. याच जागेसाठी मोठ्या प्रमाणात सौदेबाजी झाल्याचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचं कळतंय. त्यामुळे या प्रकरणात अजित जोगी आणि रमण सिंह यांच्यासमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
9- किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना दिलासा, डायलिसिसची १३ औषधे करमुक्त करण्याचा राज्यसरकारचा निर्णय.
10- जम्मू-काश्मीरमधील किश्तवर येथे लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा लपण्याचा तळ केला उध्वस्त
11- पानसरे हत्याप्रकरण - खटला जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला; पुढील सुनावणी १३ जानेवारीला
12- बीड; लेकीच्या लग्नाच्या चिंतेने आत्महत्या, गावकऱ्यांकडून थाटात लग्न
‘देणाऱ्याचे हात हजारो..’ याचा प्रत्यय बीड जिल्ह्यातील परळीतल्या तडोळी या गावात आला. मुलीच्या लग्नाला पैसे नसल्याने शेतकऱ्यानं आत्महत्या केल्यानंतर गावकऱ्यांनी या मुलीचं मोठ्या थाटामाटात लग्न लावलं. अवधून सातभाई यांनी मुलीच्या लग्नाच्या चिंतेमुळं काही दिवसांपूर्वी आत्महत्येचं पाऊल उचललं. दहा दिवसांवर लग्न आल्याने घरावर आभाळ कोसळलं. यामुळे बीडच नाही तर सगळा महाराष्ट्र सुन्न झाला. त्यानंतर गावकरी एकत्र आले आणि अवधूत यांची शेवटची इच्छा पूर्ण केली. परळीतल्या पत्रकारांनी सोशल नेटवर्किंग साईटवर मदतीची विनंती केली आणि बापाविना पोरींचे लग्न थाटात पार पडले. प्रत्येकाने काही न् काही मदत केली. पुण्याच्या बाळासाहेब कुंजीर यांनी 40 साड्या, दोन्ही नवरींना पैंजण आणि 22 हजार रोख दिले. देगलूरच्या सराफा संघटनेचे अध्यक्ष रामस्वामी चणोजी यांनी सोन्याचे दोन गंठण दिले. पंकजा मुंडे यांनी 50 हजार तर धनंजय मुंडे यांनी 25 हजारांची मदत केली. परळीतल्या कापड व्यापाऱ्यांनी वधू-वरांना कपडयाचा आहेर दिला. सातभाई परिवाराला अवधूत यांची कमतरता कायमच जाणवेल, मात्र समाजानं शेतकऱ्यासाठी घेतलेला हा पुढाकार नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.
13- चिटफंड घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेले समृद्ध जीवनचे महेश मोतेवार यांच्या अडचणीत वाढ, मोतेवार यांचा ताबा मिळावा यासाठी ओदिशा पोलिस उमरगा येथे दाखल
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
14- चेन्नई; पुतळा जाळताना आंदोलकांच्या लुंग्या पेटल्या
आंदोलनं करताना होणाऱ्या अपघातातून कार्यकर्ते काही केल्या शिकण्याचं नाव घेत नाहीत. कारण प्रतिकात्मक पुतळा जाळण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही आंदोलकांची लुंगी जळाली आणि यामध्ये त्यांचे पायही भाजले. डीएमडीकेचे नेते विजयकांत यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या पोस्टरविरोधात वक्तव्य केल्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याचा निषेध म्हणून विल्लूपुरममध्ये जयललिता यांच्या कार्यकर्त्यांनी विजयकांत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र आग भडकली आणि तिथे असलेल्या अनेक आंदोलकांच्या लुंगी जळल्या. शिवाय पायही होरपळून निघाले…
15- शिर्डीजवळ तरुण-तरुणीचे जळालेल्या अवस्थेत मृतदेह
शिर्डी जवळील संगमनेर तालुक्यात युवक आणि युवतीचे जळालेले अवस्थेतील मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बोटा गावाजवळ हे मृतदेह सापडले आहेत. या तरुण-तरुणीने आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पण युवक आणि युवतीचा जळालेल्या अवस्थेतला मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
16- लखनऊ; धावत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये प्रसुती, ट्रॅकवर पडूनही बाळ सुखरुप
‘देव तारी त्याला कोण मारी’ याचा प्रत्यय आज उत्तर प्रदेशच्या भोजीपुरा रेल्वे स्टेशनवर आला. धावत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये महिलेने बाळाला जन्म दिला. मात्र नवजात बाळ टॉयलेटच्या पाईपलाईनमधून थेट ट्रॅकवर आलं. यानंतर ट्रेन थांबवण्यात आली. मात्र दैवं बलवत्तर म्हणून बाळ अगदी सुखरुप होतं. यानंतर आई आणि बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांचीही प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मुलीला जन्म देणारी पुष्पा देवी नावाची महिला नेपाळच्या कंचनपूर जिल्ह्यातली आहे. बरेलीच्या सीतापूर रुग्णालयात ती डोळ्यांवर उपचार करण्यासाठी आली होती. टनकपूर-बरेली पॅसेंजर ट्रेनमधून ती प्रवास करत होती. मात्र याचवेळी तिला प्रसुती वेदना सुरु झाल्याने ती टॉयलेटमध्ये गेली. परंतु तिने तिथेच मुलीला जन्म दिला. त्यावेळी बाळ टॉयलेटमधून खाली पडलं आणि महिलेचा आरडाओरडा ऐकून इतर प्रवाशांनी चैन ओढून ट्रेन थांबवली.
17- धुळे - बनावट दारुप्रकरणी कारवाई करताना अॅसिड पडून ४ पोलिस जखमी
18- भुवनेश्वरच्या शासकीय वसाहतीमध्ये सिलिंडरचा स्फोट, १ जण ठार तर तीन जखमी
19- नाशिक : मार्केट यार्डमधील गाळ्यांना आग, अग्निशमन दलाच्या ४ ते ५ गाड्या घटनास्थळी दाखल.
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
20- अॅश म्हणते, सॉरी.. नो किसींग सीन
संजय गुप्ताच्या 'जजबा'मधून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणा-या ऐश्वर्या रायने रणबीर कपूरसोबत लीपलॉक म्हणजे चुंबन दुश्याचा सीन करायला नकार दिला आहे. करण जोहरच्या आगामी 'ए दिल है मुश्किल'मध्ये ऐश्वर्या आणि रणबीरची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात रणबीर-ऐश्वर्याचा किसींग सीन कथानकाची गरज होती. अभिषेक बच्चन बरोबर विवाह झाल्यानंतर ऐश्वर्याने हृतिक रोशनबरोबर किसींग सीन दिला होता. आता मात्र तिने अशा दृश्याला नकार दिला आहे. ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून आहे. त्यामुळे करणही या दृश्यासाठी ऐश्वर्याच्या मागे लागला नाही. करणने आता हा सीन ऐश्वर्याचा प्रत्यक्ष सहभाग न घेता वेगळया पद्धतीने चित्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
21- बाजीराव मस्तानीने मारली बाजी, २०० कोटींचा टप्पा पार
संजय लीला भन्साळींच्या बाजीराव मस्तानीने वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये दुस-या आठवड्यात २०० कोटी रुपयांचा पल्ला पार केल्याचे वृत्त असून शाहरूख काजोल जोडी असलेल्या दिलवालेच्या पुढे बाजी मारल्याचे दिसत आहे. भारतामध्ये बॉक्स ऑफिसच्या नेट कलेक्शनमध्ये बाजीराव मस्तानीने १२० कोटींचा गल्ला जमवला असून दिलवालेने १२३ कोटींचा गल्ला जमवला आहे. मात्र, दिलवालेचा गल्ला दिवसेंदिवस कमी होत असताना बाजीराव मस्तानीची मागणी मात्र कायम असल्याचे बॉलीवूड निरीक्षकांचे म्हणणे आहे. १८ डिसेंबर रोजी दोन्ही सिनेमे रिलीज झाले, आणि पहिल्या काही दिवसांमध्ये दिलवालेने चांगलीच आघाडी घेतल्याचे दिसत होते. मात्र, टिपिकल मसाला चित्रपट असलेल्या दिलवालेकडे असलेला प्रेक्षकांचा ओढा घसरल्याचे दिसत आहे, तर योद्धा बाजीरावाच्या प्रेमकथेला मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
मुखेड येथील उपजिल्हा रूग्णालय येथे आॅन लाईन अपंगाचे प्रमाण वाटप
http://goo.gl/Wqmo2N
~~~~~~~~~~~~~~~
मुखेड मध्ये असंख्य युवा कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
http://goo.gl/1tlvRL
~~~~~~~~~~~~~~~
नांदेड जिल्हयातील सर्व गावांमध्ये स्वच्छता संकल्प दिवस साजरा करण्यात येणार - उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एल. रामोड
http://goo.gl/sIFXOP
~~~~~~~~~~~~~~~
दरोड्याच्या तयारीत असलेल्या अट्टल गुन्हेगारांना अटक
http://goo.gl/ClC8kQ
~~~~~~~~~~~~~~~
विधानपरिषद निवडणुकीचे सर्व निकालासाठी क्लिक करा लिंक
http://goo.gl/zZ9rvT
~~~~~~~~~~~~~~~
2 जानेवारी रोजी नांदेडमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
http://goo.gl/f0lmV2
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे आपण स्वत: विषयी काहीच बोलू नका, उत्तम कार्य करत रहा तेच आपला परिचय देतील
[डॉ. वर्षा चौरे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हवर नोंदवा आपले मत, खालील लिंकला क्लिक करून--
नरेंद्र मोदींचा अचानक पाकिस्तान दौरा भारतासाठी फायदेशीर आहे का?
http://goo.gl/wMLuSZ
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
सिटी मॅक्स, डिजिटल कलर लॅब
शहाजी मार्केट, शिवाजी नगर, नांदेड
फोन- 02462 - 230786
मो. - 9422185282
सर्व प्रकारची अल्बम प्रिंटींग, कॉफी मग प्रिंटींग, अल्बम डिझाईन, डिजिटल कॅमेरा, व्हिडीओ कॅमेरा, मेमरी कार्ड, आय कार्ड झेरोक्स, लॅमिनेषण, टी-शर्ट प्रिंटींग
http://goo.gl/OcvcIs
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
नोकरी पेक्षा उद्योग बरा स्वतःचा व्यवसाय सुरु करा
स्वयंचलित चहा, कॉफी,मसाले दूध बनविण्याचे मशिन बसवा व हजारो कमवा
50% पर्यंत नफा
गॅस,चूल दूधाची आवश्यकता नाही
1 मिनिटात 5 कप तयार
बटन दाबा चहा, कॉफी,मसाले दूध मिळवा
संपर्क
8975307470,
9890098265
https://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_124.html
*****************
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment