मुंबई : नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या सर्व सात जागांचे निकाल हाती आले आहेत. सातपैकी 3 जागी काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर शिवसेना 2, राष्ट्रवादी आणि भाजपला प्रत्येकी एका जागी यश मिळालं.
भाई जगतापांचा निसटता विजय
मुंबईतील विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी निवडणूक झाली. मुंबईतून शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार प्रसाद लाड यांचा अवघ्या 2 मतांनी निसटता पराभव झाला आहे.
शिवसेनेचे रामदास कदम तब्बल 85 मतांनी विजयी झाले आहेत. विधानपरिषदेवरील विद्यमान आमदार असलेल्या काँग्रेसच्या भाई जगताप यांना 58 मतं मिळाली. तर जगताप यांच्यापेक्षा केवळ 2 मतं कमी म्हणजे 56 मतं लाड यांना मिळाली. त्यामुळे भाई जगताप यांना निसटता विजय झाला.
सतेज पाटील जिंकले, महाडिक हरले
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूर विधानपरिषद मतदारसंघात काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी बाजी मारली आहे. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी काँग्रेसचेच बंडखोर उमेदवार महादेवराव महाडिक यांचा 63 मतांनी पराभव केला.
अमरीश पटेलांचा एकहाती विजय
धुळे- नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अमरीश पटेल यांनी भाजपच्या शशीकांत वाणी यांचा एकहाती पराभव केला. पटेल यांना 383 पैकी तब्बल 353 मतं मिळाली, तर शशीकांत वाणींच्या पदरात अवघी 31 मतं पडली.
परिचाराकांची बाजी
सुरुवातीपासूनच चुरस निर्माण झालेल्या सोलापूर मतदारसंघात भाजप पुरस्कृत प्रशांत परिचारक यांनी बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे यांचा 141 मतांनी पराभव केला.
अकोल्यात भगवा
अकोल्यामध्ये शिवसेनेने भगवा फडकवला आहे. सेनेच्या गोपीकिशन बाजोरिया यांनी तब्बल 513 मतांस मोठा विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादीच्या रवींद्र सपकाळ यांचा पराभव केला. सपकाळ यांना 238 मतं मिळाली.
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीची बाजी
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये चुरस होती. मात्र राष्ट्रवादीच्या अरुण जगताप यांनी 244 मतांसह विजय खेचून आणला. त्यांनी शिवसेनेच्या शशीकांत गाडे यांचा पराभव केला. त्यांना 177 मतं मिळाली.
विधानपरिषद विजयी उमेदवार
मुंबई –
रामदास कदम 86 (शिवसेना) – विजयी
2) भाई जगताप 64 (काँग्रेस)- विजयी
प्रसाद लाड 55 (राष्ट्रवादी बंडखोर) – पराभूत
——————————-
3) सोलापूर-
प्रशांत परिचारक(भाजप पुरस्कृत) – 261 – विजयी
दीपक साळुंखे (राष्ट्रवादी) -120
प्रशांत परिचारक 141 मतांनी विजयी
—————————
4) अहमदनगर-
अरुण जगताप (राष्ट्रवादी) – 244 मते- विजयी
शशीकांत गाडे(शिवसेना) -177 मते
जयंत ससाने याना 1
अवैध 7 मते
—————————–
5) अकोला
गोपीकिशनचंद बाजोरिया (शिवसेना) – 513 मतं – विजयी
रविंद्र सपकाळ (राष्ट्रवादी) यांना 238 मतं (राष्ट्रवादी)
————————–
6) धुळे- नंदुरबार-
अमरीश पटेल (काँग्रेस) – 352 मतं विजयी
शशीकांत वाणी (भाजप) – 31 मतं.
———————
7) कोल्हापूर
सतेज पाटील (काँग्रेस) 220 – विजयी
महादेवराव महाडिक (अपक्ष) 157 – पराभूत

No comments:
Post a Comment