नमस्कार लाईव्ह २५-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- अफगाणिस्तानातील संसद इमारतीचं मोदींच्या हस्ते उद्घाटन
2007 मध्ये मैत्रीच्या भावनेतून भारत सरकारने अफगाणिस्तानात संसदेची उभारणी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी साडेचार कोटी डॉलरचा खर्च अपेक्षित होता, मात्र 9 कोटी डॉलर म्हणजे अंदाजे 600 कोटी रुपये खर्चून उभी राहिलेली ही संसदेची इमारत मुघल आणि आधुनिक स्थापत्य कलेवर आधारित आहे. ही इमारत नोव्हेंबर 2011 मध्ये बांधून पूर्ण होणार होती, मात्र गेल्या 4 वर्षांत 4 डेडलाईन्स हुकल्या. या इमारतीतील सेंट्रल हॉल ‘अटल ब्लॉक’ म्हणजे माजी पंतप्रधान अटल बिहारी यांच्या नावाने ओळखला जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर मोदी संसदेला संबोधित करतील. त्यानंतर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अब्दुल घनी आणि आणि मोदींमध्ये द्विपक्षीय चर्चाही होणार आहे.
२- छुप्या कॅमेऱ्यानं टॉयलेट, शॉवर रुममध्ये बनवले अश्लील व्हिडिओ; भारतीयाला लंडनमध्ये अटक
भारताला मान खाली घालायला लावणाऱ्या या विकृत व्यक्तीचं नाव जॉर्ज थॉमस आहे. तो ३८ वर्षांचा आहे. जॉर्ज 'अर्नेस्ट अॅन्ड यंग' या कंपनीत काम करत होता. आपल्या कामाच्या ठिकाणी त्यानं शॉवर, टॉयलेट आणि इतर ठिकाणी छुपे कॅमेरे लावल्याचं उघड झालंय. ऑफिसमध्ये एका महिला सहकाऱ्याला शॉवर रुममध्ये छुप्या पद्धतीनं लावलेला कॅमेरा आढळल्यानंतर त्याचं हे बिंग फुटलं. त्यानंतर पोलिसांनी तपासणी घेतल्यानंतर जॉर्जकडे आढळलेल्या मेमरी कार्डमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ आढळले. थॉमस हा विवाहीत असून त्याला एक अपत्यही आहे. त्याच्यावर ३,५०० हून अधिक अश्लील व्हिडिओ छुप्या पद्धतीनं चित्रित केल्याचा आरोप आहे. गेल्या सहा वर्षांपासून त्याचा हा गोरखधंदा सुरू होता
३- बगदाद; ISIS मध्ये सहभागी झाली नाही तर किडनॅप करू
बगदाद : आयएसआयएसचा दहशतवादी बगदादीनं 'मिस इराक' या स्पर्धेतील विजेच्या तरुणीला धमकी दिलीय. दहशतवादी संघटनेत सामील झाली नाही तर उचलून नेऊ, असं तिला धमकावण्यात आलंय. दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'चा म्होरक्या बगदादी इराकमध्ये झालेल्या ब्युटी कॉन्टेन्स्टमुळे चवताळलाय. बगदादीच्या नाकावर टिच्चून या स्पर्धेत 'मिस इराक' निवडण्यात आली. या स्पर्धेत विजेती ठरली ती शाएमा कासिम अब्देल रहमान..उल्लेखनीय म्हणजे, १९७२ नंतर इराकमध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या ग्लॅमर गर्ल शाएमाला आता बगदादीकडून धमक्या येत आहेत. आयएसआयएसमध्ये सहभागी झाली नाही तर किडनॅप केलं जाईल, अशी धमकी बगदादीनं शाएमाला दिलीय.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- पंतप्रधान नरेंद्र मोदी लाहोरमध्ये
लाहोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वायुसेनेच्या खास विमानाने लाहोरमध्ये पोहोचले आहेत. लाहोर विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ स्वतः हजर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पाकिस्तानात जाणार आहे. अफगाणिस्तान दौऱ्यावरुन आटोपून मोदी पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांची भेट घेतली. मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा आज वाढदिवस आहे.
मोदींनी ट्विटरवरुन शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. शिवाय शरीफ यांच्या नातीचं आज लग्नही आहे. मोदी सुमारे दोन तास लाहोरमध्ये थांबण्याची शक्यता आहे.
५- पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात जाऊन नवाज यांची भेट घेणार... रशिया अफगाणिस्तान दौरा संपवून अचानक पाकिस्तानला जाण्याचा निर्णय
६- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला धावती भेट देण्याचा जो निर्णय घेतला त्यातून त्यांची हुशारी दिसून येते आणि पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याची इच्छाही दिसते - हामिद हरुन, वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकार
७- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धावत्या पाकिस्तान दौ-याचे ओमर अब्दुल्ला यांनी स्वागत केले.
८- ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांचं निधन, मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास
60 आणि 70 च्या दशकातील ज्येष्ठ अभिनेत्री साधना शिवदासानी यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 74 वर्षांच्या मेरा साया, वो कौन थी, हम दोनो, एक मुसाफिर एक हसिना, वक्त, राजकुमार यांसारख्या सुमारे 35 चित्रपटांत त्यांनी अभिनय केला आहे. वक्त आणि वो कौन थी या सिनेमांसाठी साधना यांचं फिल्मफेअरसाठी नामांकन झालं होतं. साधना यांचा जन्म 2 सप्टेंबर 1941 कराचीमध्ये झाला होता. साधना यांनी चित्रपट दिग्दर्शक आर के नय्यर यांच्याशी लग्न केलं. मात्र साधना यांना अपत्य नाही. साधना या फॅशन आयकॉन म्हटलं जायचं. साधना यांनीच ‘फ्रिन्ज’ हेअरस्टाईलची ओळख करुन दिली. त्यांचा ‘साधना कट’ अतिशय प्रसिद्ध आहे. इतकंच नाही तर टाईट ‘चुडीदार-कुर्ता’ याचा ट्रेण्ड भारतात आणण्याचं श्रेयही साधना यांनाच जातं.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाहोर भेटीविरोधात दिल्लीत युवक काँग्रेसची निदर्शने
१०- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धावत्या पाकिस्तान दौ-यावर शिवसेनेची टिका, मोदी दाऊद इब्राहिमला सोबत घेऊन आले तर, दौरा यशस्वी झाला म्हणता येईल - शिवसेना
११- अंबरनाथमध्ये शिवसेना नगरसेवक रमेश गुंजाळ यांची हत्या
कल्याण : चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवसेना नगरसेवकाचा मृत्यू झाला आहे. अंबरनाथचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अंबरनाथ नगरपालिकेतील शिवसेना नगरसेवक रमेश गुंजाळ सकाळी घरातून बाहेर पडत असताना त्यांच्यावर काही जणांनी चाकूहल्ला केला होता. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गुंजाळ यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथे उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान गुंजाळ यांच्या हल्लेखोरांचा पोलिस शोध घेत असून हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
१२- हैदराबाद; हे भिकारी एटीएम कार्ड स्वाइप मशीनद्वारे मागतात भीक
हैदराबादमध्ये असा भिकारी पाहायला मिळाला. एक महिला कार चालवत असताना सिग्नल लागल्यावर एक भिकारी त्या महिलेजवळ आला आणि भीक मागू लागला. मात्र महिलेने सुट्टे पैसे नसल्याचे सांगत भीक देण्यास नकार दिला. तेव्हा कार्ड स्वाईप करुनही आपण भीक घेत असल्याचे त्या भिकाऱ्याने सांगितले. तसेच त्याने त्याच्याजवळ असलेली मशीनही दाखवली. हे पाहून मात्र लोकांना काही हसू आवरले नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी
रायगड : सलगच्या चार सुट्ट्यांमुळे अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांची गर्दी झाली आहे. खालापूर टोलनाक्यावर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.
ईद, ख्रिसमस आणि शनिवार-रविवार या सुट्ट्यांमुळे अनेकांनी पर्यटनाचा बेत आखला. पण फिरण्याचा बाहेर पडलेले पर्यटक मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर अडकले आहेत.खालापूर टोलनाका ते अमृतांजन पूल या घाट सेक्शन दरम्यान ही वाहतूक कोंडी झाली आहे. तर लोणावळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर तब्बल 15 किमी अंतरापर्यंत वाहनांच्या तीन पदरी रांगा लागल्या आहेत. हे अंतर पार करण्यासाठी तब्बल अडीच ते तीन तास लागत आहेत.
१४- मुंबई; विजेत्यांना बोकड, उपविजेत्यांना दहा गावठी कोंबड्या
एखाद्या स्पर्धेत बक्षिस म्हणून रोख रक्कम, गाडी, ट्रॉफी हे सगळं दिल्याचं तुम्ही पाहिलं असलेच. पण कुठल्या स्पर्धेत बक्षिस म्हणून बोकड आणि कोंबड्या दिल्याचं पाहिलंय? मुंबईच्या प्रभादेवीत कबड्डीची अशीच एक स्पर्धा पार पडली, ज्यात विजेत्यांना इनाम म्हणून चक्क बोकड देण्यात आला. वरळीच्या आगरी सेवा संघाच्या कबड्डी स्पर्धेत शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या मुलांनी विजेतेपदावर नाव कोरलं आणि त्यांना इनाम म्हणून चक्क पंचवीस किलोचा बोकड देण्यात आला. आगरी सेवा संघाच्या या कबड्डी स्पर्धेची गंमत म्हणजे फायनलच्या मैदानात शिवप्रेरणाकडून पराभूत झाल्यानंतर जय ब्राम्हणदेवची मुलं हिरमुसणं स्वाभाविक होतं, पण त्यांची निराशाही दहा गावठी कोंबड्याच्या इनामाने दूर केली होती.
१५- चार बाळांचं आंदण मिळालेल्या दैवशालाच्या मदतीला माजी आमदार सरसावले
लातूर : पोटी चार बाळांचं आंदण मिळालेल्या लातूरच्या दैवशाला या महिलेच्या मदतीला उदगीरचे माजी आमदार चंद्रशेखर भोसले सरसावले आहेत. दैवशाला यांची प्रसुती सुखरुप व्हावी यासाठी त्यांच्यावर उपचाराचा संपूर्ण खर्च करण्याची तयारी भोसले यांनी दाखवली आहे. उदगीरमधल्या लाईफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दैवशाला यांच्यावर उपचार करण्यात येतील. त्यात औषध, उपचार, तेथील राहणं आणि इतर खर्चही आम्हीच करु. दैवशाला आणि त्यांचे पती निवृत्ती यांची तयारी असल्यास आजपासूनच ही जबाबदारी घेण्यास तयार असल्याचं चंद्रशेखर भोसले म्हणाले.
१६- व्हॉट्सअॅप तरुणीच्या जीवावर बेतलं, चौघे पोलिसांच्या ताब्यात
शिर्डी: व्हॉट्सअॅप संपूर्ण जगाशी मैत्री करण्याची संधी उपलब्ध करून देणारं मोबाईल अॅप्लिकेशन, मात्र या व्हॉट्सअॅपचा दुरूपयोग एखाद्याच्या जीवावर देखील बेतू शकतो. शिर्डीजवळच्या गावात राहणारी ती अल्पवयीन मुलगी देखील व्हॉट्स अॅपच्या दुरूपयोगाची बळी ठरली आहे. कोपरगावमधील करंजी परिसरात राहणाऱ्या तारानं या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. व्हॉट्सअपवर व्हायरल झालेले तिचे फोटो हे मृत्यूसाठी कारणीभूत ठरले. गावातील चार तरुणांनी ताराचे चोरून अश्लील फोटो काढले, असा आहेर कुटुंबीयांचा आरोप आहे. तारा घरातून दोन दिवसांपासून बेपत्ता होती. ताराला त्रास देणाऱ्या तरुणांनी तिला पळवून नेल्याचा संशय तिच्या कुटुंबियांना होता. त्यानंतर कुटुंबीयांना तिचा मृतदेह आढळून आला. तारानं आत्महत्या केली की तिचा घातपात झाला याचा उलगडा करण्याचं आव्हानं पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. तूर्तास पोलिसांनी चार संशयास्पद तरुणांना ताब्यात घेतलं आहे.
१७- जम्मू येथे गाव सुरक्षा समितीच्या विरोधात निदर्शने करणारा फुटीरतवादी नेता यासिन मलिकला पोलिसांनी ताब्यात घेतले
१८- छत्तीसगडमधील जगदलपूर येथे काल रात्री पोलिसांशी झालेल्या चकमकीत १ नक्षलवादी झाला ठार.
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- मिस कोलंबियाला पॉर्न इंडस्ट्रीकडून कोट्यवधींची ऑफर
यंदाच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली ती मिस कोलंबिया. दोन मिनिटांसाठी विजेती ठरलेल्या मिस कोलंबियाला विजेत्या मिस फिलीपिन्सपेक्षाही जास्त प्रसिद्धी मिळाली. याच मिस कोलंबिया ग्वातरेजला ‘त्या’ लाजिरवाण्या घटनेनंतर थेट पॉर्न इंडस्ट्रीकडून ऑफर येत आहेत.
सूत्रसंचालकाच्या हलगर्जीमुळे 2 मिनिटांसाठी डोक्यावर चढलेला मिस यूनिव्हर्सचा मुकूट मिस कोलंबियाला उतरवावा लागला. मात्र अल्पकाळासाठी प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान झालेल्या मिस कोलंबिया अरियादना ग्वातरेजला तिथून पायउतार होतानाही जगभरातून आधाराचे शब्द मिळाले. मात्र आता तिला पॉर्न इंडस्ट्रीकडून ऑफर येत आहेत. याबाबत ग्वातरेजने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२०- परीसरात दोन दिवसापासून थंडीचा कडाका कायम... मनुष्यासह प्राणी मात्र हैराण
http://goo.gl/qROSx9
~~~~~~~~~~~~~~~
२१- Whats Up वरील व्हायरल व्हिडीओ - झिंगल बेल
http://goo.gl/l0Eyyz
~~~~~~~~~~~~~~~
२२- Whats Up वरील व्हायरल व्हिडीओ - पेंटिंग
http://goo.gl/k0itbU
~~~~~~~~~~~~~~~
२३- Whats Up वरील व्हायरल व्हिडीओ - आर्मी
http://goo.gl/CL7JiU
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
माणसाचा सर्वात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी होय.
[गजानन मुधळ, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी, [नोव्हेंबरमधील नोंदीनुसार]
डिसेंबरमध्ये अड्ड झालेल्या सर्व ग्रुपचे स्वागत
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment