Thursday, 31 December 2015

नमस्कार लाईव्ह ३१-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ३१-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- श्रीलंकेच्या नौदलाने तामिळनाडूतील नागापट्टीणम येथून २९ मच्छिमारांना केली अटक. 
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- काँग्रेसपेक्षा भाजपमध्ये कमी टॅलेंट, विनय सहस्रबुद्धेंचा घरचा आहेर 

             काँग्रेसच्या तुलनेत भाजपमध्ये टॅलेंटची कमतरता असल्याचं सांगत भाजपचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅबिनेट विस्तार करायचा आहे, मात्र काँग्रेसच्या तुलनेत भाजपमध्ये टॅलेंटेड नेते मिळत नसल्यामुळे विलंब होत असल्याचं सहस्रबुद्धे यांनी म्हटलं आहे. ही फक्त सध्याची स्थिती आहे, आम्ही शोध सुरुच ठेवू, अशी पुष्टीही जोडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅबिनेट विस्ताराचा विचार करत असल्याच्या चर्चा जोरावर असतानाच विनय सहस्रबुद्धे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तर्कवितर्कांना ऊत आला आहे. या वक्तव्यानंतर विनय सहस्रबुद्धे यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यानंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण सहस्रबुद्धे यांनी दिलं आहे. भाजपने चांगली कामगिरी बजावली आहे. त्यामुळे प्रतिभावान नेते न सापडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं ते म्हणाले.

३- सोनियांचा बंगला पंतप्रधानांच्या बंगल्यापेक्षाही मोठा 

              दिल्लीतल्या राजकारणात नेत्याचे स्थान, राजकीय वजन याबरोबरच नेत्यांच्या निवासस्थानांचीही माध्यमांमध्ये चर्चा होते. दिल्लीतील नेत्यांच्या निवासस्थानांबद्दल माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार खासदार व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे निवासस्थान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापेक्षा अधिक मोठे आहे. सोनिया गांधी यांचे १० जनपथ निवासस्थान क्षेत्रफळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७ रेसकोर्सवरील बंगल्यापेक्षा मोठं आहे.  दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी या दोघांचीच निवासस्थाने १० जनपथ पेक्षा मोठी आहेत. पण राष्ट्रपती भवन आणि उपराष्ट्रपतींचे ७ आरसीआर ही सरकारी निवासस्थाने आहेत. १० जनपथ हे निवासस्थान सोनिया गांधींना मंजूर करण्यात आले आहे.  केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याने दिलेल्या माहितीनुसार १० जनपथचे क्षेत्रफळ १५,१८१ स्क्वेअर मीटर आहे तर, पंतप्रधानांच्या ७ रेसकोर्सचे क्षेत्रफळ १४,१०१ स्क्वेअर मीटर आहे. देव आशिष भट्टाचार्य यांना माहितीच्या अधिकारातून ही माहिती मिळाली आहे.

४- दुबईत अडकलेल्या आकाशला सुषमा स्वराज यांची मदत 

            परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पुन्हा एकदा एका भारतीय नागरिकाची हाक ऐकून त्यावर तात्काळ मदत केली आहे. चांगलं आयुष्य आणि नोकरीच्या शोधासाठी सौदी अरेबियात गेलेल्या उत्तर प्रदेशच्या आकाश नावाच्या तरुणाचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंग साईटवर व्हायरल झाला होता, ज्यात त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची विनंती केली होती. सौदीमधील भारतीय दूतावासाचे अधिकारी आकाशपर्यंत पोहोचले आहेत आणि या प्रकरणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती सुषमा स्वराज यांनी ट्वीटद्वारे दिली.

५- छत्तीसगड स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपाचा दारूण बराभव, ११ जागांपैकी ७ जागांवर काँग्रेसने मिळवला विजय 

६- नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी संपूर्ण देशभरात तयारी, हॉटेल, पब, गृहनिर्माण सोसायटया सज्ज 

७- दिल्ली सरकारने दोन आयएएस अधिका-यांचे निलंबन केले म्हणून दिल्लीतील नोकरशहांचा सामूहिक सुट्टीवर जाण्याचा इशारा. 

८- नोटांवर आंबेडकर,विवेकानंदाची छायाचित्रे 

              लवकरच तुम्हाला नोटांवर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबसाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांची छायाचित्रे पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अर्थ, नियोजन तज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी यासंबंधित प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवलाय. यात नोटांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांची छायाचित्रे असावीत अशी सूचना त्यांनी केलीय. डॉ. आंबेडकरांच्या १२५व्या जयंती सोहळ्यात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय समितीत ते सदस्य होते. कोणत्याही देशातील करन्सीवर त्या देशांतील दिग्गज नेत्यांची छायाचित्रे असतात. १९९६नंतर भारतात सर्व नोटांवर महात्मा गांधींचे फोटो आहेत. यात बदल करणे हे नक्कीच मोठे पाऊल असेल, असे जाधव यावेळी म्हणाले.  समितीच्या पहिल्या बैठकीत मी पंतप्रधान मोदींना ही संकल्पना सुचवलीये. अमेरिका तसेच युकेमध्ये तेथील मोठ्या नेत्यांची छायाचित्रे असतात. भारतातही हे होऊ शकते. आपणही डॉ. आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांची छायाचित्रे छापू शकतो, असे जाधव यांनी सांगितले. नुकतीच सरकारने डॉ. आंबेडकरांचे छायाचित्रे असलेली नाणी जारी केली आहेत.   १९९६पूर्वी भारताच्या नोटांवर महात्मा गांधीव्यतिरिक्त अशोक स्तंभाचा फोटोही छापण्यात येत असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून केवळ गांधींजीचे छायाचित्रे असलेल्या नोटा छापल्या जात आहेत.

~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- सार्वजनिक ठिकाणी शिवागाळ हि क्रूरताच - हायकोर्ट 

१०- पाचवी ते आठवी परीक्षा पुन्हा सुरु करा, तावडेंची मागणी 

११- पालघर; गावठी दारु उद्ध्वस्त करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची मदत 

           वसईतील गावठी दारुचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी चक्क ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला आहे. मलाजीपाडा भागात भाईंदर खाडीजवळ मोठ्या प्रमाणात गावठी दारु बनवली जाते. वसईतील मलाजीपाडा पाडा विभागात भाईंदर खाडी येथे तीन बेटे आहेत. या बेटांवर मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनवली जाते. दलदल भाग आणि तिवारांची घनदाट झाडी यामुळे तेथे पोलिसांना सर्च ऑपरेशन करणे जिकरीचं जात त्यामुळे पालघर पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं ठरविलं. आता पालघर पोलिस या घनदाट दलदलीच्या झुडपात गावटी दारूचे अड्डे शोधण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करणार आहे. पालघर पोलिसांनी यासाठी चार टीम तयार केल्या आहेत. ड्रोनच्या सहाय्याने या टीम संपूर्ण विभागाची पाहणी करून, गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करत आहेत.

१२- हेमामालिनी यांना कलाकेंद्रासाठी दिलेला भूखंड उद्यानासाठी राखीव 

             बॉलिवूडची ड्रीमगर्ल आणि भाजप खासदार हेमामालिनी यांना अल्पदरात दिलेला भूखंड उद्यानासाठी राखीव असल्याची माहिती आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी हेमामालिनी यांच्या ट्रस्टद्वारे प्रस्तावित सांस्कृतिक केंद्रासाठी हा भूखंड दिला आहे. मुंबईच्या अंधेरी पश्चिममधील 29 हजार 360 चौरस मीटरवरील भूखंडापैकी काही भाग हेमामालिनी यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या कला आणि सांस्कृतिक केंद्रासाठी देण्यात आला आहे. भूखंडाचा काही भाग 1998 मध्ये उद्यानासाठी राखीव होता आणि महापालिकेने त्या जागेचा विकास करणं अपेक्षित होतं. मात्र तसं न झाल्याने 2010 मध्ये एकूण भूखंडातील 2 हजार चौरस मीटरचा भाग आरक्षणातून वगळण्यात आला. हेमामालिनी यांच्या ट्रस्टने मोकळ्या जागेचा उद्यानासाठी वापर करावा आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हा भाग खुला असावा, असं सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. अंतिम निर्णय होण्यापूर्वी हेमामालिनी यांनी अशा प्रकारच्या 15 अटींची पूर्तता करणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- पंजाब लुधियानामध्ये मल प्रक्रिया प्रकल्पाचे बांधकाम कोसळून झालेल्या दुर्घटनेत, एका मजूराचा मृत्यू, दोन जण जखमी 

१४- पश्चिम बंगालच्या हुंगळी जिल्ह्यात बाजारपेठेत झालेल्या स्फोटामध्ये दोन जण जखमी  

१५- सम-विषम फॉर्म्युलाचे उल्लंघन करणाऱ्या गाड्यांना दिल्लीत पार्किंग मिळणार नाही. 

१६- कोल्हापूरात टेंबले उड्डाण पुलाजवळ बुधवारी रात्री टेम्पो दुभाजकावर धडकून झालेल्या अपघातात २ ठार, २ जखमी. 

१७- अमरावतीत लक्ष्मीनगर झोपडपट्टीला रात्री आग लागली, सिलिंडर स्फोटामुळे आग अधिक भडकली, आगीत जिवीतहानी नाही मात्र रिक्षा, दुचाकी आणि घरगुती सामान जळून खाक. 

१८- पंजाब अमृतसरमध्ये बस आणि गाडीची धडक होऊन भीषण अपघात, नऊ ठार तर सहाजण जखमी 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- अभिनेत्री विद्या बालन रुग्णालयात दाखल

            बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनला पाठदुखीच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विद्या सध्या मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती लवकरच सुधारेल, अशी माहिती तिच्या प्रवक्त्याने दिली आहे. विद्याला किडनी स्टोनच्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पती सिद्धार्थ रॉय कपूरने विद्याला मंगळवारी रुग्णालयात दाखल केलं आहे. अबू धाबीहून दुसऱ्या ठिकाणी रवाना होण्यापूर्वी विद्याला पाठीदुखी सुरु झाली. त्यानंतर तिला तातडीने मुंबईत आणून हिंदुजा रुग्णालायत दाखल करण्यात आलं. 1 जानेवारीला विद्या बालनचा वाढदिवस आहे. न्यू इयर तसंच बर्थडे सेलिब्रेशसाठी ती पतीसह परदेशी जात होती. “विद्याला प्रचंड त्रास होत होता आणि त्यामुळे डॉक्टरांना विमानातच बोलवण्यात आलं. यानंतर विद्याला विमानतळावरील क्लिनिकमध्ये तपासणीसाठी नेण्यात आलं.

~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२०- नांदेड; दहा वर्षात टँकरवर पन्नास कोटी रुपये खर्च; यावर्षीही दहा कोटींहून अधिक खर्च होण्याची शक्यता 

२१- थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवर पोलिसांची नजर; शहरात २२ ठिकाणी नाकाबंदी 

२२- विष्णुपुरी पाण्याच्या सुरक्षेसाठी सशस्त्र पहारा; तीन पथकांची नियुक्ती 

२३- पाणीपुरवठ्याची अपूर्ण कामे मार्गी लावा; जिल्हाधिकारी काकांनी यांचे आदेश 
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आपण प्रवाहाच्या विरुद्ध काही केले आणि एकदाचा विरोधकाचा विरोध मावळला की तेही आपल्यातच सामील होऊन जातात
[निलेश डोंगरे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
नंदर गायकवाड, अविनाश जाधव, साईनाथ वाघमारे, निशा पांडे, तामदार सिंघ, ताहेर पठाण, सलमान भोला, ओमकार थोरात, शरद पतंगे, नंदाराज थापरे, महेश शिरेवार, प्रदीप शर्मा, कैलाश पाटील, विक्रम जेजुरीकर, प्रशांत देशमुख, गौरव मयूर, संतोष गाडे,
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
*  *  *  *  *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
नोकरी पेक्षा उद्योग बरा स्वतःचा व्यवसाय सुरु करा
 स्वयंचलित चहा, कॉफी,मसाले दूध बनविण्याचे मशिन बसवा व हजारो कमवा
50% पर्यंत नफा
गॅस,चूल दूधाची आवश्यकता नाही
1 मिनिटात 5 कप तयार
बटन दाबा चहा, कॉफी,मसाले दूध मिळवा
संपर्क
8975307470,
9890098265
https://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_124.html
*****************
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
 १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: