Saturday, 19 December 2015

नमस्कार लाईव्ह १९-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह १९-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
१- सोनिया - राहुल गांधींची आज पटियाला कोर्टात हजेरी 
                       नॅशनल हेराल्डप्रकरणाच्या सुनावणीसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह 6 जण आज दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयासमोर हजर राहणार आहेत. यामध्ये सॅम पित्रोदा, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडीस यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश आहे. दुपारी तीनच्या सुमारास हे सर्वजण कोर्टात हजर राहण्याची शक्यता आहे. मात्र आज हे सर्वजण जामीन घेणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

२- ISIS सोशल मीडियावर हातपाय पसरतेय 
                     'मुस्लीम गँग्ज, द फ्यूचर ऑफ मुस्लिम्स इन द वेस्ट' असं या पुस्तकाचं नाव आहे. ISISच्या या घुसघोरीचा पोलीस यंत्रणेनं धसका घेतलाय. मुंबई पोलिसांच्या दहशतवादी पथकानं हे पुस्तक इंटरनेटवरुन हटवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केलेत.

३- सध्या संपूर्ण जगात मंदीचे वातावरण असून भारतही त्यापासून दूर नाही - अर्थमंत्री अरूण जेटली. 

४- जम्मू-काश्मीरमधील हांडवारा येथून एका दहशतवाद्याला अटक, लष्कर व पोलिसांची संयुक्त कारवाई 

५- निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन दोषीची होणारी सुटका हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस असेल - दिल्ली महिला आयोग 

६- विमानाच्या पंख्यात खेचला जाऊन एअर इंडियाच्या कर्मचा-याचा जीव गेल्याप्रकरणी एनएचआरसीने एअर इंडिया व नागरी उड्डाण मंत्रालयाला नोटीस 
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- विदर्भवाद्यांचा पुरस्कार हा रक्तदोष, 'सामना'तून टीका 
                     महाराष्ट्राचे महाधिवक्ते श्रीहरी अणे यांच्या स्वतंत्र विदर्भाच्या वक्तव्यावरुन शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेनेने मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचा ‘सामना’मधून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. अखंड महाराष्ट्राचे रक्त ज्यांच्या धमन्यांमधून उसळत नाही, त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार? असा सवाल सामनात विचारण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांनी अणेंची बाजू घेणे हा केवळ रक्तदोषच असू शकतो अशी जहरी टीका करत शिवसेनेने अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावर आपली भूमिका ठाम असेल हे स्पष्ट केलं आहे.

८- बंडखोर महाडिकांची हकालपट्टी, काँग्रेसचा दणका 
                        विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र या जागेवर महादेवराव महाडिक यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच महाडिक भाजपच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवत असल्याचं निदर्शनात आल्याने काँग्रेसने ही कारवाई केली आहे. त्यामुळे हा पक्षशिस्तीचा भंग असल्याचं कारण देत काँग्रेसनं महाडिक यांचं निलंबन केलं आहे.

९- उत्तर प्रदेशमधील आझमगड येथे स्थानिक काँग्रेस नेता राजनारायण सिंह यांची गोळ्या झाडून हत्या 
१०- डिंपल आणि अखिलेश यादव लिफ्टमध्ये अडकले 
                      अनेक राजकारणी लिफ्टमध्ये अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याची प्रचिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही आली. अखिलेश यादव आणि त्यांची पत्नी डिंपल यादव हे 15 मिनिटे लिफ्टमध्ये अडकले. आश्चर्य म्हणजे ही लिफ्ट विधानसभेतीलच होती. यानंतर मग रेस्क्यू टीमने पहिल्या मजल्यावर येऊन या दोघांनाही बाहेर काढलं. उत्तर प्रदेश विधानसभेतीलच लिफ्टमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची खासदार पत्नी 15 मिनिटे अडकल्याने, सर्वांची धावपळ उडाली.


११- नागपूरमध्ये मातंग समाजाच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज 

                   विधानसभेवर धडकणार्‍या मातंग समाजाच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या लाठीचार्जध्ये 70 जण जबर जखमी झाले आहेत. नागपूरच्या कस्तूरचंद चौकात ही घटना घडली आहे. काही आंदोलनकर्ते परिसरातील इमारतीमध्ये गेले असता. पोलिसांनी त्यांना बाहेर खेचून मारहाण केली.

१२- मुंबई महानगर पालिकेत प्रमुख लेखापाल खात्यात ३३९ रिक्त पदे भरणार 

                          महानगर पालिकेत प्रमुख लेखापाल खात्यात पीबी १ रुप ५२००-२०२०० अधिकक ग्रेड पे रुपये २४०० अधिक अनुज्ञेयं भत्त या वेतन श्रेणीतील कनिष्ठ लेका परीक्षा व लेखा सहाय्यक या संवर्गातील ३३९ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी २३ डिसेंबर २०१५ ते १८ जानेवारी २०१६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेय.

१३- सरकारी बँकांमध्ये ६० हजार जागांसाठी मेगाभरती 
                           सरकारी बँकामध्ये अनेक पदे रिक्त आहेत तसेच तब्बल ३८ हजार कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी ही भरती केली जाणार असल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली.  २०१३-१४ मध्ये रिक्त पदांची संख्या ३८ हजार २५४ होती. तर त्यावर्षी ३५ हजार ५४९ पदांवर भरती करण्यात आली. २०१४-१५ मध्ये रिक्त पदे ३८ हजार १७० होती तर या जागांवर ३० हजार ३५९ जणांची भरती करण्यात आली. २०१५-१६ मध्ये २१ हजार ५०० रिक्त पदे होती.

 १४- नागपुर; चोरट्यांचा धुमाकूळ, चार एटीएम फोडून २५ लाखांची लुट 
                       एटीएमवरील चोरीची पद्धत सारखीच असल्याचं समोर आले आहे. एटीएमच्या सीसीटीव्हीत एक व्यक्ती कैद झाली आहे. याच व्यक्तीनं आपल्या साथीदारांसह नागपुरातल्या ४ एटीएम केंद्रांवर हल्ला करत तब्बल २५लाख रुपये लुटलेत.हिंगणा रोडवरच्या याच सेंट्रल बँकेच्या एटीएमला चोरट्यांनी टार्गेट केलं. अवघ्या २० मिनिटांत त्यांनी १७ लाख रुपये लुटलेत. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी एटीएमला पेटवून दिलं.  १७ लाख लुटल्यानंतरही या चोरट्यांचं समाधान झालं नाही. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंडीकेट बँक आणि हिंगणा पोलिसांच्या अधिकार क्षेत्रातील यूको बँकेवर त्यांनी दरोडा टाकला. या दोन्ही एटीएममधून त्यांनी तब्बल ८ लाख लुटलेत. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा इंडिया वनच्या एटीएमकडे वळवला. मात्र बाहेरचे कॅमेरे फो़डण्यापलीकडे त्यांनी काही केलं नाही. गॅस कटरच्या मदतीनं मशीन कापत या चोरट्यांनी हा डल्ला मारला.  

१५- छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात एक महिला नक्षलवाद्याने मुलासह पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- नाशिक: कार झाडावर आदळली, 5 तरूण जागीच ठार 
                         नाशिकमधल्या कळवण-वणी रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात 5 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहेत. मध्यरात्री 2 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मृत पाचही तरुण मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात होते. त्यावेळी खाडेमळा शिवारातल्या कळवण-वणी रस्त्यावर त्यांची कार झाडावर आदळून हा अपघात घडला. अपघातग्रस्त सर्व तरुण वणी गावाचे रहिवाशी आहेत. त्यामुळे वणी गावावर शोककळा पसरली आहे. हा अपघात इतका भीषण होता की कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. अपघातात साहील झावरे, साहील सय्यद, सचिन शेळके, सकलेन सय्यद, सचिन ढोले हे पाच मित्र जागीच ठार झाले. तर इमरान शेख, रोशन खान्दम, द्यानेश्वर धूम हे 3 मित्र जखमी झाले आहेत.
                   

१७- रत्नागिरी : बस झाडाला लटकली, मोठी जीवितहानी टळली 



                           चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं गाडी दरीच्या दिशेनं गेली. मात्र सुदैवानं गाडी आंब्याच्या झाडाला अडकली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जखमींना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल केलं आहे.

१८- पालघर; वाडा येथे विवाहित तरुणाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार 
                      पीडीत मुलगी आठव्या इयत्तेत शिकत असून शेजारी राहणाऱ्या संदीप रामु सांबरे याच्या घऱी ती गेली असताना या नराधमाने संधीचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला़. या प्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांनी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी संदीला अटक केली आहे. न्यायालयानं आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

१९- कोल्हापूरमध्ये डोक्यात दगड घालून वृद्धाची हत्या 

२०- औरंगाबादमधील दिल्ली गेट परिसरात वाळूची चोरटी वाहतूक करणारी ३ वाहने पकडली 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी युवराज टीम इंडियात परतणार 
                     दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 23 विकेट्स घेणारा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजाचं, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी संघांमधलं स्थान निश्चित मानलं जात आहे. याशिवाय टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंहचं नावही चर्चेत टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाच वन डे आणि तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत खेळणार असून, या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आज नवी दिल्लीत होईल.

~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२२- हिंदू महासभेचे अखिलेश तिवारी यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्याने त्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

२३- स्थायी समितीच्या आयत्या विषयांना मिळणारी मंजुरी सभापती अनुजा तेहरा यांनी पहिल्याच सभेत केली बंद 

२४- सोयी-सुविधांच्या मागणीसाठी देगलूरमध्ये भाजी विक्रेत्यांच्या संप 

२५- सगरोळी परिसरातून अवैध वाळूचा ट्रक्टर जप्त 
~~~~~~~~~~~~~~~
२६- फुटबाॅलच्या खेळाचा भास करणारी अप्रतिम कलाकृती
http://goo.gl/MVux90
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
अंकुर सिंघ, सुभाष पाटील, विवेक मुगळीकर, विजय शिर्मेवार, बालाजी कात्तूरवार, हरभजनसिंग पुजारी, प्रणव क्षीरसागर, शक्ती चौधरी, प्रतिक अग्रवाल, कृष्णा शिंदे, प्रेमदीप मालुंजकर, अजित मंडलिक, राजेंद्र
आहेर
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण पैशाचे रक्षण करावे लागते पण ज्ञान हे तुमचेच रक्षण करते
[रवींद्र ढवळे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
*  *  *  *  *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
CCTV कॅमेरा बसवा आणि सुरक्षित राहा
करा आपला व्यवसाय आणि घर सुरक्षित
CP PLUS, Gadgets World Nanded
HD CCTV CAMERA PACKAGE
4 HD CAMERA CP PLUS 1MP
4CH HD DVR CP PLUS
1TB HDD
WIRE 92 MTR
INSTALLATION
JUST 18000 Rs ONLY
GADGETS WORLD, CENTRE POINT,
SHIVAJI NAGAR, NANDED
07744995599
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/cp-plus-gadgets-world-nanded.html
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी, [नोव्हेंबरमधील नोंदीनुसार]
डिसेंबरमध्ये अड्ड झालेल्या सर्व ग्रुप स्वागत
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
 १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: