Tuesday, 22 December 2015

मुखेड येथे नेहरु युवा केंद्रातर्फे आयोजीत वकृत्व स्पर्धेत पत्रकार रियाज शेख प्रथम



" मुखेड येथे नेहरु युवा केंद्रातर्फे आयोजीत वकृत्व स्पर्धेत पत्रकार रियाज शेख प्रथम "


मुखेड :- बबलु मुल्ला 


        केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा विभागामार्फेत नेहरु युवा केंद्र नांदेड च्यावतीने युवा नेता प्रशिक्षण व पडोस युवा संसद कार्यक्रम अंतर्गत तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रियाज शेख यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. 
     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य सि.एन.एकलारे हे होते. तर प्रमुख पाहुणे कुलदीप सिंह शाहू नेहरू युवा केंद्र जिल्हा समन्वयक, ज्ञानेश्वर कोंटमवार, तालुका समन्वयक संघशिल भद्रे, सह पत्रकार महेताब शेख, अँड.संजय भारदे, अनिल सिरसे, इसाक तांबोळी, आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य रामकृष्ण बदने सरांच्या हस्ते करण्यात आले. 
आयोजीत वकृत्व स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी देशभक्त युवा एंव राष्ट्र निर्माण, जिम्मेवार ग्रामवासी एंव आदर्श गांव या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. स्पर्धकांनी भविष्यातील आदर्श गांव ते आदर्श राष्ट्र निर्माणासाठी युवकांनी संघठीत होणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त केली. या स्पर्धेत रियाज शेख यांनी देशभक्त युवा व राष्ट्र निर्माण या विषयावर बोलुन प्रथम क्रमांक पटकावला. देवकत्ते गजानन द्वितीय तर सय्यद उस्मान जाफरसाब यांनी तृतीय क्रमांक मिळवुन यश संपादित केले. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यास जिल्हापातळीवरिल स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल अशी माहीती जिल्हा समन्वयक कुलदिपसिंह शाहु यांनी दिली.
स्पर्धेस परीक्षक म्हणुन प्रा.वारकड, प्रा.डाले प्रा.तमशेट्टे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. जोशी मँडम तर आभार प्रा.धानोरकर यांनी मानले.

No comments: