Monday, 28 December 2015

विभागीय रेल्वे उपभोक्ता सलाहकार सदस्य समिती ची १४ वी बैठक संपन्न




                                         दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागतील रेल्वे उपभोक्ता सलाहकार सदस्य समिती ची १४ वी बैठक आज दिनांक २८.१२.२०१५ रोजी विभागीय रेल्वे कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस २३ पैकी १४ सदस्य उपस्थित होते. नांदेड विभागातील सर्व जिल्ह्यातून या बैठकीसाठी सदस्य उपस्थित झाले होते.

बैठकी दरम्यान विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ज्यात नांदेड – बिकानेर नवीन गाडी मार्गे औरंगाबाद, नांदेड-मुंबई नवी गाडी,  पुणे गाडीला नियमित करणे, पुणे गाडीचा प्रवासाचा वेळ कमी करणे, अकोला-पूर्णा गाडी नांदेड पर्यंत वाढविणे, स्थानकावरील स्वच्छतेत सुधारणा करणे, अकोला खांडवा ब्रॉड गेज परिवर्तन करणे, मुदखेड-परभणी दुहेरीकरण इत्यादी मागण्या मांडल्या. या बैठकीत डॉ. अखिलेश कुमार सिन्हा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, श्री सी. एम. गुप्ता, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, श्री के. मधुसुधन, वरिष्ठ विभागीय वाणिज्य अधिकारी, श्री विक्रमादित्य, वरिष्ठ परिचालन अधिकारी आणि इतर रेल्वे अधिकारी उपस्थित होते.


या बैठकीत श्री. गी. पी. खंडेलवाल, अकोला, श्री एस. एस. ठाकूर, अकोला, श्री एन. तोष्णीवाल, हिंगोली, श्री भावेश पटेल, औरंगाबाद, श्री अर्जुन गेही, जालना, श्री सुधाकर खराटे, पूर्णा, श्री प्रदीप मुठा, औरंगाबाद, श्री मंगेश कापोते, औरंगाबाद, श्री थानसिंग बुंगाई , प्रभारी अधीक्षक, गुरुद्वारा, नांदेड, श्री अनिल पाटील, नांदेड, श्री जुगलकिशोर कोठारी, वाशीम आणि श्री शंतनू सुधाकर डोईफोडे, नांदेड आदी विभागीय रेल्वे उपभोक्ता सलाहकार समिती सदस्य उपस्थित होते.

No comments: