नमस्कार लाईव्ह १९-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- भारतविरोधी चर्चा नको, 'शरीफ' वक्तव्य
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मात्र पहिल्यांदा त्यांच्या मंत्र्यांना भारताविरोधात वक्तव्य न करण्याची ताकिद दिला आहे. काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या दोन्ही देशांमधील शांती वार्तावर काही परिणाम होऊ नये यासाठी पंतप्रधान शरीफ यांनी त्यांच्या काही नेत्यांना ही ताकिद दिली आहे. 'मागील काही गोष्टी पुन्हा उकरून काढण्यापेक्षा असे वक्तव्य करा ज्यामुळे दोघं देशांमधील चर्चेला प्रोत्साहन मिळेल', अशी ताकिद पंतप्रधान शरीफ यांनी त्यांच्या मंत्रीमंडळ आणि सहकाऱ्यांना दिली आहे.
२- सिंगापूर; पंतप्रधानांना चोर म्हटल्याने बसला 70 लाखांचा दंड
ब्लॉगवर पंतप्रधानांवर चुकीचे आणि निराधार आरोप लावल्याने एका युवकाला तब्बल ७० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. युवकाने एका घोटाळ्यात पंतप्रधानांचा हाथ हसल्याचा आरोप लावला होता. त्यामुळे कोर्टाने या निराधार आरोपाविरोधात युवकावर दंड लावला आहे. रॉय नंग या युवकाने पंतप्रधान ली शीन लूंग यांच्यावर प्रोविडंट फंडमध्ये अनेक कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप लावला होता. प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायाधीशांनी म्हटलं की, रॉयला सरकारच्या सीपीएफ नितीवर टीका करायची होती पण त्याने पंतप्रधानांना चोर म्हटलं त्यामळे त्याला 70 लाख रुपये द्यावे लागतील.
३- युद्धग्रस्त सीरियामधून समुद्रमार्गे युरोपमध्ये जाण्याचा प्रयत्न करणा-या स्थलातरितांची एक बोट उलटली असून १८ जण बुडाले
४- फ्रान्समध्ये झिरो फिगर मॉडेलवर बंदी, फॅशन शोमध्ये सहभाग घेऊन नियमाचे उल्लंघन केल्यास होणार ६ महिन्यांची शिक्षा.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- फक्त 2 मिनिटात सोनिया आणि राहुल गांधींना जामीन
नॅशनल हेराल्डप्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पटियाला हाऊस कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अवघ्या 2 मिनिटात प्रत्येकी 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला. राहुल यांच्यासाठी प्रियाकांनी तर सोनियांसाठी ए के अँटोनी यांनी जामीन दिला. या सुनावणीसाठी सोनिया – राहुल गांधीशिवाय, प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे दिग्गज नेतेही उपस्थित होते. सोनिया आणि राहुल दुपारी सुमारे 2.43 वा कोर्टात हजर झाले. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटात कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.
६- झुकणार नाही, मागे हटणार नाही, राहुल गांधींनी ठणकावलं
आम्ही कोणापुढेही झुकणार नाही, आम्ही इंचभरही मागे हटणार नाही, असं राहुल गांधी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात जामीन मंजूर झाल्यानंतर ठणकावून सांगितलं आहे. नरेंद्र मोदी आमच्यावर तथ्यहीन आरोप करत आहेत, मात्र आम्ही त्याला भीक घालणार नाही असं म्हणत राहुल आणि सोनिया गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. केंद्र सरकारने आम्हाला जाणूनबुजून लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे, पण ते आम्हाला कधीच पण ते कधीच आरोप सिद्ध करु शकणार नाहीत, असा विश्वास सोनिया यांनी व्यक्त केला आहे.
७- सोनिया- राहुल समर्थनार्थ नारायण राणे मैदानात
सोनिया आणि राहुल गांधी यांना राजकीय सूडापोटी नॅशनल हेराल्डप्रकरणात गोवलं जातंय, असा आरोप करत मुंबई काँग्रेसनं मोर्चा काढला आहे. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. वांद्रेच्या खेरवाडी पुलावर काँग्रेस नेत्यांनी जोरदार निदर्शनं करत, भाजप सरकारचा निषेध केला. पोलिसांच्या कडक बंदोस्तात हा मोर्चा पार पडला. “भाजप सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारला अशा कारवायांसाठी वेळ आहे. मात्र जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी वेळ नाही” असा घणाघात राणेंनी केला.
८- समलैंगिक संबंधांना कायदेशीर करण्याची मागणी करणा-या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी ३७७ कलमाच्या विरोधात चेन्नईमध्ये निदर्शने
९- नॅशनल हेराल्ड प्रकरण: मी हा खटला २०१६ साली नक्की जिंकेन. सोनिया गांधी, राहुल गांधी व इतर तुरूंगात जातील - सुब्रमण्यम स्वामी
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- नॅशनल हेराल्ड प्रकरणी नाशिकमध्ये काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन
११- पुणे; पोलिसांच्या पेट्रोलिंग जीपमध्ये महिलेची प्रसुती
खडक पोलीस स्टेशनची जीप शुक्रवारी रात्री पेट्रोलिंग करत होती. यावेळी पोलिसांना पहाटे साडेतीन वाजता घोरपडी PMP बस स्टॉपवर एक महिला जोर -जोरात विव्हळताना आढळली. महिलेला विचारणा केली असता तीने प्रसुतिसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची विनंती केली. तिला घेऊन जात असतानाच जीपमध्ये ती प्रसुत झाली. यानंतर पोलिसांनी तिला तातडीने कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- डोंबिवलीमध्ये मनसेचं मुख्यमंत्र्यांविरोधात गाजर आंदोलन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीसाठी 6 हजार 500 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. पण त्यांनी हिवाळी अधिवेशनात जाहीर केलेल्या विशेष पॅकेज वरून घूमजाव केलाय. या प्रकरणी आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी गाजर आंदोलन करत सरकारचा निषेध केला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामांसाठी या भागात विशेष पँकेज जाहीर केलं होतं. 6 हजार 500 कोटींचं पॅकेजची घोषणा प्रचारसभेदरम्यान करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या युटर्ननंतर त्यांच्या निषेधार्थ डोंबिवलीमध्ये मनसेनं मुख्यमंत्र्यांविरोधात गाजर भेट आंदोलन केलं. मनसे कार्यकर्त्यांनी नागरिकांना गाजरच भेट दिली.
१३- चंद्रपुरात 60 पेट्या देशी दारु जप्त, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
चंद्रपुरात काही दिवसांपूर्वी दारु तस्करीसाठी खास इंडिका कार मॉडिफाय केल्याचं समोर आलं होती. त्यानंतर आता मूल मार्गावरील फेरो अलॉय लिमिटेड या स्टील प्लांटमध्ये तब्बल 60 पेट्या देशी दारु जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या दारूची किंमत अंदाजे 6 लाख रुपये आहे. धक्कादायक म्हणजे चंद्रपूर फेरो अलॉय लिमिटेड ही SAIL म्हणजेच स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या केंद्र सरकारच्या नवरत्न कंपनीची सहायक कंपनी आहे. त्यामुळे चंद्रपूर फेरो अलॉय लिमिटेडच्या सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना स्टील प्लांट परिसरात मोठ्या प्रमाणात दारू लपवल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार आज संध्याकाळी प्लांट परिसरात असलेल्या निवासी संकुलाजवळ छापा टाकण्यात आला. ज्यामध्ये 4 ठिकाणी लपवून ठेवण्यात आलेली दारू जप्त करण्यात आली. पोलिसांनी सध्या या प्रकरणात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून चंद्रपूर फेरो अलॉय लिमिटेडच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी करण्यात येत आहे.
१४- मुजफ्फरपूर : महिला आमदारांना धमकीचा एसएमएस
बिहारमधील बोचहा मतदार संघातून निवडून आलेल्या एका महिला आमदाराकडून १ कोटींची मागणी करण्यात आली आहे. पैसे न दिल्यास परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा असा एसएमएसही त्यांना करण्यात आला आहे. 1 कोटी रुपये न दिल्यास परिवारातील लोकांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या विरोधात आमदार बेबी कुमारी यांनी मिठनपूर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. आमदार बेबी कुमारी यांना लोक जनशक्ती पक्षाकडून तिकिट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. ज्यामध्ये त्यांनी जदयूच्या रमई राम यांचा मोठ्या मतांनी पराभव केला होता. निवडणुकीदरम्यानही त्यांना माघार घेण्यासाठी धमकी आली होती.
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१५- आता टवाळखोरांना खराखुरा ‘शॉक’, बेळगावच्या इंजिनियरने बनवले अनोखे हातमोजे
टवाळखोरांना यापुढे महिलांची छेडछाड करणं चांगलंच महागात पडू शकतं. कारण छेडछाड करणाऱ्यांना ‘झटका’ देण्यासाठी बेळगावातील एका विद्यार्थ्याने उपकरण तयार केलं आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असं हे उपकरण आहे. महांतेश होसमनी असं या उपकरण बनवणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बेळगावातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याने रोड रोमिओंना झटका देणारे एक उपकरण बनवले आहे. निर्मनुष्य रस्त्यावरून तरुणी किंवा महिला जात असताना त्यांची छेडछाड करण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. अशा प्रसंगी हातमोज्याप्रमाणे असणारे हे उपकरण महिलांच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे.
१६- संजय दत्तला दरवर्षी 114 दिवसांची शिक्षामाफी
अभिनेता संजय दत्तला वर्षागणिक तब्बल 114 दिवसांची सुट्टी मिळते, अशी माहिती तुरूंग अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी दिली आहे. त्यामुळे संजय दत्त दीडवर्ष आधीच बाहेर येण्याची शक्यता आहे.कैद्याला महिन्यातील 7 दिवसांची सुट्टी नियमानुसार माफ होते. शिवाय वर्तन चांगलं असल्यास वर्षाला 30 दिवसांची अधिक सुट्टी मिळते. त्यामुळे एकूण सुट्टयांची संख्या धरल्यास संजयला साधारण 114 वर सुट्टया मिळू शकतात. त्यामुळे संजय दत्त दीड वर्ष आधीच बाहेर येतो की काय, अशीही चर्चा सुरु आहे.
१७- पाठवलेले मेसेज आपोआप होणार डिलीट
अनेकदा चुकून आपल्याकडून एखाद्या व्यक्तीला मेसेज पाठवले जातात. यामुळे अनेकदा समस्या निमार्ण होऊ शकते. मात्र असेही अॅप आहेत जे अशा मेसेजेसना आपोआप डिलीट करतील. काबूम नावाचे हे अॅप असून ते अँड्रॉईड आणि आयफोन दोन्हींमध्ये उपलब्ध आहे. या अॅपच्या सहाय्याने तुम्हाला हवा असलेला मेसेज आपोआप डिलीट होणार. या अॅपद्वारे मेसेज पाठवताना तुम्हाला विशिष्ट वेळ निर्धारित करावी लागेल. किती वेळ हा मेसेज पाठवलेल्या व्यक्तीला दिसला पाहिजे आणि किती वेळानंतर डिलीट झाला पाहिजे हे तुम्ही ठरवू शकता. जर तुम्ही सोशल मीडियावर या अॅपद्वारे मेसेज पाठवात आहात तर मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तींची संख्याही तुम्ही ठरवू शकता. तुम्हाला एखादा मेसेज १० लोकांना पाठवायचा आहे तर त्या १० लोकांकडे मेसेज गेल्यावर तो आपोआप डिलीट होईल. याचप्रकारे विकर हे अॅप काम करते
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
१८- मुखेड; शहीद अश्फाक उल्ला खान यांना शहीद दिनी अभिवादन
http://goo.gl/w2w2yS
~~~~~~~~~~~~~~~
१९- MDRT एजंट केशव रोडे यांचा सत्कार सोहळा संपन्न
http://goo.gl/L4qy1q
~~~~~~~~~~~~~~~
२०- ऑक्सफर्ड जीगली शाळेची वार्षिक क्रीडा संपन्न
http://goo.gl/Hju8tl
~~~~~~~~~~~~~~~
२१- रक्ताच्या नात्यापेक्षा रक्तदानाचे कार्य मोठे - डाँ.दिलीप पुंडे
http://goo.gl/NwGIdz
~~~~~~~~~~~~~~~
२२- बिलोलीत विविध संघटनेच्या वतिने तीव्र निषेध
http://goo.gl/dUJgC5
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
स्पर्धेत टिकून तोच राहील जो आपल्या माणसांना विसरणार नाही...
कारण माणूस कितीही मोठी काम्गीती जिंकला आणि शाबासकी द्यायला आपली मनसे नसतील तर तो जिंकूनही हरलेला असतो
[विठ्ठल धर्माधिकारी, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
~~~~~~~~~~~~~~~
CCTV कॅमेरा बसवा आणि सुरक्षित राहा
करा आपला व्यवसाय आणि घर सुरक्षित
CP PLUS, Gadgets World Nanded
HD CCTV CAMERA PACKAGE
4 HD CAMERA CP PLUS 1MP
4CH HD DVR CP PLUS
1TB HDD
WIRE 92 MTR
INSTALLATION
JUST 18000 Rs ONLY
GADGETS WORLD, CENTRE POINT,
SHIVAJI NAGAR, NANDED
07744995599
अधिक माहितीसाठी लिंक
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/cp-plus-gadgets-world-nanded.html
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी, [नोव्हेंबरमधील नोंदीनुसार]
डिसेंबरमध्ये अड्ड झालेल्या सर्व ग्रुपचे स्वागत
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment