Sunday, 20 December 2015

नमस्कार लाईव्ह २०-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २०-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- येमेनवरुन सौदी अरेबियावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये दोन भारतीय 
२- बॉम्बच्या धमकीनंतर एअर फ्रान्सच्या विमानाचे केनियामध्ये इर्मजन्सी लॅंडीग 
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- निर्भयाच्या अल्पवयीन गुन्हेगाराची अखेर सुटका,  पालकांचं आंदोलन; तूर्तास सामाजिक संस्थेच्या ताब्यात 

                     बालगुन्हेगाराची सुटका होऊ नये म्हणून निर्भयाच्या पालकांनी अनेक प्रयत्न केले होते. मात्र ते आता अपयशी ठरले असंच म्हणावं लागेल. दरम्यान निर्भयाच्या पालकांनी दिल्लीतल्या इंडिया गेटबाहेर निदर्शनं केली. मात्र पालकांना विरोध करत पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. याआधी निर्भयाच्या आईनं गुन्हेगाराला सोडू नये यासाठी बालसुधारगृहाबाहेर आंदोलन केलं होतं. यावेळी पोलिसांनी निर्भयाच्या आईला ताब्यात घेऊन थोड्या वेळानं सोडलं. महत्त्वाचं म्हणजे 16 डिसेंबर 2012 रोजी ही धक्कादायक घटना घडली, त्यावेळी या आरोपीच्या वयाची 18 वर्षे पूर्ण होण्यास काही महिन्यांचा अवधी होता. त्याला शिक्षा सुनावली तेव्हा त्याने 18 वर्षे पूर्ण केली होती. मात्र गुन्हा घडला तेव्हा तो अल्पवयीन असल्याचं गृहित धरल्याने त्याला फायदा मिळाला. आता हाच नराधम 21 वर्षांचा झाला आहे.

४- महाराष्ट्र सदन घोटाळा: भुजबळांच्या कंपन्यांची चौकशी होणार 

                    महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी माजी सर्वाजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय कडक पावलं उचलणार असल्याची माहिती, भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे. लोकसभेत खासदार किरीट सोमय्या यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्नाला अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्तरादरम्यान ही माहिती दिली. तसंच भुजबळ यांच्याशी संबंधि कंपन्याही तातडीनं सील केल्या जातील, असं आश्वासनही मिळाल्याचं सोमय्या यांनी सांगितलं आहे. अंमलबजावणी संचालनालय पंकज भुजबळ, समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांच्यावर कडक कारवाई करणार असून त्यांची संपत्ती सील केली जाईल. शिवाय, 182 कंपन्यांची चौकशी करुन बोगस कंपन्यांवर कारवाई केली जाईल, अशीही माहिती सोमय्या यांनी दिली आहे.

५- डीडीसीएने बनावट कंपन्यांना पैसे दिले - किर्ती आझाद 

                    दिल्ली क्रिकेट संघटनेने बनावट कंपन्यांना कामाची कंत्राटे दिली. डीडीसीएने बनावट पत्ते असलेल्या कंपन्यांना कामाची कंत्राटे दिली. डीडीसीएने अनेक कंपन्यांना पैसे दिले पण त्यांच्या कामाचे स्वरुप स्पष्ट केले नाही. डीडीसीएचे सदस्य निविदांच्या किंमतीमध्येही फेरफार करायचे असे आरोप भाजप खासदार किर्ती आझाद यांनी रविवारी डीडीसीएतील घोटाळयांसंदर्भात त्यांनी पत्रकारपरिषद घेऊन अनेक आरोप केले. कुठलीही छाननी केल्याशिवाय कोटयावधी रुपयांची कंत्राटे दिली गेली. बिले मंजूर करताना कुठलीही बैठक झाली नाही. किर्ती आझाद यांनी डीडीसीएतील भ्रष्टाचार उघड करणारा एक व्हिडीओ दाखवला.

६- राहुल, सोनिया गांधी २०१६ मध्ये तुरुंगात जाणार -स्वामी 

                 नॅशनल हेराल्ड प्रकरणात पटियासा हाऊस कोर्टाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना काल जामीन दिल्यानंतर भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा म्हटलं की 'माता-पुत्र हे दोघं २०१६ मध्ये तरुगांत जातील असा मला विश्वास आहे.'  'मी ही केस २०१६ मध्ये जिंकेल. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना जेलमध्ये जावं लागेल.' असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.

७- काही जणांनी दगाबाजी केल्यामुळे शरद पवार पंतप्रधान बनू शकले नाहीत - सायरस पुनावाला 

८- तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी केंद्र सरकारकडे आणखी २ हजार कोटींची मदत मागितली 

९- बाजीराव-मस्तानी चित्रपटाविरोधात निदर्शने अयोग्य, चित्रपट पाहणे न पाहणे हा व्यक्तिगत प्रश्न -शरद पवार यांचे पुण्यात वक्तव्य 
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- अहमदनगर - शनिशिंगणापूरमध्ये शनीच्या चौथऱ्यावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना सुरक्षारक्षकांनी अडवलं, चौकशी सुरु 

११- महेश मोतेवारांना सहकार मंत्रालयाचा दणका, ‘समृद्ध जीवन’ची सर्व खाती सील करण्याचे आदेश 

                        ‘समृद्ध जीवन’च्या महेश मोतेवारांना सहकार मंत्रालयानं दणका दिला आहे. महेश मोतेवार यांच्या समृद्ध ग्रुप कंपनीचे सर्व खाती तातडीनं सील करण्याचे आदेश दिले गेले आहेत. सहकार मंत्रालयाकडून याबाबत विशेष तपास सुरु होता. तो पूर्ण झाल्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत.  सेबीनं बंदी आणूनही 525 कोटींचा महसूल टीव्ही चॅनल्स आणि संलग्न बिझिनेसमध्ये गुंतवला. त्यामुळे मोतेवारांवर याआधीच एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली. दरम्यान, समृद्ध जीवन गृपनं विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचीही आरोप आहे. आर्थिक गुन्हे अन्वेशण विभाग याबाबत विशेष तपास करत असल्याचंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे

१२- बीडमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर अज्ञातांचा अॅसिड हल्ला, घरावर दगडफेक 

                     बीडमधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी गुंजाळ यांच्यावर काल अज्ञातांनी अॅसिड हल्ला केला. तसंच त्यांच्या घरवरही दगडफेक झाली आहे. या अॅसिड हल्ल्यातून नगरसेविका अश्विनी गुंजाळ या हल्ल्यातून सुदैवाने थोडक्यात बचावल्या. किरकोळ जखमी असल्यानं त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर कोण होते, कोणत्या उद्देशानं हा हल्ला झाला, याचा पोलीस कसून तपास करत आहेत.
सांगली : इस्लामपूरमध्ये प्रख्यात वृद्ध दाम्पत्याची चाकूनं भोसकून हत्या झाली आहे. 65 डॉ. प्रकाश कुलकर्णी आणि 58 वर्षीय डॉ, अरुणा कुलकर्णी यांची राहत्या घरी हत्या करण्यात आली. हत्येवेळी डॉक्टर दाम्पत्यांच्या घरात कुणीच हजर डॉ. प्रकाश कुलकर्णी यांचा मृतदेह बेडरुममध्ये, तर त्यांच्या पत्नीचा म्हणजे डॉ. अरुणा कुलकर्णींचा मृतदेह स्वयंपाकघरात आढळला. डॉ. प्रकाश कुलकर्णी फिजिशिअन, तर डॉ. अरुणा कुलकर्णी स्त्रीरोग तज्ज्ञ होत्या. दरम्यान, इस्लामपूर पोलिस या हत्येचा अधित तपास करत असून मारेकऱ्यांचा पकडण्यासाठी शहरात नाकाबंदी केली आहे. ही हत्या चोरीच्या उद्देशाने करण्यात आली आहे की अन्य कोणत्या कारणाने, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालं नाही.


१३- मुंबई : गँगस्टर अश्विन नाईकला अटक, 15 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांची कारवाई 
                         कुख्यात गँगस्टर अश्विन नाईकला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दादरमधील एका व्यापाऱ्याकडून 15 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली. दादरमधील एका व्यावसायिकाकडून अश्विन नाईक 15 लाखांची खंडणी मागत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर कारवाई करत दादर पोलिसांनी नाईकला अटक केली.

१४- ‘स्मार्ट सिटी’पेक्षा पाण्याचा प्रश्न सोडवा: उद्धव ठाकरे 

                        शहरं स्मार्ट करण्यापेक्षा लोकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवा, गावातील माता-भगिनींना जगण्यासाठी पैसे द्या, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. ते आज जळगावातील सभेत बोलत होते. स्वाती पिटले आत्महत्या प्रकणावरुनही उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. महात्मा फुलेंच्या महाराष्ट्रात मुलींना शिक्षणासाठी पैसे नाहीत, ही शरमेची बाब आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. “स्वाती पिटलेच्या आत्महत्येनंतर तातडीने परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना फोन करुन यावर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आणि 4 लाख 60 हजार विद्यार्थ्यांचा प्रवास शुल्क शिवसेनेच्या पुढाकाराने माफ झालं.”, असे सांगत उद्धव ठाकरेंनी दिवाकर रावतेंच्या निर्णयाचं कौतुक केलं.

१५- 'फेसबुक'वर लिहून शेतकऱ्याचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न 

                         17 नोंव्हेबरला 42 वर्षांचा शेतकरी श्रीकांत करवर कृषी योजनेची माहिती घेण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात गेले होते. वारंवार चकरा मारुन वैतागलेल्या श्रीकांतला बैठक सुरु असल्यामुळे तास-दोन तास थांबावं लागलं. संयम सुटल्यावर वैतागलेल्या शेतकऱ्याने केबिनमध्ये शिरुन अधिकाऱ्याकडे योजनेची माहिती मागितली. त्यावेळी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्त शिवारची बैठक सुरु होती. तहसीलदार माहिती घेत होते. मात्र तहसिलदारांना कृषी अधिकारी समजून श्रीकांत बोलत होता. त्यावेळी श्रीकांतने आवाज चढवल्याने तहसीलदारांना राग आला आणि त्यांनी दंडाधिकाऱ्यांचे अधिकार वापरुन पाच दिवसासाठी श्रीकांतची रवानगी जेलमध्ये केली. या शेतक-याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही की तो दारु पित नाही. त्यांची पाच एकर जमीन असून दोन मुले आहेत.शेतकरी शेतात वस्तीला आहे. अश्या शेतकऱ्याला सहजासहजी जामीन मिळू नये म्हणून तहसीलदारांनी चक्क क्लास वन अधिकाऱ्याची हमी आणण्याची अट टाकली होती. तशी हमी न मिळाल्याने श्रीकांतला सात दिवस जेलमध्ये काढावे लागले.

१६- पुणे घाऊक बाजारात तूरडाळीसह उडीद, मूगडाळ, मसूरडाळीचे दर क्विटंलमागे २०० ते ५०० रुपयांनी उतरले, महिना अखेरीस नवी तुरडाळ बाजारात येण्याची शक्यता 
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- लोहा; गोळेगाव येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या 

१८- हदगाव; भाटेगाव (उ) शिवारात कापुस वेचतांना महीलेचा विनयभंग; हदगाव पो.स्टे.मध्ये गुन्हा दाखल, आरोपीस अटक 
१९- सांगली : इस्लामपुरात वृद्ध डॉक्टर दाम्पत्याची चाकू भोसकून हत्या 
२०- जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील काकापोरा भागात दहशतवाद्यांने पोलिस चौकीवर ग्रेनेड हल्ला 
२१- आंध्रप्रदेशात विशाखापट्टणममध्ये भूस्खलनात ४ मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- तिसऱ्या रोलबॉल विश्वचषकात भारताचा विजय, इराणवर 6-3 ने मात 
२३- डेन्मार्कची फुटबॉलपटू मनमाडची  सून 

                       मनमाडच्या राहुल एळीजेचा विवाहसोहळा सातासमुद्रापार राहणाऱ्या डेन्मार्कच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू सिसिलिया
पीटरसनशी संपन्न झाला. दोघं वैदिक पद्धतीने लग्नबंधनात अडकले. सिसिलिया पीटरसन आणि राहुलची डेन्मार्कच्या आरुस विद्यापीठात ओळख झाली होती. आधी मैत्री आणि नंतर मैत्रीचं रुपांतर
प्रेमात झालं. अखेर दोघांनी विवाहबद्ध होण्याचा घेतलेला निर्णय प्रत्यक्षात आणला. मनमाड शहरातील गायकवाड चौकामध्ये राहणाऱ्या राहुलचे वडील रेल्वेत फीटर, तर आईही बाहेर मजुरी करायची.  परिस्थितीत राहुलने शिक्षण घेतलं. उच्च शिक्षणासाठी थेट परदेशात जाऊन पोहचला. राहुलच्या प्रबंधाला युरोपियन शिष्यवृत्ती मिळाली. तेथे त्याने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर छाप पाडली आणि तो डेन्मार्कच्या आरुस विद्यापिठात प्राध्यापकाची नोकरी करु लागला. योगाची आवड असल्याने त्याकडे सिसिलिया आकर्षित झाली आणि तिथूनच दोघांच्या मैत्रीचा प्रवास सुरु झाला आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि उभयतांनी लग्नाची गाठ बांधण्याचा निर्णय घेतला.

२४- बीएसएनएलकडून कॉल रेटमध्ये ८० टक्क्यांनी कपात 

                      सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनीने भारत संचार निगम लिमिटेड(बीएसएनएल)ने प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी नव्या वर्षाच्या आधीच गिफ्ट दिलेय. बीएसएनलने कॉल दरात ८० टक्क्यांची कपात केलीय. बीएसएनएलचे चेअरमन अनुपम श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली. कंपनीने नव्या ग्राहकांना कॉलदरात ८० टक्क्यांची घट करण्याचा निर्णय घेतलाय.  त्यामुळे प्रति मिनिट आणि प्रति सेकंदाच्या कॉल दरात  घट होणार आहे. ही सुविधा पहिल्या दोन महिन्यांसाठी देण्यात येणार आहे. बीएसएनएल घेणाऱ्या नव्या ग्राहकांना प्रति सेकंद प्लान घेण्यासाठी ३६ रुपये आणि प्रति मिनिटाचा प्लान घेण्यासाठी ३७ रुपयांचा रिचार्ज वाऊचर घ्यावा लागेल.

 २५- भारताच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याचं  तिस-यांदा शुभमंगल 

                          भारताच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन शेनन मेरी या आपल्या मैत्रीणीबरोबर विवाहबध्द झाल्याची चर्चा आहे. शेनन ही अझरुद्दीनची तिसरी पत्नी आहे. पॅरिसभ्रमंतीवरील दोघांचे फोटो लीक झाल्यानंतर २०१३ मध्ये सर्वप्रथम या दोघांची मैत्री समोर आली होती.  अझरच्या गाडीचा वाहन चालक जान मोहम्मदचं सप्टेंबरमध्ये एका अपघातत निधन झाले. त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी अझर शनिवारी शामली इथे गेला होता. त्यावेळी अझरचे हे नवीन नाते उघड झाले. अझरसोबत शेननही जान मोहम्मदच्या घरी गेली होती. त्यावेळी अझरने शेननची ओळख पत्नी म्हणून करुन दिल्याचे तिथे उपस्थित असलेल्यांनी सांगितले. शेनन मूळची अमेरिकन असून सध्या ती दिल्लीमध्ये वास्तव्याला आहे.

~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२६- दि. १० जानेवारीला विवाहयोग्य महेश्वरी युवक-युवती संमेलन
http://goo.gl/fPtQwU
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
लोकांनी आरसा कधीच पाहीला नसता, जर आरश्यात चित्रा ऐवजी चारित्र्य दिसले असते
[आकाश पेटकर, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
*  *  *  *  *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी, [नोव्हेंबरमधील नोंदीनुसार]
डिसेंबरमध्ये अड्ड झालेल्या सर्व ग्रुपचे स्वागत
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
 १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: