' जनता विकास मंचाचे राहुल लोहबंदे यांनी दिली माहीती '
मुखेड :- रियाज शेख
शहरातील राज्य महामार्गावर एसटी बस स्टाँप, पोलिस चौकी समोर अवैध वाहतुक करणा-या काळी-पिवळी जिप, अँटो, प्रवासी ट्रवल्स मुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. पोलिस प्रशासन फक्त बघ्याची भुमिका घेत आहे. यागाड्यामुळे येणा-या - जाणा-या नागरिकांना याचा त्रास होत असल्यामुळे जनता विकास मंचाच्या वतीने जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे यांच्या नेतृत्वामध्ये दि.21 डिसेंबर 2015 रोज सोमवारी "रास्ता रोको" आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती माजी नगरसेवक राहुल लोहबंदे यांनी दिली.
शहरातील प्रमुख मार्गावर एसटी बस स्टँड व पोलिस चौकी सह लोखंडे चौक ते डाँ.आंबेडकर स्मारकपर्यंत अवैध प्रवासी वाहतुक करणा-या काळी- पिवळी जीप, अँटो, टँव्हल्स चालकांनी मनमानी पध्दतीने रस्त्याच्या मध्यभागी कोठेही गाड्या थांबा करत वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत. याबाबत विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी लेखी व तोंडी तक्रार पोलिस स्टेशन मध्ये करुन सुध्दा कोणताच परिणाम झाला नाही. नागरिकांना विशेष महिला, शाळकरी विद्यार्थींना या वाहतुकीच्या कोंडीमुळे प्रचंड त्रास होत आहे. याकडे पोलिस प्रशासन जाणुन बुजुन कानाडोळा करत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी जनता विकास मंचातर्फे सोमवारी दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता पोलिस चौकी समोर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे सांगीतले. यावेळी माजी नगरसेवक राहुल लोहबंदे, महिला आघाडी प्रमुख मथुराबाई पुठ्ठेवाड, भद्रे, शेख गौस, बालाजी बनसोडे, कांबळे, गोणारकर, गौतम कांबळे, गवळे आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment