Thursday, 24 December 2015

नमस्कार लाईव्ह २४-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २४-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- ब्राझीलमध्ये महिलांना गर्भवती न होण्याचे आदेश 

                    ब्राझीलमध्ये महिलांना काही दिवसांसाठी गर्भवती न होण्याचे आदेश दिलेत. यावर्षी ब्राझीलमध्ये २४०० नवजात बालकांमध्ये विचित्र आजार आढळून आला. या आजारामुळे या बालकांच्या मेंदूवर मोठा परिणाम झालाय. तसेच यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीवर थेट परिणाम झालाय.ब्राझीलच्या स्वास्थ विभागाने दिेलेल्या माहितीनुसार, डासांमुळे हा आजार झाल्याचे समजतेय. २०१४मध्ये १४७ बालकांना हा आजार झाला. यामुळेच आजाराचा प्रार्दुभाव अधिक न होण्याच्या दृष्टीने हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये जे पती-पत्नी मुलाबाबत विचार करत असतील तर काही काळासाठी हा निर्णय लांबवण्याचे आदेश ब्राझील सरकारने दिलेत.

२- सौदी अरेबियातील जझान येथे एका हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत २५ जण ठार तर १०७ जण जखमी 
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- मोदीजी, क्या हुआ तेरा वादा : राहुल गांधी 

              मी खाणार नाही आणि खाऊ देणार नाही, असं म्हणणारे पंतप्रधान मोदी हे अरुण जेटलींबाबत गप्प का, असा सवाल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारला आहे. दिल्ली क्रिकेट असोसिएशनमधल्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींवर आरोप करणाऱ्या कीर्ती आझाद यांना भाजपमधून निलंबित करण्यात आलं आहे. त्यावरून राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे.

४- शहीद जवानाच्या पत्नीच्या केलेल्या प्रश्नानं गृहमंत्री निरुत्तर 

                   मंगळवारी सकाळी लष्कराचं सुपर किंग विमान कोसळून 10 जवान शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आले होते. मंत्री महोदय शहीद जवानांच्या कुटुंबियांचं सांत्वन करत होते. त्यावेळी एका जवानाची पत्नी पुढं आली.‘जवानांनसाठी एवढं जुनं विमान दिलंच कसं?’ असा थेट जाब तिने गृहमंत्र्यांना विचारला. शहिदाच्या पत्नीनं विचारलेल्या प्रश्नांवर गृहमंत्र्यांकडे काहीच उत्तर नव्हतं. उत्तर असणारं तरी कसं? कारण आजही भारतीय लष्करातील जवानांना निकृष्ट युद्ध सामुग्री वापरावी लागते हे सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे. मंगळवारी कोसळलेलं सुपर किंग विमान देखील जुनं होतं. त्या ताफ्यातली काही विमानं तर लिलावातही काढण्यात आली आहे. लष्करातील किती जवानांना निकृष्ट युद्ध सामुग्रीमुळे जीव गमवावा लागला आहे याची आकडेवारी कधीच जाहीर होत नाही.

५- रेल्वेचा दणका, तत्काळ तिकीटात 25 ते 100 रुपये वाढ 

                 भारतीय रेल्वेने प्रवाशांचा खिसा कापण्याची तयारी केली आहे. कारण रेल्वेच्या तात्काळ तिकीट दरात भरघो, वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत आहे. उद्या म्हणजे 25 डिसेंबरपासून ही दरवाढ लागू होईल.स्लिपरच्या तत्काळच्या तिकिटासाठी 175 रूपयांऐवजी 200 रु. द्यावे लागतील. तर स्लिपर तिकिटाचं कमीत कमी तात्काळ शुल्क 90 रुपयांवरून 100 रुपये करण्यात आलं आहे. मात्र सेकंड क्लास तिकिटावर प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवासांना यामधून सूट देण्यात आली आहे.

६- नव्या वर्षात खासदारांना दुप्पट पगाराचं गिफ्ट 

                  पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन गोंधळ घालून देशाच्या तिजोरीला खड्डा पाडणाऱ्या खासदारांचे पगार नव्या वर्षात दुपटीनं वाढण्याची शक्यता आहे. संसदीय कार्यमंत्रालयानं खासदारांच्या मूळ वेतनात 100 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवलाय.  खासदारांना मिळणाऱ्या मतदारसंघ भत्त्यातही दुपटीची वाढ सुचवण्यात आलीय. शिवाय सचिवांच्या भत्त्त्यासाठी दिल्या जाणारी रक्कमही लवकरच दुप्पट होण्याची शक्यताय.  हे प्रस्ताव सध्या अर्थमंत्रालयाच्या विचाराधीन आहेत. प्रस्ताव जसाच्या तसा मान्य झाला, तर खासदारांना मिळणारं सध्याचं एक लाखाचं वेतन थेट दोन लाख ८० हजारांच्या घरात जाऊन पोहचणार आहे. याशिवाय संसदीय कार्य मंत्रालयानं खासदारांना मिळणारी पेन्शन २० हजारावरून ३५ हजारावर नेण्याच्या संसदीय समितीच्या शिफारसीलाही मान्यता दिलीय.

७- पक्षाने किर्ती आझाद यांच्यासारखा प्रामाणिक माणूस गमावता कामा नये- सुब्रमण्यम स्वामी 

८- मी भाजपामध्ये २२ वर्ष काढली आहेत. मोदीजींनी याप्रकरणात लक्ष घालावं आणि माझं काय चुकलं हे मला सांगावं - किर्ती आझाद 

९- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पुढील महिन्यात इस्रायल व पॅलेस्टाईनच्या दौ-यावर जाण्याची शक्यता 
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, तसेच रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या यांना सम-विषम क्रमांकांच्या गाड्यांच्या नियमातून सूट - केजरीवाल 

११- मुंबई लोकलमध्ये अंध मुलीची छेडछाड, तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ 

                  निकीता शुक्ला चर्चगेटहून लोकलमध्ये बसली. पण त्यावेळी काही तरुणांनी तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. निकीतानं मोठ्या जिद्दीनं या तरुणांचा विरोध केला. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अखेर या मुलांची तक्रार करण्यासाठी निकीता अंधेरी स्टेशनला उतरली. मात्र, रेल्वे पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही आणि निकीताला खार पोलीस स्टेशनध्ये जायला सांगितलं. खार पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतलीय. पण या सगळ्यात निकिताला मनस्ताप सहन करावा लागला. साई क्रिष्णा असं या १९ वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. तो अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला शिकत होता. काल रात्री हा विद्यार्थी अभियांत्रिकीच्या होस्टेलच्या तीसऱ्या मजल्यावर असलेला एका गॅलरीतून दूसऱ्या गॅलरीत उडी मारण्याचा प्रयत्न करत होता.मात्र त्यात त्याचा तोल गेला अन् तो सरळ खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

१२- दिल्लीच्या शहाबाद डायरी भागात शाळेच्या बसने तीन वर्षाच्या मुलाला चिरडले, संतप्त जमावाने बस पेटवली, पीसीआर व्हॅनवर दगडफेक केली. 
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- स्टंटबाजीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृत्यू 

१४- ठाण्यात क्रिकेटच्या वादातून एकाची हत्या, दोघांना अटक 

                    एकता नगर परिसरात राहणारा बारा वर्षांचा रेहमान खान आणि त्याचा मित्र रेहमत अली हे क्रिकेट खेळत होते. खेळता खेळता त्या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून भांडण झालं. या भांडणाचा जाब विचारण्यासाठी रेहमान खानचे वडील मकबूल खान हे रेहमान अलीच्या घरी गेले. मात्र समजूतीनं भांडण सोडवण्याएवजी प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचलं. रेहमान अलीच्या घरात उपस्थित असलेल्या मोहब्बत आणि रिजवान अली यांनी मकबूल खान यांनी गंभीर मारहाण केली. त्यात मकबूल खान यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असता मोहब्बत आणि रिजवान यांना अटक करण्यात आली असून त्यांना 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

१५- पत्नीची छेड काढणार्‍या तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या 

                   मुंबईमधील चुनाभट्टीमध्ये एका तरुणानं आपल्या पत्नीची छेड काढणार्‍या एका युवकाची भर रस्त्यामध्ये कोयत्यानं वार करून हत्या केलीये. त्यानंतर पळून न जाता तो स्वत:हून पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी त्याला अटक केलीये. श्रीनिवास लक्का असं त्याचं नाव आहे. श्रीनिवास चुनाभट्टीमधल्या आझाद गल्लीत पत्नीसोबत गेल्या 6 महिन्यांपासून राहत होता. त्याच परिसरात राहणारा मनोज सरकन्या हा गेल्या 2-3 महिन्यांपासून श्रीनिवासच्या पत्नीकडे वाईट नजरेनं बघत होता, नंतर तिची छेड काढायलाही त्यानं सुरुवात केली. त्यावरून श्रीनिवासनं मनोजला समजावलंही होती. पण मनोजनं आपला उद्योग सुरूच ठेवला. त्यामुळे संतापलेल्या श्रीनिवासनं मंगळवारी संध्याकाळी रस्त्यातच मनोजच्या मानेवर, हातावर आणि पूर्ण शरीरावर कोयत्यानं 17 वार केले. त्यात मनोज जागीच ठार झाला. हत्येनंतर श्रीनिवास याने स्वतःहा चुनाभट्टी पोलिसांत जाऊन या घटनेची माहिती पोलिसांना दिली. आरोपी श्रीनिवासला पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय नायकवाडी यांनी दिली.

१६- पुणेः मुळशी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष विजय मिरघेची हत्या 

१७- कल्याण - सूचक नाका परिसरातील प्लॅस्टिक गोदामाला आग लागली असून घटनास्थळी अग्निशामक दलाच्या २ गाड्या पोहचल्या आहेत, आग विझवण्याचा प्रयत्न सुरू 

~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- 'ट्राय'कडून फेसबुकच्या 'फ्री बेसिक्स' सुविधेला चाप 

                 भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने फेसबुकच्या मोफत इंटरनेट सेवेला झटका दिला आहे. ‘फ्री बेसिक्स’ लागू करण्यासाठी फेसबुकने रिलायन्सशी करार केला होता. मात्र ‘ट्राय’ने रिलायन्सला पत्र लिहून ‘फ्री बेसिक्स’ला व्यावसायिक रुप देण्यास नकार दिला. ट्रायच्या निर्णयाचा आदर करतो, असं रिलायन्सने म्हटलं आहे. तर मोफत इंटरनेट सेवा कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे. भारतात इंटरनेट पॅक महागल्यामुळे फेसबुक युझर्सना ‘फ्री बेसिक्स’  ही सुविधा देऊ इच्छित आहे. मात्र ‘फ्री बेसिक्स’ हे नेट न्यूट्रॅलिटीच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करत असल्याचा आरोप होत आहे. एकाच कंपनीच्या हितासाठी ही सुविधा का, असा सवाल टीकाकारांनी केला आहे. दुसरीकडे 36 देशांत ‘फ्री बेसिक्स’ सुविधा असल्यामुळे जगभरातील दीड करोड लोक इंटरनेट वापरत असल्याचं फेसबुकने म्हटलं आहे.

१९- उत्तरेकडून येणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे, राज्यातील काही मुख्य शहराचं तापमाण [सेल्सिअस अंशात] नाशिक ६, पुणे ९.८, जळगाव १०, औरंगाबाद १३, महाबळेशवर १४, सोलापूर १६.७ 
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२०- लोहा; धमकी देवून महिलेवर अत्याचार; पिता पुत्राला अटक 
२१- ग्राहकांनी हक्काबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवावी - जिल्हाधिकारी काकाणी 
२२- भू-विकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची उर्वरित ३४ लाख रक्कम तत्काळ भरण्याचे आदेश 
२३- १० हजार सापांना जीवदान देणार सर्पमित्र विजयकुमार उपेक्षितच 
२४- नांदेड मध्यवर्ती बसस्थानकाच्या छतावर होताहेत ओल्या पार्ट्या 
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२५- पहा व्हिडिओ : रशियात पंतप्रधान मोदी राष्ट्रगीताला स्तब्ध उभं राहणंच विसरले
http://goo.gl/P4Qogn
~~~~~~~~~~~~~~~
२६- हिंगोली तालुक्यातिल खंडाळा येथील जि प प्राथमिक शाळेतील शिक्षकाचे दारूच्या नशेत 8 वर्षीय विद्यार्थिनिसोबत अश्लील चाळे
http://goo.gl/K3l7gW
~~~~~~~~~~~~~~~
२७- मुंबई - काझीपेत- मुंबई विशेष रेल्वेगाडीच्या फेऱ्यात जानेवारी महिन्यात वाढ
http://goo.gl/COUKbe
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कामगिरी होय
[शिल्पा सरपाते, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हवर नोंदवा आपले मत, खालील लिंकला क्लिक करून--
प्रश्न;- नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कॉंग्रेस दोषी आहे असे वाटते का?
A] होय
B] नाही
C] सांगता येत नाही
http://goo.gl/wMLuSZ
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
प्रोटीन >> आपल्या शरीराला दररोज आपल्या वजनाइतके प्रोटीनचि आवशकता असते. ते आपल्या आहारातून परिपूर्ण भेटत नाही. त्याची कमतरता भरून काढण्यासाठी
वेटगेनर >> मुले-मुली, पुरुष-महिला सर्वकाही आहार घेवून सुद्धा त्यांचे वजन वाढत नाही. ते काटकुळे व बारीक असतात. त्यांच्यासाठी उपयुक्त
फॅट बर्न >> चरबी कमी करणे व शरीराचे वजन कमी करणे. जे व्यक्ती आहार कमी घेवूनसुद्धा वजन कमी होत नाही त्यासाठी उपयुक्त [लवकर वजन कमी करते]
मल्टी व्हिटामिन्स >> आपल्या रोजचा आहारात परिपूर्ण व्हिटामिन्स, मिनरल्स, भेटत नाहीत त्याची कमतरता भरून काढण्यासाठी
एनर्जी ड्रिंक >> सर्व वयोगटातील खेळाडू, जिम करणारे, रिकव्हरी, स्ट्रेंग्थ, उर्जा वाढविण्यासाठी उपयुक्त. याचा वापर कोणीही करू शकते.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
*  *  *  *  *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
।।  आपला सहभाग..आईला साद ।।
"आई कलामहोत्सव,औरंगाबाद"
पेंटीग,कॅलिग्राफी,फोटोग्राफी,कविता आपण या कलामहोत्सवासाठी पाठवु शकता.
प्रत्येक विभागातुन अनुक्रमे प्रथम पारितोषिक- ५००१/-, ३००१/-, २००१/- व १००१/- रु.
पाच पारितोषिके, स्मृतिचिन्ह, प्रमाणपञ.
सहभागी कविंच्या कवितेचे पुस्तक महोत्सवातील प्रदर्शनादरम्यान पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रकाशित होईल.
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारिख: ३१ डिसेंबर २०१५.
संपर्क -
महेश ढाकणे,
आयोजक,आई कलामहोत्सव,
औरंगाबाद २०१६
मो. - 9503204201
अधिक माहितीसाठी लिंक क्लिक करा
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_569.html
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी, [नोव्हेंबरमधील नोंदीनुसार]
डिसेंबरमध्ये अड्ड झालेल्या सर्व ग्रुप स्वागत
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
 १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: