Saturday, 26 December 2015

सिध्‍देश्‍वर मंदीर परिसराचा तीर्थक्षेत्र विकास निधीतून विकास करु - जि. प. सदस्‍या वर्षाताई भोसीकर




[विठ्ठल कत्रे, प्रतिनिधी]


           नांदेड,26- पानभोसी येथील सिध्‍देश्‍वर मंदीर परिसराचा तीर्थक्षेत्र विकास निधीतून विकास करण्‍यात येईल, असे प्रतिपादन जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर यांनी केले. कंधार तालुक्‍यातील पानभोसी येथे मंदीर परिसराच्‍या सुशोभिकरण कामाच्‍या शुभारंभ प्रसंगी त्‍या बोलत होत्‍या.
      यावेळी गुरु गयबी नागेंद्र महाराज, संजय भोसीकर, लोहा पोलीस स्‍टेशनचे पोलीस निरिक्षक सुभाष राठोडसहाय्यक गट विकास अधिकारी सुनिल मुनाळेप्राचार्य राजेंद्र भोसीकरमिनी बिडीओ गोविंद मांजरमकरमिनी बिडीओ अरुण गोडसेसरपंच सौ.सुवर्णा नाईकवाडे, बालाजी भातमोरे, मन्‍मथ नाईकवाडे, पोलीस पाटील शेख इमाम, शिवअप्‍पा स्‍वामी, निळकंठ भोसीकर आदींची उपस्थित होती.
      सिध्‍देश्‍वर महादेव मंदीर हे तीर्थक्षेत्राच्‍या यादीत असून या मंदीर परिसराचा विकास करुन पंचक्रोशीत या देवस्‍थानाचे महत्‍व भाविकापर्यंत पोहोचू असे मत, जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर यांनी व्‍यक्‍त केले. याप्रसंगी मंदीर परिसरामध्‍ये पेव्‍हर्स ब्‍लॉक बसविणे व इतर सुशोभिकरणाचा शुभारंभ यावेळी करण्‍यात आला. गंगाधर जोंधळे, ग्रामसेवक देवकत्‍ते यांच्‍यासह ग्रामस्‍थांची यावेळी उपस्थिती होती.  

No comments: