Wednesday, 30 December 2015

2 जानेवारी रोजी नांदेडमध्‍ये तालुकास्‍तरीय वक्‍तृत्‍व स्‍पर्धा



             नांदेड, 30, स्‍वच्‍छताक्षेत्रात युवकांचा सहभाग घेण्‍यासाठी राज्‍य शासनाच्‍या पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाच्‍या वतीने स्‍वच्‍छतामित्र वक्‍तृत्‍व करंडक स्‍पर्धेचं आयोजन करण्‍यात येते.
कनिष्‍ठ व वरिष्‍ठ महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी तालुकास्‍तरीय वक्‍तृत्‍व करंडक स्‍पर्धा घेण्‍यात येणार आहे. येत्‍या 2 जानेवारी रोजी नांदेड पंचायत समितीमध्‍ये सकाळी अकरा वाजता तालुकास्‍तरीय स्‍पर्धा घेण्‍यात येणार आहेत. तरी तालुक्‍यातील सर्व महाविद्यालयांनी सहभाग घ्‍यावा असे आवाहन गट विकास अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे यांनी केले आहे.
या स्‍पर्धेसाठी कनिष्‍ठस्‍तरावरील महाविद्यालयीन युवकांसाठी विषय पुढीलप्रमाणे  1) विचार निर्मल महाराष्‍ट्राचा प्रवास आव्‍हानांचा 2) जोश तरुणाईचा, जागर स्‍वच्‍छतेचा 3) शुध्‍द पाणी पिण्‍याचे, आरोग्‍य सांभाळी गावाचे 4) माझ्या स्‍वप्‍नातील स्‍वच्‍छ निर्मल गाव 5) आपलं पाणी  आपली योजना व वरिष्‍ठस्‍तरावरील महाविद्यालयीन युवकांसाठी विषय पुढीलप्रमाणे  1) राखू पाण्‍याची गुणवत्‍ता, मिळेल आरोग्‍याची सुबत्‍ता 2) लोकसहभाग गावाचा- आधार पिण्‍याच्‍या स्‍वच्‍छ पाण्‍याचा 3) तरुणाईच्‍या हाती स्‍वच्छतेच्‍या ज्‍योती 4) मी निर्मल गावचा सरपंच बोलतोय 5) स्‍वच्छतेतून  समृध्‍दीकडे हे स्‍पर्धेसाठी विषय असणार आहेत.

No comments: