नमस्कार लाईव्ह ३०-१२-२०१५ चे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- जगात वर्षभरात ११० पत्रकारांची हत्या
मावळत्या वर्षात जगभरात ११० पत्रकारांची हत्या करण्यात आली. यापैकी बहुतांश जणांना शांततामय देशात ठरवून लक्ष्य करण्यात आले, असे ‘रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स’ने (आरएसएफ) मंगळवारी येथे सांगितले. आरएसएफने आपला वार्षिक अहवाल सादर करताना म्हटले की, यंदा ६७ पत्रकार ड्यूटीवर असताना मारले गेले, तर ४३ जणांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याशिवाय २७ सिटीजन जर्नालिस्टही मारले गेले आहेत. माध्यम कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना अपयशी ठरल्याचे यातून प्रतिबिंबित होते. अहवालामध्ये संयुक्त राष्ट्राला पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतात २०१५ च्या प्रारंभीपासून नऊ पत्रकार ठार झाले आहेत. यातील काहींना संघटित गुन्हेगारी आणि राजकीय नेत्यांशी संबंधित वृत्तांकन करताना, तर इतरांना अवैध उत्खननाचे वार्तांकन करताना प्राण गमवावे लागले.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- अमित शाह दुसऱ्यांदा भाजपाध्यक्ष होण्याची शक्यता
भाजपच्या अध्यक्षपदावर अमित शाह यांची दुसऱ्यांदा वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. अध्यक्ष पदासाठी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात निवड करण्यात येणार आहे. 4 जानेवारीनंतर भाजपची संसदीय समिती निवडणुकीची तारीख निश्चित करणार आहे. अमित शाह यांची जवळपास दुसऱ्यांदा निवड निश्चित मानली जाते आहे. उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणुकीत भरघोस जागा निवडून आणण्यात अमित शाह यांचा मोलाचा वाटा होता. त्यानंतर त्याची अध्यक्षपदावर निवड करण्यात आली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या बिहार, दिल्ली या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर अमित शाह यांची खुर्ची धोक्यात आल्याचं बोललं जात होतं. मात्र दिल्लीतल्या नेत्यांकडून अमित शाह यांना पुन्हा पसंती मिळल्याचं समजतं आहे.
३- दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अभिनेता अक्षय कुमारची थेट मदत
उस्मानाबाद : हिंदी चित्रपट सृष्टीतील नवा सुपरस्टार अक्षय कुमार याने दुष्काळग्रस्तांनाही मदतीचा हात पुढे केला. त्यांने थेट त्यांच्या बॅंक खात्यात ५० हजार रुपये जमा केलेत. अक्षयने उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयाना प्रत्येकी ५० हजारांची मदत केली. त्याने स्थानिक पातळीवरून ३० शेतकऱ्यांची निवड करून त्यांना थेट धनादेशाच्या माध्यमातून बॅंकामध्ये पैसे जमा केलेत. याआधी अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील २० शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत पोहोचली असून दहा जणांना काही तांत्रिक अडचणींमुळे ती मिळालेली नाही. मात्र त्यांनाही ही मदत लवकरच मिळणार असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. नांगरे पाटील यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून अक्षय कुमार याने ही मदत दिलेय. सामाजिक बांधिलकी जपत अक्षय कुमारने मदतीचा हात पुढे केला. दरम्यान, उर्वरित १० शेतकरी कुटुंबीयांचे राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये खातेच नसल्याने ती रक्कम त्यांना देता आलेली नाही. बॅंकेचे खाते उघडल्यानंतर संबंधित कुटुंबांना ही मदत देण्यात येणार आहे.
४- 'समृद्ध जीवन’च्या 45 कार्यालयांवर सीबीआयचे छापे, मोतेवारला पोलीस कोठडी
समृद्ध जीवन चिटफंड घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी महेश मोतेवार याच्या भोवतीचा फास आज (मंगळवारी) आणखी आवळला गेला.गुंतवणुकदारांना कोटय़वधींचा गंडा घातल्याप्रकरणी महेश मोतेवार यांच्या समृद्ध जीवनच्या एकुण 45 कार्यालयांवर आज सीबीआयने छापे टाकले. महाराष्ट्रासह ओडिशामध्ये छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळाली.‘समृद्ध जीवन’च्या पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि सोलापूरमधील 58 कार्यालयांवर कारवाई करण्यात येणार असून, त्यापैकी 45 कार्यालयांवर आज छापे टाकण्यात आले आहे. सीबीआयचे अधिकारी कार्यालयांमध्ये विविध कागदपत्रांची छाननी करीत आहेत. दरम्यान, फसवणुकीच्या एका गुन्ह्यात महेश मोतेवार याला काल (सोमवारी) उस्मानाबाद पोलिसांनी पुण्यातून अटक केली. त्याला आज (मंगळवारी) दुपारी उमरगा न्यायालयात हजर करण्यात आले होतं. न्यायालयाने मोतेवारला 31 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्या. एच. आर. पाटील यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी न्यायालयाकडे सात दिवसांची कोठडी मागितली होती.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
५- ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचं निधन
ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचं मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं आहे. मनाचा ठाव घेणारे शब्द, प्रेमभावना ओतप्रोत भरलेलं काव्य अशी वैशिष्ट्य असणाऱ्या महाकवीने वयाच्या 86 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सायनमधील राहत्या घरी सकाळी 9 वाजता मंगेश पाडगावकरांनी अखेरचा श्वास घेतला. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, सांगा कसं जगायचं, जेव्हा तुझ्या बटांना यासारख्या पाडगावकरांच्या अनेक कवितांना रसिक वाचकांचं प्रेम लाभलं होतं. धारानृत्य, जिप्सी, भोलानाथ यासारख्या अनेक कवितासंग्रहांमुळे ते आबालवृद्धांचे लाडके झाले. पाडगावकरांची काव्यवाचनाची विशिष्ट शैली अनेकांना भावत असे.
६- मंगेश पाडगावकर यांचे पार्थिव आज दुपारी १२ ते ३ या वेळेत त्यांच्या निवासस्थानी अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार
७- कोल्हापुरात सतेज पाटील विजयी, महादेव महाडिक पराभूत
८- दोन्ही ‘भाई’ जिंकले ; कदम, जगताप विधानपरिषदेवर
९- मुंबई; ऑर्केस्ट्राच्या नावे अवैध धंदे, मुंबईत लोटस बारमधून 24 जणी ताब्यात
मुंबईत अंधेरीतील लोटस बारवर रात्री पोलिसांनी छापा टाकला आहे. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली बारमध्ये अवैध धंदे सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. या कारवाई दरम्यान 24 तरुणींना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. ऑर्केस्ट्रामध्ये फक्त 4 जणी असतात मात्र याठिकाणी 12 तरुणी असल्याचं आढळून आलं. मात्र त्यांच्या व्यतिरिक्त आणखी तरुणी असल्याचा संशय आल्यानंतर पोलिसांनी बारची झाडाझडती सुरु केली आणि त्यांना गुप्त खोली सापडली होती. तिथे लपलेल्या बारा जणींसह एकूण 24 जणींना ताब्यात घेतलं. एकूण चार तास चाललेल्या कारवाईनंतर पोलीसांनी लोटस बार सील केला आहे. मात्र बारचा मालक आणि मॅनेजर फरार असून त्यांचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
१०- थर्टी फर्स्टच्या तोंडावर मुंबईत 10 लाखांची बनावट दारु जप्त
ब्रॅन्डेड कंपनीच्या बॉटल्समध्ये बनावट दारु भरुन विकणाऱ्या टोळीला मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. तीन ते पाच हजार रुपयांच्या ब्रॅन्डेड कंपन्यांच्या व्हिस्की आणि बिअर अर्ध्या किमतीत विकल्या जात असल्याने अनेकांना याचा गंडा बसला आहे. विशेष म्हणजे झोपडपट्टीत ही दारु तयार होत असली तरी हिचे खरेदीदार हे उच्चभ्रु घरातील होते. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. यात तब्बल 10 लाखांची नकली दारु जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे सवणुकीसोबतच बनावट दारुमुळे आरोग्यासही अपाय होण्याची भीती वर्तवली जात आहे. दारुमध्ये सुगंधी पदार्थ मिसळले जातात, त्यानंतर त्याचं झाकण चिनी बनावटीचं वापरलं जातं. शिवाय ब्रॅन्डेड बाटल्यांमध्ये बनावट दारुची विक्री केली जात असल्यामुळे अनेकांची फसगत होते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- परळमध्ये एमटीएनल गोदामाला भीषण आग
शहरातील परळ येथील माऊली सदन परिसरात एमटीएनल गोदामाला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच १४ अग्निशमन गाड्या रवाना झाल्यात. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरु होते. एमटीएनल गोदामाजवळ असणाऱ्या मोबाईल टॉवरच्या जनरेटरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली. आगीने भीषण स्वरूप धारण केले होते. गेल्या दोन तासांपासून अग्निशमन दलाकडून ही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, अग्निशमन दलाला या आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
१२- स्टेशनवर चप्पला शिवणाऱ्या पवारांची ममता ठरली पहिली 'वीरबाला'
महापालिकेच्या मराठी शाळांना कालबाह्य ठरवणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही बातमी आहे. मुलुंडच्या गोशाळा मार्ग शाळेच्या एका विद्यार्थिनीची कामगिरी फक्त तिचीच नव्हे तिच्या शाळेची, तिच्या पालकांची आणि साऱ्या महाराष्ट्राची मान राष्ट्रीय पातळीवर उंचावलीय. ममता पवार असं या 'वीरबाले'चं नाव आहे. ममता महाराष्ट्रतली पहिली वीरबाला ठरलीय. राष्ट्रपती भवनात नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपती पुरस्कार रॅलीत राष्ट्रपतींच्या हस्ते तिला मानपत्र देण्यात आलं. ममतानं तिच्या शिक्षिका आणि गाईड कॅप्टन स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपतीपदकावर आपलं नाव कोरलंय. ममताचे वडील संतोष पवार मुलुंड स्टेशनवर गेली अनेक वर्ष चपला शिवण्याचं काम करतात... पण, आज मात्र त्यांचा उर आपल्या मुलीनं यशानं भरून आलाय. ममताला शिकवताना पवार कुटुंबाची आर्थिक ओढाताण होते... खरी पण तिला मिळालेल्या पुरस्कारानं त्यांचा सगळा शीण निघून गेल्याचं ते सांगतात. ममता मिळालेला 'वीरबाला' पुरस्कार मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षांचे अडथळे पार करताना साऱ्या देशातल्या मुलींशी स्पर्धा करावी लागते. बरं ममताचं यश फक्त स्काऊट आणि गाईड पुरतं मर्यादित नाही... अभ्यासातही तिला नंबर वरचा आहे. कुठल्याही खासगी शिकवणीशिवाय, तिनं दहावीत ८२ टक्के गुण मिळवलेत.
१३- इस्लामपूर बनेवाडी अत्महत्याप्रकरणी ४ सावकारांविरुद्ध गुन्हा
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१४- मोबाईल चोरणारी शिक्षिका पोलिसांच्या ताब्यात
१५- भाजपचा शहराध्यक्ष होण्यासाठी पोकर्णा यांची वायफळ बडबड - माजी सभापती किशोर स्वामी
१६- झेड्पित माळेगाव यात्रा नियोजनासाठी विभागनिहाय निधीचे वाटप
१७- वैद्यकीय सेवा शुल्कवाढीविरोधात कॉंग्रेस करणार आंदोलन - खा. अशोकराव चव्हाण
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिले असे नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळत ज्याची अपेक्षा आपल्याला कधीच नसते, यालाच आपम केलेल्या कार्याबद्दल मिळालेला आशीर्वाद असे म्हणतो
[डॉ. वर्षा चौरे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
संजय भोसीकर, प्रदीप सक्कारगे, विनोद वाचेवाड, रामेश्वर नुच्चे, महेश शिंदे, सचिन बैलान्वर, सतीश महामुनी, दत्तात्रय प्रतापवार, आयुष मुंदडा, इम्रान शेख, अतिश कावळे,
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
प्रोटीन >> आपल्या शरीराला दररोज आपल्या वजनाइतके प्रोटीनचि आवशकता असते. ते आपल्या आहारातून परिपूर्ण भेटत नाही. त्याची कमतरता भरून काढण्यासाठी
वेटगेनर >> मुले-मुली, पुरुष-महिला सर्वकाही आहार घेवून सुद्धा त्यांचे वजन वाढत नाही. ते काटकुळे व बारीक असतात. त्यांच्यासाठी उपयुक्त
फॅट बर्न >> चरबी कमी करणे व शरीराचे वजन कमी करणे. जे व्यक्ती आहार कमी घेवूनसुद्धा वजन कमी होत नाही त्यासाठी उपयुक्त [लवकर वजन कमी करते]
मल्टी व्हिटामिन्स >> आपल्या रोजचा आहारात परिपूर्ण व्हिटामिन्स, मिनरल्स, भेटत नाहीत त्याची कमतरता भरून काढण्यासाठी
एनर्जी ड्रिंक >> सर्व वयोगटातील खेळाडू, जिम करणारे, रिकव्हरी, स्ट्रेंग्थ, उर्जा वाढविण्यासाठी उपयुक्त. याचा वापर कोणीही करू शकते.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
नोकरी पेक्षा उद्योग बरा स्वतःचा व्यवसाय सुरु करा
स्वयंचलित चहा, कॉफी,मसाले दूध बनविण्याचे मशिन बसवा व हजारो कमवा
50% पर्यंत नफा
गॅस,चूल दूधाची आवश्यकता नाही
1 मिनिटात 5 कप तयार
बटन दाबा चहा, कॉफी,मसाले दूध मिळवा
संपर्क
8975307470,
9890098265
https://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_124.html
*****************
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment