मुखेड :- रियाज शेख
मातोश्री भीमाई व्याख्यानमाला संयोजन समितीच्यावतीने 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता कोत्तावार आँईल मील बा-हाळी रोड येथे पुणे येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा सुप्रसिद्ध वक्ते डाँ.रामचंद्र देखणे हे " ज्ञानदेवे रचिला पाया! तुका झालासे कळस! " या विषयावर मातोश्री भीमाई व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ नेते माधवराव पाटील बेटमोगरेकर हे उपस्थित राहणार असुन प्रमुख अतिथी म्हणुन आ.डाँ.तुषार राठोड यांची उपस्थिती राहणार आहे.
महात्मा गांधी मिशनचे उपाध्यक्ष तथा इंडियन मेडिकल कौन्सिलचे सदस्य डाँ.पी.एम.जाधव यांचा यावेळी विशेष सन्मान संयोजन समितीच्या वतीने आयोजीत केला आहे. मुखेड येथील सुप्रसिद्ध सर्पदंश चिकित्सक मुखेड भुषण डाँ.दिलीपराव पुंडे यांनी गेल्या चार वर्षापासुन आपल्या आईच्या स्मरणार्थ मातोश्री भीमाई व्याख्यानमालेस सुरुवात केली.
व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक मुखेड भुषण डाँ.दिलीपराव पुंडे, सौ. माला पुंडे, संजय पुंडे, डाँ.गौरव पुंडे, अभियंता कु.भक्ती पुंडे, यांच्यासह डाँ.वीरभद्र हिमगिरे, प्रा.डाँ.रामकृष्ण बदने, प्राचार्य देविदास केंद्रे, अनिल कोत्तावार, शिवाजी अंबुलगेकर, दादाराव आगलावे यांनी केले आहे.
--
धन्यवाद ............
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी आपल्या ग्रुप मध्ये 8975495656 हा नंबर अड्ड करा
No comments:
Post a Comment