Friday, 25 December 2015

परीसरात दोन दिवसापासून थंडीचा कडाका कायम... मनुष्यासह प्राणी मात्र हैराण



परीसरात दोन दिवसापासून थंडीचा कडाका कायम... मनुष्यासह प्राणी मात्र हैराण--

वार्ताहर पांगरा
व्हि, के,कतरे,पांगरेकर


                        नादेड जिल्हासह कंधार व लोहा तालुक्यातील उत्तरेकडून पश्चीमीय विक्षपीय वारे असल्याने वातावरणातील आर्द्रता वाढून जिल्हाभरात थंडीची लाट निर्माण झाली आहे. गत दोन दिवसापासून थंडीचा कडाका वाढल्याने मनुष्यासह प्राणी मात्र हैराण झाले असून, सकाळच्या प्रहरी थंडी, दुपारी कमी अधिक प्रमाण उन पडत असल्याने तापमानात कमी - अधिक प्रमाणात होत आहे. परिणामी सकाळच्या थंडीचे वा सुर्यकिरणांचा उबदारपणा घेण्यासाठी वन्य प्राणी मोकळ्या जागेवर गर्दी करताना तर मनुष्य शेकोट्यावर भर देत असल्याचे चित्र दोन्ही या तालुक्यात पाहवयास मिळत आहे. 

नादेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात माळेगाव येथे याञेसाठी महाराष्ट्रतुन भाविंक मोठ्या संख्येनी याञे साठी येतात, पण संध्या नांदेड जिल्हासह तालुक्यातही थंडीचे वातावरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.त्यामुळे याञेस येण्या-या भाविकांची मोठ्या प्रमाणात घट होण्याची संखेत या याञेसाठी येणा-या व्यापा-यातुन चर्चा केल्याची आयकावयास मिळत आहे ,

सध्याचे तापमान १४ अंशावर असून, सायंकाळी ४ वाजेपासूनच हुडहुडी भरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेकजण उबदार वस्त्रांचा पेहराव करून घराच्या बाहेर पडत आहेत. गरम आणि उबदार कपड्यांचे आच्छादन घालून फिरणारा मनुष्यप्राणी थंडीपासून बचाव करीत आहे. तर ग्रामीण भागातील ठीक - ठिकाणी शेकोट्या पेटवून गरम उब घेतांचे चित्र पहावयास मिळत आहेत. सकाळी १२ वाजेपर्यंत थंडीचा कडाका जाणवत असल्याने अनेकजण उशिराने कामाला लागत आहेत. परंतु रात्रंदिवस जंगलात आणि उघड्यावर फिरणार प्राणी हरिणाचे कळप, वानरांची टोळी, मोरांचे थवे, चिमण्यांचे थवे, सकाळी सहा वाजल्यापासून सूर्याच्या कोवळ्या किरणासाठी उघड्यावर रानावनात गर्दी करताना दिसून येत आहेत. वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी सूर्याच्या उबदार किरणांचा मोह वन्य प्रण्यानाही आवरता येत नसल्याने निसर्गाने प्रदान केलेल्या उन्हाचा आनंद घेताना अनेक वन्यप्राणी फेरफटका मारताना दिसत आहेत. गत दोन दिवसापासून थंडीत वाढ होत असून, याचा फायदा रब्बी पिकांना होणार असल्याने शेतकर्यांना उत्पादन वाढीची आशा वाढली आहे. या वर्षी अल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी खोल गेल्याने शेतक-याच्या चिंतेत भर पडला आहे,

No comments: