Sunday, 27 December 2015

नमस्कार लाईव्ह २७-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २७-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- चीन; महिलेला वाचवाताना हात गमावले, चीनमधील घटना कॅमेऱ्यात कैद 

              महिलेला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाला आपले दोन्ही हात गमावावे लागले, अशी धक्कादायक घटना चीनमध्ये घडली आहे. 11 व्या मजल्यावरुन पडणाऱ्या महिलेला वाचवताना ही घटना घडली.
11 व्या मजल्यावरुन पडणाऱ्या महिलेला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचे दोन्ही हात तुटल्याचा प्रकार चायनामध्ये समोर आला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आलेला आहे.चीनच्य़ा हुबेई प्रांतात हा प्रकार समोर आला. या सर्व प्रकारातली धक्कादायक गोष्ट म्हणजे एवढे प्रयत्न करुनही या महिलेचा मृत्यू झालाच. पण या तरुणालाही आपले दोन्ही हात गमावून बसावे लागले आहेत.

२- चीनमध्ये एक कुटुंब, एक मूल हे धोरण अधिकृतरित्या बंद झालं, येत्या एक जानेवारीपासून नव्या नियमानुसार दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी. 
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- राम मंदिर बनवा, देशाला आयसिसपासून वाचवा : प्रवीण तोगडिया 

                          भारतात आयसिसचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आणि देशाचा सीरिया होण्यापासून वाचवण्यासाठी राम मंदिर उभारणं गरजेचं असल्याचं वादग्रस्त विधान प्रवीण तोगडीया यांनी केलं आहे. विश्व हिंदू परिषदेच्या जबलपूरमधल्या वार्षिक बैठकीत त्यांनी हे मत व्यक्त केलं. संसदेत राम मंदिर बनवण्याचं विधेयक मंजूर झालं, तरच हे शक्य आहे, लवकरात लवकर हे विधेयक मंजूर व्हावं असंही तोगडियांनी म्हटलं आहे. भारतात हिंदू उपेक्षितांसारखा जगतोय, हिंदुंना कोणीही वाली नसल्याचंही तोगडियांनी यावेळी म्हटलं.  राम मंदिर उभारण्यासाठी संघाचेही जोरदार प्रयत्न आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही काही दिवसांपूर्वी हयातीतच राम मंदिर उभारण्याचा मानस व्यक्त केला होता.

४- महापुरुषांच्या समाधीस्थळांवर स्वच्छता मोहीम, मोदींचं देशवासियांना आवाहन 

                 नववर्षाचं स्वागत तोंडावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. आजच्या ‘मन की बात’मधून मोदींनी ख्रिसमस आणि नव-वर्षाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या.देशातलं पर्यंटन, त्यातून निर्माण होणारा रोजगार यावर नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातून भाष्य केलं. यावेळी 26 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील महापुरुषांच्या समाधीस्थळावर स्वच्छता मोहीम राबवण्याचं आवाहन देशवासियांना केलं. “केंद्र सरकार ‘स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया’ ही योजना देशवासियांसमोर मांडणार आहे. ही योजना कशी असेल, यामध्ये काय असेल, ही सर्व माहिती केंद्राकडून देण्यात येणार आहे. आयआयटी, आयआयआयएम, सर्व केंद्रीय विश्वविद्यापीठं, एनआयटी अशा सर्व संस्थांमधील तरुणांना या योजनेच्या माध्यमातून जोडले जाणार आहे.”, असे मोदींनी सांगितलं.

५- नवीन वर्षात जाहीर करणार ‘स्टार्टअप इंडिया’चा अॅक्शन प्लॅन- मोदी 

                पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. देशवायसियांना नाताळ आणि नववर्षाच्या शुभेच्छा देतानाच स्वच्छतेच्या मुद्यावरही त्यांनी भर दिला. देशातील युवकांसाठी ‘स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया’ या योजनेचा ऍक्शन प्लान येत्या 16 जानेवारीला जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली. तसंच या योजनेमुळे युवकांना मोठया संधी मिळाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.सध्या पर्यटनाचा काळ असल्याने जास्तीत जास्त स्वच्छता ठेवण्यावर भर द्यायला हवा. पर्यटनस्थळांवरील स्वच्छ वातावरणामुळे जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा उंचावण्यास मदत होणार असल्याचे मोदींनी यावेळी सांगितलं. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरील भाषणात ‘स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया’ या योजनेची घोषणा केली होती याची आठवण करून देत या महत्त्वकांक्षी योजनेचा आराखडा येत्या 16 जानेवारीला सादर करण्यात येणार आहे. या योजनेत देशातील युवकांना मोठी संधी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

६- बालगुन्हेगार वयाला विरोध:मानवी हक्क आयोग 

                बालगुन्हेगाराच्या वयात करण्यात आलेल्या सुधारणेला राष्ट्रीय मानवी हक्क अध्यक्ष न्यायाधीश के.जी. बालकृष्णन यांनी यास आपला विरोध असल्याचे सांगितले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना बालकृष्णन म्हणाले, ‘आयोगाच्या पॅनलने सरकारकडे लेखी स्वरुपात आपला विरोध दर्शविला आहे. बालगुन्हेगाराच्या वयात बदल करणे हे संयुक्त राष्ट्राच्या बालहक्क कायद्याच्या विरुद्ध आहे. तसेच 16 वे वर्ष हे बालकाच्या जडणघडणीचे वर्ष असते. जर बालगुन्हेगाराला दोषी ठरवून कारावासाची शिक्षा दिली तर त्याच्यात सुधारणा होण्याची शक्‍यता उरणार नाही आणि तो पुढे मोठा गुन्हेगार होऊ शकतो. त्यामुळे आपण वय कमी करताना अधिक काळजी घ्यायला हवी‘

७- देश लुटण्याची परंपरा सुरुच आहे - सामना 

                     राजकारणी व सत्ताधारी देश लुटतात. बडे अधिकारी लुटीचा मार्ग दाखवतात. हा सामान्य जनतेचा आक्षेप कायम आहे. दिल्ली आधी मोगल व जाटांनी लुटली. नंतर इंग्रजांनी तेच केले. त्याच लुटीच्या पैशातून राष्ट्रपती भवन व आजचे पार्लमेंट उभे राहिले असावे. त्यामुळे या वास्तू शापित आहेत, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये! देश लुटण्यात कोणीच मागे नसते. प्रत्येकजण मिळेल तसे वाहत्या गंगेत हात धुऊन घेताना दिसतो. पुन्हा अनेक ठिकाणी ही गंगा आटली आहे व प्रत्यक्ष काशी-वाराणशीत गंगा साफ करण्यासाठी जपान सरकारचे सहकार्य आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी घेणार आहेत. आतापर्यंत गंगा शुद्धीकरणासाठी शेकडो नव्हे तर हजारो कोटी रुपये खर्च झाले. त्याचे काय झाले, या प्रश्‍नाचे उत्तर कधीच सापडणार नाही. लूट करणार्‍यांनी पवित्र गंगाही सोडली नाही. श्रीमंतीची ऐट दाखवणे ही आता प्रथा झाली आहे. पुण्यातील एका श्रीमंत लग्नाच्या बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. ‘जावया’च्या सन्मानासाठी ऑडी, फॉर्च्युनर, १२ बुलेट जणू भेटरूपी हुंडा म्हणूनच दिल्याची ही बातमी. रावेत येथे एक आलिशान विवाह सोहळा पार पडला. चिंचवड परिसरातील एक बडे घराणे आणि मावळातील एका दिलदार व हौशी इसमाचे तालेवार घराणे यांच्यात नातेसंबंध जोडणारा हा विवाह सोहळा थाटात पार पडला. इथपर्यंत सर्व ठीक, पण या लग्नात एक ऑडी, एक फॉर्च्युनर, १२ बुलेट अशी वाहने जावई-सन्मान म्हणून देण्यात आली. ओवाळणी करणार्‍या आत्यासाठी ‘अ‍ॅक्टिव्हा’ आणि इतर पै-पाहुण्यांसाठी सोन्याच्या अंगठ्या देण्यात आल्या. अशा तर्‍हेने हा विवाह सोहळा पुण्यात व वर्तमानपत्रात गाजतो आहे. काही वर्षांपूर्वी शंकरराव मोहिते पाटील यांच्या घरातील लग्नास लाखाची पंगत उठली म्हणून ते ‘लक्ष भोजन’ फेम ठरले व टीकेचा विषय झाले. त्याच महाराष्ट्रात नंतर श्रीमंतांच्या लग्नांवर शेकडो कोटींची लूट व उधळण होऊ लागली.

८- अरविंद केजरीवालांनी अरुण जेटलींची माफी मागितली पाहिजे - एमजे अकबर, भाजप नेते 

९- अखंड भारताबाबत राम माधव यांचे विधान चिथावणीखोर आणि खेदजनक - डी.राजा, सीपीआय 

१०- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराचा डास चावला आहे - मनिष तिवारी, काँग्रेस नेते. 

११- ऑल इंडिया रेडिओचा गैरवापर थांबला पाहिजे, पंतप्रधान जर सार्वजनिक प्रसारणसेवेचा वापर करत असतील तर, विरोधीपक्षांनाही ही संधी मिळाली पाहिजे - मनिष तिवारी, काँग्रेस नेते. 
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- तेलंगणात महायज्ञावेळी मांडवाला पेट, आग आटोक्यात 

              तेलंगणामधील मेदकमध्ये अयुथा चंडी महायज्ञावेळी मंदिरासमोरच्या मांडवाला भीषण आग लागली होती. ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी यज्ञाचं आयोजन केलं होतं. महायज्ञाच्यावेळी मांडवानं अचानक पेट घेतला आणि बघता बघता आगीनं उग्र रुप धारण केलं. अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. बांबू आणि गवतापासून मांडव बांधण्यात आल्यामुळे आग पटकन पसरल्याचं सांगितलं जातं.

१३- बरेली; सूडापोटी मैत्रीला काळिमा, शाळकरी मुलींनी घडवला मैत्रिणीवर बलात्कार 

                 उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. सूडाच्या भावनेने पेटलेल्या दोन शाळकरी विद्यार्थिनींनी आपल्याच मैत्रिणीवर बलात्कार घडवून आणला आहे. इतकंच नाही तर या दुष्कृत्याची व्हिडिओ क्लीप तयार करुन सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केली आहे.
बलात्कार घडवून त्याची अश्लील क्लीप बनवल्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपी तरुणींना अटक केली आहे. तर बलात्कार प्रकरणी आरोपी युवक फरार आहे. त्याच्या अटकेनंतर तिन्ही आरोपींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शेरगडमधल्या बैरमनगर गावात 18 डिसेंबरला ही घटना घडली. खोटं कारण सांगून आरोपी तरुणी पीडितेला घेऊन गेल्या आणि आपल्या अमन नावाच्या मित्राकरवी तिच्यावर बलात्कार घडवून आणला. याचा व्हिडिओ बनवून तो सोशल नेटवर्किंग साईटवरही पोस्ट केला. घटनेची वाच्यता कुठेही केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी पीडितेला दिली.

१४- मुंबई पोलिसांच्या फिटनेससाठी 'योगा बाय द बे' 

                 संपूर्ण मुंबई शहराच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या मुंबई पोलिसांच्या प्रकृतीबाबत अनेक बऱ्या-वाईट बातम्या आपण ऐकत असतो. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या फिटनेससाठी आज मुंबईत ‘योगा बाय द बे’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.फिटनेस गुरु मिकी मेहता आणि भाजप नेत्या शायना एन.सी. यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सुमारे 500 पोलिसांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. पोलिसांनी आपल्या तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगत रोजच्या जीवनात योगा केल्याने त्यांना बराच फायदा होऊ शकतो असा सल्ला मेहता यांनी पोलिसांना दिला. या कार्यक्रमाला पोलिस आयुक्त अहमद जावेद, क्रिकेटपटू झहीर खान, अभिनेत्री तारा शर्माही उपस्थित होते.

१५- डॉ. कुलकर्णी दाम्पत्य हत्येप्रकरणी तिघांना अटक 
             इस्लामपूर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. डॉ.कुलकर्णी यांची नर्स सीमा यादव, तिचा प्रियकर निलेश दिवाणजी आणि अर्जुन पवार या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांना 7 दिवसांची म्हणजे 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जागेच्या कारनातून आणि खंडणी, आर्थिक कारणातून हा खून केल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र पोलिसांनी अद्याप खुनाचा नेमकं कारण जाहीर केलं नाही. या हत्या प्रकरणात आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे.

~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- मराठवाड्याला हुडहुडी, नांदेडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद 
                 महाराष्ट्रात थंडीचा कहर सुरुच आहे. मराठवाड्यात तर अक्षरश: हुडहुडी भरली आहे. नांदेड जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. नांदेडमध्ये पारा 4.5 अंशावर घसरला आहे. त्यामुळे नांदेडमध्ये भरदिवसा हुडहुडी भरली आहे.थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही सर्वात कमी तापमान उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात नोंदवलं गेलं आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचा जोर अद्यापकी कायम असल्यानं थंडी ओसरण्याचं नाव घेत नाही. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईतही कडाक्याच्या थंडीनं हुडहुडी भरत आहे. दोन दिवसांपूर्वी उत्तर महाराष्ट्रातील निफाड, नाशिक, धुळे, महाबळेश्वरमध्ये तापमान नीचांकी स्तरावर पोहोचलं होतं. निफाडमध्ये तापमान 5.2 तर धुळ्याचं तापमान 6.2 इतकं नोंदवण्यात आलं होतं. तर नागपूरमध्येही 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मात्र, नांदेडमध्ये आज सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

१७- रत्नागिरीतल्या मिरकरवाडा झोपडपट्टीला भीषण आग 

                   रत्नागिरीतल्या मिरकरवाडा झोपडपट्टीला भीषण आग लागलीय. अनेक झोपड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्यात. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. पण झोपडपट्टी मुंबई दामूनगर झोपडपट्टीत झालेल्या सिलेंडरच्या स्फोटांप्रमाणेच इथेही सिलेंडर फुटण्याचे प्रकार होत असल्याचं पुढे येतंय.

~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- कुख्यात गँगस्टर अबू सालेमच्या जीवनावर चित्रपट 

               कुख्यात गँगस्टर अबू सालेम याच्या जीवनावर आधारित चित्रपट पुढच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रिलीज होण्याची शक्यता आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांसह हत्या, खंडणी यासारखे अनेक गुन्ह्यांप्रकरणी त्याची सुनावणी सुरु आहे. सालेमच्या जीवनावर आधारित ‘ड्रेडेड गँगस्टर’ या चित्रपटाचं शूटिंग मुंबई, पुणे, दुबई, लिस्बन (पोर्तुगाल) यासारख्या विविध ठिकाणी झालं आहे. सुवधन आंग्रे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अबू सालेमच्या आयुष्यातील पूर्वार्धावर म्हणजे आझमगड या मूळ गावातील घटनांवर चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न असेल. त्यानंतर नोकरीच्या शोधात उत्तर प्रदेशातून दिल्लीला झालेला प्रवास, मुंबईत आगमन आणि दाऊद गँगशी आलेल्या संपर्कातून केलेले गुन्हे ते गँगस्टर होण्यापर्यंत प्रवास यात दाखवण्याचा प्रयत्न असेल.

१९- सलमानचे 'अर्धशतक'; 400 फूटांचा केक 

                   अभिनेता सलमान खान आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत असून शनिवारी रात्री 12 वाजताच पनवेलमधील फार्म हाऊसवर जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी सिनेतारे-तारका तसेच चाहत्यांनी गर्दी केली होती. सलमानच्या चाहत्यांनी तब्बल 400 फूट लांबीचा केक तयार करण्यात केला आहे. सलमानच्या वाढदिवसाला पार्टीला हजेरी लावणाऱ्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडियावर सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. शनिवारी रात्री 12 वाजता केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, टेनिस स्टार सानिया मिर्झा, अभिनेत्री तब्बू, फराह, अभिनेता रितेश देशमुख, पत्नी जेनेलियासह अन्य काही जण उपस्थित होते.

२०- डोपिंग प्रकरणात आयसीसीने पाकिस्तानी लेगस्पिनर यासिर शहाला निलंबित केले 
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२१- २७-१२-२०१५ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन कि बात' कार्यक्रम
http://goo.gl/hSQieY
~~~~~~~~~~~~~~~
२२- लातूर; शिरूर अनंतपाल तालुक्यात नवजात बेवारस बालकास अज्ञातांनी कपड्यात गुंडाळून टाकले; लातूर सिव्हील दवाखान्यात उपचार चालू; अधिक तपास सुरु
http://goo.gl/8f1AOT
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते,
खर तर दिवस हा आपल्या सुंदर विचारांनी सुरु होतो...!!
जीवन मोजकेच असते,
ते हसत हसत जगायचे असते,
जुळलेले नाते कधी तोडायचे नसते,
सुख दु:खाने भरलेले हे आयुष्य असते, कुठे काही हरवते तर कुठे काही सापडते, त्यातूनच सापडलेले जपायचे असते.
[डॉ. वर्षा चौरे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
*  *  *  *  *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
 १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: