Thursday, 24 December 2015

माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा उपयोग करून करून घेणार - प्रा. पगारे सर



माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा उपयोग करून करून घेणार - प्रा. पगारे सर 


[विशेष प्रतिनिधी, अकोले]

                 आज अकोले येथे अकोले कला वानुज्या व दादासाहेब रुपवले विज्ञान महाविद्यालय माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. त्यावेळी पगारे सर बोलत होते कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व माजी विद्यार्थ्यांना कॉलेज प्रशासन व आजच्या विद्यार्थ्यांना स्वागत केले. त्यानंतर एक छोटेखाणी समारंभ झाला. त्यावेळी कार्याक्रमाचे प्रास्ताविक मा. देशमुख सर यांनी मांडले. यानंतर माजी विद्यार्थी म्हणून नमस्कार लाईव्हचे संस्थापक श्रीकांत बाहेती यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


श्रीकांत बाहेती यांनी जुन्या माजी विध्यार्थ्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग पुथिल विध्यार्थ्यांना व्हावा म्हणून व्याख्यानमाला सुरु करावी अशी सूचना मांडली. त्यांची हि सूचना सर्वच विद्यार्थ्यांनी उचलून धरली.
 यावेळी शेखर हासे, व सुभाष खरबस इतर माजी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत मांडले. सर्वांनीच महाविद्यालयास भरीव मदत करण्याचे हमी दिली व आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षस्थान मा. जे.डी. आंबरे पाटील यांनी भूषवले.

No comments: